logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*'जय भगवान'च्या जयघोषात बडेवाडीमध्ये श्री क्षेत्र भगवानगडाच्या ९२ व्या नारळी सप्ताहाचा प्रारंभ* *'जय भगवान'च्या जयघोषात बडेवाडीमध्ये श्री क्षेत्र भगवानगडाच्या ९२ व्या नारळी सप्ताहाचा प्रारंभ* शिरूर कासार प्रतिनिधी श्री संत भगवानबाबांनी प्रारंभ केलेल्या नारळी सप्ताहाच्या ९२ व्या वर्षीचे यजमानपदाचे शिवधनुष्य हे भगवानगडाच्या दक्षिण बाजूला असलेल्या बडेवाडी ग्रामस्थांनी उचलले आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचा आज प्रारंभ झाला. श्री संत भगवानबाबांनी फिरता नारळी सप्ताहाचा नाविन्यपुर्ण उपक्रम ९२ वर्षांपूर्वी श्री क्षेत्र नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या पखालडोह या ठिकाणी सुरू केला. त्यांचे पश्चात तीच सप्ताहाची परंपरा श्री क्षेत्र भगवानगडाचे द्वितीय उत्तराधिकारी अष्टपैलू संत, वै.ह.भ.प.गुरुवर्य श्री संत भिमसिह महाराज यांनी सुरू ठेवत बाबांचे कार्य सुरू ठेवले होते. वै.गुरुवर्य भीमसिंह महाराजांच्या वैकुंठगमनानंतर श्री क्षेत्र भगवानगडाचे तृतीय उत्तराधिकारी तथा विद्यमान मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या सप्ताहाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हा नारळी सप्ताह वैभवशाली असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक सप्ताहामध्ये आठवडाभर उपस्थित असतात. नारळाचे यजमानपद स्विकारलेले ग्रामस्थ आठवडाभर तन, मन आणि धन खर्ची घालत श्रीगुरूंची सेवा करत असतात . ३१ मार्च रोजी हा महोत्सव प्रारंभ झाला असून सप्ताहामध्ये ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली भागवताचार्य ह.भ.प. श्री.प्रकाश महाराज साठे यांच्या अमृततुल्य रसाळवाणीतून ७ दिवस भव्य श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचा उपस्थित लाखो भाविकांना लाभ होणार आहे. सप्ताहामध्ये ह.भ.प.महंत श्री.रामगिरी महाराज (येळेश्वर संस्थान येळी), ह.भ.प. भागवताचार्य श्री.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री, ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर महाराज जळकीकर, ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, ह.भ.प.श्री.प्रभाकर महाराज बोधले पंढरपूरकर, श्री क्षेत्र भगवानगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प.महंत श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांच्या कीर्तन सेवा होणार असून सप्ताहाच्या सातव्या दिवशी रात्री ठीक ८:३० ते ११ या वेळेत श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांचे जागराचे जाहीर हरीकीर्तन होणार आहे. त्यानंतर काल्याच्या दिवशी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहामध्ये दररोज पहाटे काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ इ. धार्मिक कार्यक्रम होत आहेत. चौकट.. *गाव छोटं पण मन मोठं असणाऱ्या बडेवाडीला सहकार्य करा..!* श्री क्षेत्र भगवानगडाचा नारळी सप्ताह पार पडत असलेले बडेवाडी हे गाव मनाने आणि श्रद्धेने खूप मोठे आहे. परंतु लोकसंख्येने अत्यल्प असल्यामुळे सप्ताहासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून परिसरातील सर्व गावांनी आलेल्या भाविकांना जेवण वाढण्यासाठी मदत करावी असे आवाहन ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी केले. चौकट.. *येणाऱ्या दसऱ्याला नवीन महंत गादीवर बसवणार..!* यावर्षी येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी श्री क्षेत्र भगवानगडाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये दसऱ्याच्या दिवशीच श्री क्षेत्र भगवानगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प.महंत श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांचा अभिषेक करून त्यांना श्री क्षेत्र भगवानगडाच्या गादीवर बसवण्यात येणार असल्याची माहिती ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. श्री नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी स्वतः दिली.

2 hrs ago
user_Mahesh Mangrulkar
Mahesh Mangrulkar
Shirur (Kasar), Beed•
2 hrs ago
9bead3f0-7e77-4fde-8a9b-e94f4361ffbb

*'जय भगवान'च्या जयघोषात बडेवाडीमध्ये श्री क्षेत्र भगवानगडाच्या ९२ व्या नारळी सप्ताहाचा प्रारंभ* *'जय भगवान'च्या जयघोषात बडेवाडीमध्ये श्री क्षेत्र भगवानगडाच्या ९२ व्या नारळी सप्ताहाचा प्रारंभ* शिरूर कासार प्रतिनिधी श्री संत भगवानबाबांनी प्रारंभ केलेल्या नारळी सप्ताहाच्या ९२ व्या वर्षीचे यजमानपदाचे शिवधनुष्य हे भगवानगडाच्या दक्षिण बाजूला असलेल्या बडेवाडी ग्रामस्थांनी उचलले आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचा आज प्रारंभ झाला. श्री संत भगवानबाबांनी फिरता नारळी सप्ताहाचा नाविन्यपुर्ण उपक्रम ९२ वर्षांपूर्वी श्री क्षेत्र नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या पखालडोह या ठिकाणी सुरू केला. त्यांचे पश्चात तीच सप्ताहाची परंपरा श्री क्षेत्र भगवानगडाचे द्वितीय उत्तराधिकारी अष्टपैलू संत, वै.ह.भ.प.गुरुवर्य श्री संत भिमसिह महाराज यांनी सुरू ठेवत बाबांचे कार्य सुरू ठेवले होते. वै.गुरुवर्य भीमसिंह महाराजांच्या वैकुंठगमनानंतर श्री क्षेत्र भगवानगडाचे तृतीय उत्तराधिकारी तथा विद्यमान मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या सप्ताहाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हा नारळी सप्ताह

