धर्माबादेत धाब्यांवर मद्यपानाची वाढती गर्दी (परवानाधारक बार ओसाड; व्यावसायिक संतप्त) राज्य उत्पादन शुल्क चे अधिकारी चिरीमिरी त परेशान धर्माबादेत धाब्यांवर मद्यपानाची वाढती गर्दी (परवानाधारक बार ओसाड; व्यावसायिक संतप्त) राज्य उत्पादन शुल्क चे अधिकारी चिरीमिरी त परेशान धर्माबाद : शहरातील परवानाधारक बार व रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची संख्या घटत असताना, शहरालगतच्या धाब्यांवर मद्यपान करणाऱ्यांची वाढती गर्दी गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. स्वस्तात सहज उपलब्ध होणारी दारू, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नियमांची उघडपणे पायमल्ली यामुळे अनेक धाबे बेकायदेशीर “दारू अड्डे” बनत असल्याचे चित्र दिसत आहे. आंध्रा बसस्थानक परिसर, बासर रोड, येताळा रोड तसेच शहरालगतच्या मुख्य मार्गांवरील धाब्यांवर रात्री उशिरापर्यंत युवकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ दिसून येते. उघडपणे मद्यपान, मोठ्या आवाजात गोंधळ, वाहनांची अनियमित पार्किंग आणि किरकोळ भांडणतंटे हे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत आहे. विशेषतः आंध्रा बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला वाहनांची रांग लागल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका परवानाधारक बार व रेस्टॉरंट व्यावसायिकांना बसत आहे. शासनाचे नियम पाळून परवाने घेणे, कर भरणे आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. ग्राहक धाब्यांकडे वळत असल्याने अनेक व्यावसायिक अडचणीत आले असून काहींनी व्यवसाय बंद करण्याचाही विचार सुरू केला आहे. दरम्यान, पोलिस व उत्पादन शुल्क विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अधूनमधून छापेमारी होत असली तरी ती केवळ दिखावूपूरती असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. काही दिवस परिस्थिती नियंत्रणात आल्याचे चित्र दिसते; मात्र त्यानंतर पुन्हा बेकायदेशीर विक्री सुरू होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या वाढत्या प्रकारामुळे सामाजिक वातावरणावरही विपरीत परिणाम होत आहे. महिलांना व कुटुंबियांना रात्री बाहेर पडताना असुरक्षित वाटत असून शहराची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे या समस्येवर तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. ⬛ चौकट : व्यावसायिकांची संतप्त प्रतिक्रिया @ “आम्ही शासनाचे सर्व नियम पाळतो, कर भरतो, परवाने घेतो; मात्र धाब्यांवर बेकायदेशीर दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे ग्राहक तिकडे वळत आहेत. कायद्याचे पालन करणाऱ्यांनाच तोटा सहन करावा लागत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया परवानाधारक बार मालकांनी व्यक्त केली. ⬛ चौकट : नागरिकांची ठोस मागणी @ धाब्यांवरील बेकायदेशीर दारू विक्री रोखण्यासाठी नियमित छापेमारी, कठोर दंडात्मक कारवाई आणि पोलिसांची सातत्याने गस्त वाढवावी. तसेच धाब्यावर दारू पिण्यास सक्त बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. “कायद्याचा धाक निर्माण झाला तरच हा प्रकार थांबेल,” असा इशाराही स्थानिकांनी दिला. ⬛ चौकट : उत्पादन शुल्क विभागावर प्रश्नचिन्ह @ धर्माबाद परिसरातील धाब्यांवर सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीकडे उत्पादन शुल्क विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. नियमित तपासणी व ठोस कारवाईचा अभाव असल्याने धाबेधारकांचा आत्मविश्वास वाढला असून नियमांचे उल्लंघन खुलेआम सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ⬛ चौकट : धाब्यावर दारू पिण्यास बंदीची मागणी @ शहरालगतच्या धाब्यांवर उघडपणे मद्यपानामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे धाब्यावर दारू पिण्यास पूर्ण बंदी घालून नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे.

- मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर : शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे. या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.1
- Post by Mohsin ahmed khan1
- महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार1
- Post by Mushtaq Shaikh1
- शेतकऱ्याच्या प्रगतीकडे एक मोठं पाऊल! नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील शेतकरी संतोष फुलेवार यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करत प्रगतीचा नवा टप्पा गाठला शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होत असून, संतोष फुलेवार यांनीही योजनेबद्दल आभार व्यक्त केले शेतकरी सक्षम तर देश सक्षम! अशाच योजनांचा लाभ घेऊन इतर शेतकऱ्यांनीही प्रगती साधावी, हीच अपेक्षा! #SantoshPhulewar #FarmerSuccess #AgricultureIndia #Tractor #GovtScheme Himayatnagar Nanded ALMBharat FarmersProgress1
- आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता1
- Post by नागनाथ ससाने1
- Post by Mohsin ahmed khan1