खामगाव : उच्च शिक्षणात सामाजिक न्याय, आरक्षण आणि शिष्यवृत्ती योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या आदेशानुसार खामगाव येथे जोरदार निदर्शनं करण्यात आली. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत भीम आर्मीच्या वतीने मा. राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे तसेच (USG)कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.याप्रसंगी बोलताना भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश धुंदळे म्हणाले की, "शिक्षणातील सामाजिक न्याय अबाधित राहावा आणि बहुजन विद्यार्थ्यांच्या हक्कांवर कोणताही आघात होऊ नये, यासाठी भीम आर्मी कटिबद्ध आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि आरक्षणाच्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे." या आंदोलनात बुलढाणा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष शैलेश वाकोडे, जिल्हा महासचिव अतुल इंगळे, जिल्हा नेते रोशन सरदार, बंटी गव्हांदे. खामगाव तालुकाध्यक्ष मंगेश वाकोडे, मलकापूर तालुकाध्यक्ष विलास तायडे, नांदुराचे अंकुश वाकोडे, जळगाव जामोदचे संगम तायडे, शेगावचे अजय शिरसाट, खामगाव शहराध्यक्ष विवेक गवई,अनंता इंगळे, अमरदीप दाभाडे, सुनील इंगळे, अशोक सुरडकर, ऋषी निंबोळकार, स्वप्निल भोजने, आकाश इखारे, योगेश इंगळे, जोगेंद्र हिवराळे, सोनू सोनवणे, योगेश निंबाळकर, आकाश वाकोडे, डी.के, अशोक इंगळे, पंकज दादा, अक्षय जोगदंड, गोलू हिवराळे, आकाश बोरुडे आणि प्रसिद्धी प्रमुख सय्यद रफिक. हे आंदोलन अत्यंत शांततेत पार पडले. मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला
खामगाव : उच्च शिक्षणात सामाजिक न्याय, आरक्षण आणि शिष्यवृत्ती योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या आदेशानुसार खामगाव येथे जोरदार निदर्शनं करण्यात आली. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत भीम आर्मीच्या वतीने मा. राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे तसेच (USG)कायद्याची कडक
अंमलबजावणी व्हावी, हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.याप्रसंगी बोलताना भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश धुंदळे म्हणाले की, "शिक्षणातील सामाजिक न्याय अबाधित राहावा आणि बहुजन विद्यार्थ्यांच्या हक्कांवर कोणताही आघात होऊ नये, यासाठी भीम आर्मी कटिबद्ध आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि आरक्षणाच्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे." या आंदोलनात बुलढाणा
जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष शैलेश वाकोडे, जिल्हा महासचिव अतुल इंगळे, जिल्हा नेते रोशन सरदार, बंटी गव्हांदे. खामगाव तालुकाध्यक्ष मंगेश वाकोडे, मलकापूर तालुकाध्यक्ष विलास तायडे, नांदुराचे अंकुश वाकोडे, जळगाव जामोदचे संगम तायडे, शेगावचे अजय शिरसाट, खामगाव शहराध्यक्ष विवेक गवई,अनंता इंगळे, अमरदीप दाभाडे, सुनील इंगळे,
अशोक सुरडकर, ऋषी निंबोळकार, स्वप्निल भोजने, आकाश इखारे, योगेश इंगळे, जोगेंद्र हिवराळे, सोनू सोनवणे, योगेश निंबाळकर, आकाश वाकोडे, डी.के, अशोक इंगळे, पंकज दादा, अक्षय जोगदंड, गोलू हिवराळे, आकाश बोरुडे आणि प्रसिद्धी प्रमुख सय्यद रफिक. हे आंदोलन अत्यंत शांततेत पार पडले. मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला
- खामगाव : शिवजयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज शहराच्या मुख्य भागातून आणि मिरवणूक मार्गावरून 'रूट मार्च' काढण्यात आला. मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शिवजयंती मिरवणुकीच्या पारंपारिक मार्गाची पायी चालत पाहणी केली. मार्गावरील संवेदनशील ठिकाणे, सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. या रूट मार्चमध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि कोणत्याही अफवांना थारा मिळू नये, हा या संचलनाचा मुख्य उद्देश होता.मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून संशयास्पद हालचालींवर पोलीस करडी नजर ठेवून आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवरही कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.4
- 🚨 BREAKING: खामगाव दगडफेक प्रकरणाचे सत्य समोर! 🚨 खामगावातील दगडफेकीची घटना ही कोणत्याही समुदायाशी संबंधित नसून ती वैयक्तिक वादातून घडली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी केले आहे. 📢 #Khamgaon #BreakingNews #PoliceUpdate #KhamgaonCity #Alert #Truth #MaharashtraPolice1
- चुकीची आकडेवारी अन् लोकांचा विरोध; बुलढाणा हद्दवाढीचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात.1
- Post by Asgar Khan in BCN news nagpur1
- कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*1
- Post by Raghunath Aghao1
- शिवभक्त सचिन फटाले यांनी शिवभक्तांना शिवजयंती बद्दल केले आव्हान1
- खामगाव : शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एका घरावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला. मात्र, ही घटना पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे जाहीर आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. काल रात्री च्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील एका कुटुंबाच्या घरावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या दुर्दैवी घटनेत घरातील एका मुलीला दुखापत झाली आहे. मुलीच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल केला.ही घटना घडल्यानंतर शहरात काही समाजकंटकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवण्यास सुरुवात केली. दोन समुदायांमध्ये वाद झाल्याच्या किंवा धार्मिक स्थळावर दगडफेक झाल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि नागरिकांची गर्दी जमा झाली होती. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यांनी दोन्ही समुदायातील प्रमुख व्यक्तींची तातडीची बैठक घेतली. "ही घटना दोन समाजातील नसून वैयक्तिक वादाचा परिणाम आहे. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही," अशा शब्दांत त्यांनी संबंधितांना समज दिली आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी जनतेला खालील बाबींचे आवाहन केले आहे: अफवांकडे दुर्लक्ष करा: सोशल मीडियावरील मेसेजची खातरजमा केल्याशिवाय ते फॉरवर्ड करू नका. उद्या शिवजयंतीचा मोठा सण आहे. हा उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करा, अफवा पसरवणाऱ्या आयडीवर सायबर सेलचे बारीक लक्ष असून, दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,शहरात शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही चिथावणीखोर गोष्टींना बळी पडू नये.3