385a8ff6-0918-45c8-aecc-a8b2ee6ab702

वैभवशाली असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक सप्ताहामध्ये आठवडाभर उपस्थित असतात. नारळाचे यजमानपद स्विकारलेले ग्रामस्थ आठवडाभर तन, मन आणि धन खर्ची घालत श्रीगुरूंची सेवा करत असतात . ३१ मार्च रोजी हा महोत्सव प्रारंभ झाला असून सप्ताहामध्ये ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली भागवताचार्य ह.भ.प. श्री.प्रकाश महाराज साठे यांच्या अमृततुल्य रसाळवाणीतून ७ दिवस भव्य श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचा उपस्थित लाखो भाविकांना लाभ होणार आहे. सप्ताहामध्ये ह.भ.प.महंत श्री.रामगिरी महाराज (येळेश्वर संस्थान येळी), ह.भ.प. भागवताचार्य श्री.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री, ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर महाराज जळकीकर, ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, ह.भ.प.श्री.प्रभाकर महाराज बोधले पंढरपूरकर, श्री क्षेत्र भगवानगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प.महंत श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांच्या कीर्तन सेवा होणार असून सप्ताहाच्या सातव्या दिवशी रात्री ठीक ८:३० ते ११ या वेळेत श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांचे जागराचे जाहीर हरीकीर्तन होणार आहे. त्यानंतर काल्याच्या दिवशी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा

0bf8f90b-3b0f-4e03-898b-3b0d54348c8f

यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहामध्ये दररोज पहाटे काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ इ. धार्मिक कार्यक्रम होत आहेत. चौकट.. *गाव छोटं पण मन मोठं असणाऱ्या बडेवाडीला सहकार्य करा..!* श्री क्षेत्र भगवानगडाचा नारळी सप्ताह पार पडत असलेले बडेवाडी हे गाव मनाने आणि श्रद्धेने खूप मोठे आहे. परंतु लोकसंख्येने अत्यल्प असल्यामुळे सप्ताहासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून परिसरातील सर्व गावांनी आलेल्या भाविकांना जेवण वाढण्यासाठी मदत करावी असे आवाहन ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी केले. चौकट.. *येणाऱ्या दसऱ्याला नवीन महंत गादीवर बसवणार..!* यावर्षी येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी श्री क्षेत्र भगवानगडाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये दसऱ्याच्या दिवशीच श्री क्षेत्र भगवानगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प.महंत श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांचा अभिषेक करून त्यांना श्री क्षेत्र भगवानगडाच्या गादीवर बसवण्यात येणार असल्याची माहिती ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. श्री नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी स्वतः दिली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।
    7
    भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।
    user_D K G Pradesh Prasar
    D K G Pradesh Prasar
    Media house गेवराई, बीड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर
    2
    बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर
    user_Motiram Narke
    Motiram Narke
    Local Politician बीड, बीड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by कर्जत लाईव्ह
    1
    Post by कर्जत लाईव्ह
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • सर्व धर्मीय सद्भावना ईद मिलन: Bk Dr Donika & Maulana ने दिया शांति का संदेश
    1
    सर्व धर्मीय सद्भावना ईद मिलन: Bk Dr Donika & Maulana ने दिया शांति का संदेश
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    1 hr ago
  • महाराष्ट्र (कोल्हापुर, जालना) के कुछ हिस्सों में पेट्रोल पंपों पर भीड़ और ईंधन संकट की अफवाहों के बीच प्रशासन ने 200 रुपये का पेट्रोल और 2000 रुपये का डीजल (टू-व्हीलर/फोर-व्हीलर के लिए) प्रति व्यक्ति सीमा तय कर दी है। यह फैसला पैनिक बाइंग को रोकने के लिए लिया गया है।
    1
    महाराष्ट्र (कोल्हापुर, जालना) के कुछ हिस्सों में पेट्रोल पंपों पर भीड़ और ईंधन संकट की अफवाहों के बीच प्रशासन ने 200 रुपये का पेट्रोल और 2000 रुपये का डीजल (टू-व्हीलर/फोर-व्हीलर के लिए) प्रति व्यक्ति सीमा तय कर दी है। यह फैसला पैनिक बाइंग को रोकने के लिए लिया गया है।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    20 min ago
  • जालन्यात कन्हैया नगर परिसरातील भीषण अपघात: भरधाव आयशर झाडावर आदळला; दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा..
    1
    जालन्यात कन्हैया नगर परिसरातील भीषण अपघात: भरधाव आयशर झाडावर आदळला; दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा..
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
    1
    जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.