अंदरसूल आणि पाटोदा येथे महिला बचतगट मार्गदर्शन शिबीर उत्साहात; वस्तू विक्रीसाठी सामूहिक व्यासपीठ निर्माण करणार - डॉ. शेफाली भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून अंदरसूल आणि पाटोदा गटातील महिला बचतगटांसाठी मार्गदर्शन व हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. शेफाली भुजबळ यांनी महिलांना संबोधित करताना सांगितले की, बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सामूहिक व्यासपीठ निर्माण करण्यात येईल. या कार्यक्रमात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित महिलांशी संवाद साधून, महिला सक्षमीकरण आणि रोजगाराच्या नवीन संधींबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक स्वावलंबनाकडे पाऊल टाकावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात 'होम मिनिस्टर' फेम संदीप जाधव यांनी मनोरंजक खेळांचे आयोजन केले होते, ज्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, सरपंच आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
अंदरसूल आणि पाटोदा येथे महिला बचतगट मार्गदर्शन शिबीर उत्साहात; वस्तू विक्रीसाठी सामूहिक व्यासपीठ निर्माण करणार - डॉ. शेफाली भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून अंदरसूल आणि पाटोदा गटातील महिला बचतगटांसाठी मार्गदर्शन व हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. शेफाली भुजबळ यांनी महिलांना संबोधित करताना सांगितले की, बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सामूहिक व्यासपीठ निर्माण करण्यात येईल. या कार्यक्रमात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या
हस्ते विजेत्या महिलांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित महिलांशी संवाद साधून, महिला सक्षमीकरण आणि रोजगाराच्या नवीन संधींबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक स्वावलंबनाकडे पाऊल टाकावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात 'होम मिनिस्टर' फेम संदीप जाधव यांनी मनोरंजक खेळांचे आयोजन केले होते, ज्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, सरपंच आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
- पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये येवला शहराने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. राज्य स्तरावर ६ वा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून येवला नगर परिषदेने ७५ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे. शहरात राबवलेले मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण, मियावाकी वने, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर आणि प्लास्टिकमुक्त उपक्रमांना मिळालेला नागरिकांचा सक्रिय पाठिंबा या यशाचे गमक ठरला. या कामगिरीबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष वर्षा गायकवाड व सर्व नगरसेवक यांनी येवलाकरांचे कौतुक केले आहे. मिळालेल्या बक्षीस रकमेतून शहरात नवीन हरित क्षेत्रे विकसित करणे, जलसंवर्धन प्रकल्प आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जेला प्रोत्साहन देणारी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत, ज्यामुळे येवला शहर पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेल ठरेल. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला.1
- Post by VK ONLINE INFORMATION1
- 💪1
- Post by Dilip Patil1
- Shree Gajanan Vidya Mandir School के और से Mk Deshmukh का Satkar1
- Post by दैनिक,"निळे प्रतीक"1
- अंबादास दानवे सिल्लोड शहरात, आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी चे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन, सिल्लोड शहरात शोककळा.. अंत्यविधीसाठी हजारो नागरिकांचा.1
- सिल्लोड शहरात शोककळा, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचा निधन. अंत्ययात्रा मध्ये हजारो नागरिकांनी...1