गंगापूरमध्ये थरकाप! तरुणावर अमानुष अत्याचार; गुप्तांगावर हल्ला पुणे (शशिकांत पाटोळे) l दि; ३० मार्च २०२६ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-लासूर मार्गावर घडलेल्या अमानुष हल्ल्याने परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदेवाडी फाटा परिसरात एका ३२ वर्षीय तरुणावर अत्यंत क्रूर पद्धतीने हल्ला करण्यात आला, ज्यात हल्लेखोरांनी त्याच्या गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार करत त्याला गंभीर जखमी केले. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा तरुण रस्त्यावरून जात असताना दबा धरून बसलेल्या अज्ञात आरोपींनी त्याला अडवले. त्यानंतर जबरदस्तीने त्याला रस्त्यालगतच्या एका निर्जन शेतात नेण्यात आले. तिथे त्याच्यावर निर्दयी मारहाण करण्यात आली आणि विशेषतः त्याच्या गुप्तांगावर लक्ष केंद्रीत करत धारदार हत्याराने वार करण्यात आले. या हल्ल्याची क्रूरता इतकी भीषण होती की, आरोपींनी त्याला अक्षरशः मृत्यूच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. हल्ला केल्यानंतर आरोपी थांबले नाहीत. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील त्या तरुणाला पुन्हा रस्त्यावर आणून टाकले आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. मदतीसाठी विव्हळत तो बराच वेळ रस्त्यावर पडून होता. अखेर नातेवाईकांना माहिती मिळाल्यानंतर त्याला तत्काळ गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे गुन्हेगारांच्या निर्दयतेचा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांचा गंभीर मुद्दा पुन्हा समोर आला आहे. पोलिसांकडून हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. ग्रामस्थांकडून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

- पिंपरी चिंचवड : - हिंजवडीच्या ब्लु रिच सोसायटी आणि परिसरात मोठी गारपीट झाली. या गारपिटीची दृश्य इथल्या रहिवाश्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. अतिशय विलोभनीय अशी ही दृश्य आहेत, जणू आपण बर्फाळ प्रदेशात आहोत, असं वाटावं... #हिंजवडी #पिंपरीचिंचवड #गारपीट #अवकाळीपाऊस #हवामानबदल #निसर्गचमत्कार #व्हायरलव्हिडिओ #ब्लुरिचसोसायटी #पुणेन्यूज #गारांचा_वर्षाव #Hinjewadi #PimpriChinchwad #Hailstorm #UnseasonalRain #WeatherUpdate #Nature #ViralVideo #BlueRidge #PuneNews #ClimateChange3
- पुण्यात पावसाचा तडाका पुणेकर गाराठले भर उन्हात पावसाचा तडाका1
- Post by Kishor subhash jadhav1
- अतिक्रम विभागांच्या बीटनिरक्षकाच काम फक्त नोटीस देणंच नव्हे .कारवाई करणे देखील त्यांचे कर्तव्य आहे1
- वरुडमध्ये शेतातील नाल्यात अर्धवट जळालेला अज्ञात मृतदेह सापडला1
- विक्रम शिंदे / भोर दि.30 भोर शहराला अवकाळी पावसाने झोडपले.बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नदी नाल्याचे स्वरूप.पावसाच्या पाण्यामुळे अनंत नगर भोर येथे ये जा करण्यासाठी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता आणि ड्रेन लाईन नगरपालिकेने करून दिलं असतं तर बर झालं असतं. असे नागरिकांचे म्हणणे. वस्ती साठी पैसे आले होते त्यानुत काम करता आले असते पण तसे न करता त्यावेळी दुसरी कडील रस्ता केला गेला. नागरिकाची संतप्त प्रतिकिया .1
- शिरूर तालुक्यातील वरुडे-धामारी रोडवर भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळून खड्ड्यात कोसळली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले.घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे.1
- Post by Kishor subhash jadhav1