पुण्यातील परिक्रमा मार्गावर पालखी पदुकाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो पुणेकरांनी दुतर्फा अनंत कोटी ब्रम्हांडनायक, राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की, जय...! च्या जय घोषात श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखीचे पुण्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पुण्यातील परिक्रमा मार्गावर पालखी पदुकाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो पुणेकरांनी दुतर्फा गर्दी केलेली होती. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २९ वर्षापासून पालखी पादुका परिक्रमा ही महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या दोन राज्यात जात असते, श्री क्षेत्र अक्कलकोट येथून नोव्हेंबर २०२५ पासून सुरु झालेली परिक्रमा ही दि. १५ जुलै २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे विसावणार आहे. दरम्यान ही परिक्रमा गेल्या ४ महिन्यात पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या राज्यातून तळकोकणातून पुणे येथे पोहोचली आहे. या नंतर नवी मुंबई, बृहन्मुंबई कडे मार्गस्थ होणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की, जय...! च्या जयघोषात अन्नछत्र मंडळाच्या पालखी पादुका परिक्रमेच्या आगमनाने पुणे शहर भक्तीरसात रंगले असून, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय घोष, रांगोळीच्या पायघड्या आणि पुष्पवृष्टी पुणेकरांनी उस्पुर्त पणे उत्साहात स्वागत केले.फुलाने सजविलेल्या पालखीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. श्री क्षेत्र अक्कलकोट येथून आलेली पालखी मंडईतील श्री शारदा गजानन मंदिरापासून वाजत-गाजत निघाली. शहरातील प्रमुख मार्गावरून शोभा यात्रा काढण्यात आली असून, ठिकठिकाणी भाविकांनी पुष्पवृष्टी व रांगोळ्यांनी पालखीचे स्वागत केले. कार्यक्रमाचे आयोजन अण्णा थोरात, विनायक घाटे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी केले आहे. या प्रसंगी शोभा यात्रा पुणे महानगरपालिकेचे महापौर मंजुषा नागपुरे, आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते तर पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक राघवेंद्र मानकर, अॅड. कुणाल टिळक, नगरसेविका स्वरदा बापट, स्वप्नाली पंडित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पालखी पादुका दर्शन सोहळा, संस्कृती कार्यक्रम ,पुरस्कार सोहळा संपन्न झाला. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्वामी भक्ती गीते हर्षद कुलकर्णी यांचे तर बाळासाहेब परदेशी यांचे साई नवनाथ भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम, योगेश तपस्वी यांचा स्वामी गीत सुगंध, स्वरसमर्थ भक्ती गंधर्व मुकुंद बादरायणी यांनी सदर केले.या बरोबरच श्री स्वामी समर्थ पुरस्कार ज्ञानेश्वर माऊली टाकळकर तर सेवा पुरस्कार दिपक वायकर यांना स.भ.मोहन बुवा रामदासी, समर्थ रामदास स्वामी मठ क्षेत्र खातगांव जि. अहिल्यानगर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, पुणे पोलीस उपायुक्त परीमंडल १ ऋषिकेश रावले, पुणे येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र किराड, पुणे महानगरपालिका स्थायी समितीहे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला. सामुदायिक महाआरती सोहळा हा पुणे म.न.पा. नगरसेविका प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, मसोबा देवस्थान खारावडेच्या अध्यक्षा मधुरा भेलके या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दरम्यान श्री स्वामी समर्थ मंडपा मध्ये श्री स्वामी समर्थ पादुका अभिषेक सामुदायिक आरती, रक्तदान सोहळा संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुण्याचे श्रीपाद थोरात, बाबा रोटे, राजाभाऊ शिर्के, माऊली लोणारे, केंपन्ना नाईक, संदीप चव्हाण, संदीप कोकाटे, सचिन परदेशी, लाला गायकवाड, किशोर म्हस्के, उमेश बने, डॉ. संजय खेडेकर, सुरज थोरात, प्रथमेश घाटे, भगवान बलकवडे, बाळू गौडा, हरीश उर्फ दादा मोरे, नारायणराव चांदणे, नंदू कटके, युवराज चिकणे, सिद्धांत (स्वामी) काजळे, कौशल्य सलीम शेख, सोहम वरखडे, श्री क्षेत्र अक्कलकोटचे महाराष्ट्र पालखी परिक्रमा संयोजक संतोष भोसले, पुरोहित संजय कुलकर्णी आदिजणानी परिश्रम घेतले.

- लातूर मनपा प्रशासनाने 2026-27 चे अर्थ संकल्पचे अंदाज पत्रक स्थायी समिती समोर के सादर, लातूर मनपा चे नवनिर्वाचित सभापती सचिन बंडापल्ले यांनी सदर अंदाज पत्रकात काही त्रुटी असल्याचे सांगत सदर अंदाज पत्रक दुरुस्त करून अचूक अंदाज पत्रक सादर करण्याच्या केल्या सूचना.1
- ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.1
- लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.1
- सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- Post by AapTak Hindi News Channel1
- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.1
- Post by AapTak Hindi News Channel1