logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथे क्रांतिवीर पांडू मास्तरांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा येडेनिपाणी येथे क्रांतिवीर पांडू मास्तरांचा स्मृतिदिन उत्साहात येडेनिपाणी येथे क्रांतिवीर पांडू मास्तरांचा स्मृतिदिन उत्साहात माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांचा सन्मान; स्मारकातून समाजपरिवर्तनाची नांदी घडविण्याचा संकल्प येडेनिपाणी, ता. वाळवा : स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे थोर क्रांती सेनानी क्रांतिवीर पांडू मास्तर यांचा स्मृतिदिन येडेनिपाणी येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाळवा व शिराळा तालुक्यातील माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर क्रांतिवीर पांडू मास्तर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक संपतराव माळी होते. क्रांतिवीर पांडू मास्तर यांचे नातू तथा माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. पांडू मास्तरांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून माजी सैनिक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांचा सन्मान करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पांडू मास्तरांचे स्मारक उभारण्यात संपूर्ण श्रेय सदाभाऊ खोत यांचे आहे.स्मारकाची काही अपूर्ण कामे निधीअभावी राहिली आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच आमदार सत्यजित आनंदराव पवार यांनीही स्मारकासाठी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे पाटील यांनी सांगितले. साहित्यिक भा. ल. ठाणगे यांनी क्रांतिवीर पांडू मास्तर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर प्रकाश टाकला. देशसेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. येरवडा कारागृहातून त्यांनी धाडसी पलायन केले होते. तसेच इस्लामपूर येथे झालेल्या मोर्चादरम्यान त्यांच्यावर लाठी चार्ज झाला होता. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानामुळे पत्री सरकारच्या उभारणीतही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती, असे ठाणगे यांनी सांगितले. येडेनिपाणी येथे उभारण्यात येत असलेले पांडू मास्तरांचे स्मारक हे केवळ स्मृतिस्थळ न राहता समाजपरिवर्तनाचे केंद्र बनावे, असा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. स्मारक परिसरात डिजिटल वाचनालय, विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी अभ्यासिका तसेच युवकांसाठी व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे भा. ल. ठाणगे यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात माजी सैनिक संपतराव माळी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील विविध स्मारकांपेक्षा येडेनिपाणी येथील क्रांतिवीर पांडू मास्तरांचे स्मारक वेगळ्या पद्धतीने नावारूपाला येईल, असा विश्वास व्यक्त केला. स्मृतिदिनाच्या निमित्ताने माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी क्रांतिवीर पांडू मास्तर प्रतिष्ठानचे आभार मानले. यावेळी वाळवा व शिराळा तालुका माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी सैनिक संपतराव माळी, साहित्यिक भा. ल. ठाणगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदकुमार नीलकंठ, माजी सैनिक बाळकृष्ण सावंत, नौशाद तांबोळी, अशोक पाटील, संजय जाधव, सिताराम पाटील, रामराव शेवाळे, अर्जुन पाटील, शहाजी पाटील यांच्यासह वाळवा व शिराळा तालुका माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी आणि स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी सैनिक अमर मेथे यांनी केले, तर आभार अर्जुन पाटील यांनी मानले. ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेने कार्यक्रमाची सांगता झाली.

1 hr ago
user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
1 hr ago
13fa2dc6-62fe-49c1-9148-488c5037faee

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मंत्री शंभुराजे देसाई हे तासगाव गणपती रथोत्सवला होते,त्यानी सोशल मिडियावर व्हिडीओ केला व्हायरल
    1
    मंत्री शंभुराजे देसाई हे तासगाव गणपती रथोत्सवला होते,त्यानी सोशल मिडियावर व्हिडीओ केला व्हायरल
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!
    1
    मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    11 hrs ago
  • माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...
    3
    माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • बारामती गणेश फेस्टिव्हलला अजितदादांची आठवण; भावनिक संदेशातून आदरांजली
    1
    बारामती गणेश फेस्टिव्हलला अजितदादांची आठवण; भावनिक संदेशातून आदरांजली
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Mahadoot news
    1
    Post by Mahadoot news
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर करणेबाबत निवेदन देण्यात आले. मा. राजसाहेबांच्या आदेशाने, मनसे नेते दिलीबापू धोत्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष ऍड किशोर शिंदे, ऍड सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हामध्ये भयंकर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पेरणी केलेली विविध पिके पाऊस न आल्यामुळे करपली आहेत.आणि प्रत्येक गावं, वाडी -वस्तीवर, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही, लोकांना रोजगार नाही. शेतकरी यांच्या मुलांना शाळा, कॉलेजमध्ये, पेपर व शिकवणीचे फी देणेसाठी पैसे नाहीत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलून ज्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी पिकांचे पंचनामे करणेसाठी व जनावरांना चारा छावणी तात्काळ मंजूर करावे म्हणून तहसीलदार साहेब व जिल्हाअधिकारी साहेबांना आदेश देऊन तात्काळ मदत जाहीर करावे.सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे शेतकरीकडे काही एक दमडी नाही.आता श्री गणपतीचे आगमन झाले आहे. आणि दसरा, दिवाळी सण जवळ येत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी मिळून जनतेला आधार दिला पाहिजे.निवेदन देताना मनसे ता. अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, गट अध्यक्ष किणी काशिनाथ मरतुरे, ता. उपाध्यक्ष मल्लिनाथ घंटे, शहर संपर्क अध्यक्ष आदर्श मळगी, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, मनसे किणी ढब्बू जाधव, दुधनी शाखा अध्यक्ष मनोज राठोड, बोरीउमरगे शाखा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कोन्हाळी शाखा उपाध्यक्ष दत्ता घंटे व शेतकरी राचय्या बसय्या स्वामी, परमेश्वरp साखरे, उमेश देडे, नीलकंठ धनशेट्टी, अंदप्पा माळगे, तिप्पणा नागरसे, विकास जाधव, राजू अंगडीकर, कुमार जाधव असे अनेक मनसैनिक व शेतकरी लोक निवेदन देताना तहसील कार्यालयामध्ये उपस्थित होते.या राज्यातील सरकार 8 दिवसाच्या आत जर दुष्काळ तात्काळ जाहीर नाही केल्यास सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन प्रत्येक तालुके व प्रत्येक जिह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.
    1
    अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर करणेबाबत निवेदन देण्यात आले.
मा. राजसाहेबांच्या आदेशाने, मनसे नेते दिलीबापू धोत्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष ऍड किशोर शिंदे, ऍड सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हामध्ये भयंकर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पेरणी केलेली विविध पिके पाऊस न आल्यामुळे करपली आहेत.आणि प्रत्येक गावं, वाडी -वस्तीवर, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही, लोकांना रोजगार नाही. शेतकरी यांच्या मुलांना शाळा, कॉलेजमध्ये, पेपर व शिकवणीचे फी देणेसाठी पैसे नाहीत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलून ज्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी पिकांचे पंचनामे करणेसाठी व जनावरांना चारा छावणी तात्काळ मंजूर करावे म्हणून तहसीलदार साहेब व जिल्हाअधिकारी साहेबांना आदेश देऊन तात्काळ मदत जाहीर करावे.सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे शेतकरीकडे काही एक दमडी नाही.आता श्री गणपतीचे आगमन झाले आहे. आणि दसरा, दिवाळी सण जवळ येत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी मिळून जनतेला आधार दिला पाहिजे.निवेदन देताना मनसे ता. अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, गट अध्यक्ष किणी काशिनाथ मरतुरे, ता. उपाध्यक्ष मल्लिनाथ घंटे, शहर संपर्क अध्यक्ष आदर्श मळगी, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, मनसे किणी ढब्बू जाधव, दुधनी शाखा अध्यक्ष मनोज राठोड, बोरीउमरगे शाखा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कोन्हाळी शाखा उपाध्यक्ष दत्ता घंटे व शेतकरी राचय्या बसय्या स्वामी, परमेश्वरp साखरे, उमेश देडे, नीलकंठ धनशेट्टी, अंदप्पा माळगे, तिप्पणा नागरसे, विकास जाधव, राजू अंगडीकर, कुमार जाधव असे अनेक मनसैनिक व शेतकरी लोक निवेदन देताना तहसील कार्यालयामध्ये उपस्थित होते.या राज्यातील सरकार 8 दिवसाच्या आत जर दुष्काळ तात्काळ जाहीर नाही केल्यास सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन प्रत्येक तालुके व प्रत्येक जिह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपू लागले शासनाने मदत करावी सांगली जिल्ह्यासह तासगाव तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने ज्वारी बाजरी मका व इतर कडधान्य पिके पावसाअभावी पाण्याअभावी करपू लागले आहे तरी शासनाने तरी तलाव्यात पाणी सोडावी व शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी अशी शेतकरी वर्गातून मागणी
    1
    सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपू लागले शासनाने मदत करावी
सांगली जिल्ह्यासह तासगाव तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने ज्वारी बाजरी मका व इतर कडधान्य पिके पावसाअभावी पाण्याअभावी करपू लागले आहे तरी शासनाने तरी तलाव्यात पाणी सोडावी व शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी अशी शेतकरी वर्गातून मागणी
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लाखो भाविकाच्या साक्षिणे तासगाव गणपती रथोत्सव पार पडला,
    1
    लाखो भाविकाच्या साक्षिणे तासगाव गणपती रथोत्सव पार पडला,
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • चांदापुरी: नवचेतना व आधारशीला वेलकम मेळावा पंचायत समिती सदस्य सर्व नम्रता शिवराज पुकळे व मनिषा मदने पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
    1
    चांदापुरी: नवचेतना व आधारशीला वेलकम मेळावा पंचायत समिती सदस्य सर्व नम्रता शिवराज पुकळे व मनिषा  मदने पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.