महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सोमवार, २२ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनच्या कॅबिनेट हॉलमध्ये होणार आहे. प्रशासनाने यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून, मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी २१ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांनी मतमोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक सूचना देऊन, कर्मचाऱ्यांना मतमोजणीपर्यंत सतर्क राहण्याचे निर्देश दिले. या कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनुमंत कोळेकर, नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, आणि तहसिलदार संजय वारकड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान, भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी व नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती दिली. यामध्ये मतमोजणी केंद्रावरील जबाबदाऱ्या, मतपत्रिकांची तपासणी, मतांच्या वैधतेचे निकष, निकाल नोंदविण्याची पद्धत तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मतपत्रिकांची छाननी, मतमोजणी आणि नोंदणीची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था, मनुष्यबळ नियोजन आणि अन्य आवश्यक बाबींची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण, निष्पक्ष आणि सुरळीत वातावरणात पार पडावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सोमवार, २२ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनच्या कॅबिनेट हॉलमध्ये होणार आहे. प्रशासनाने यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून, मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी २१ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांनी मतमोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक सूचना देऊन, कर्मचाऱ्यांना मतमोजणीपर्यंत सतर्क
राहण्याचे निर्देश दिले. या कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनुमंत कोळेकर, नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, आणि तहसिलदार संजय वारकड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान, भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी व नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची सविस्तर
माहिती दिली. यामध्ये मतमोजणी केंद्रावरील जबाबदाऱ्या, मतपत्रिकांची तपासणी, मतांच्या वैधतेचे निकष, निकाल नोंदविण्याची पद्धत तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मतपत्रिकांची छाननी, मतमोजणी आणि नोंदणीची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था, मनुष्यबळ नियोजन आणि अन्य आवश्यक बाबींची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण, निष्पक्ष आणि सुरळीत वातावरणात पार पडावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- गेल्या तीन दिवसांपासून धुमाकूळ घालत असलेल्या दराटीच्या माकडाला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. वन विभागाला हे यश मिळाले असून, त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर माकडाला पकडण्यात आले.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात असलेल्या शेलगाव ग्रामपंचायतीत आजही पाण्यासाठी तीव्र टंचाई असून, गावातील कोणत्याही नागरिकाला घरपोच पाणी मिळत नाही. महाराष्ट्र शासनातर्फे अनेक योजना उपलब्ध करून दिल्या जात असताना आणि गावात जलजीवन मिशनसारख्या योजनेचे काम झाले असतानाही, ही समस्या कायम आहे. पिण्याच्या पाण्यापासून दैनंदिन वापराच्या पाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी गावकऱ्यांना पाणी विकत घ्यावे लागते, ज्यामुळे त्यांची अवस्था स्वातंत्र्यपूर्व काळासारखी झाली आहे. गावात नळजोडणी झालेली असली तरी, या नळांना पाणीच येत नाही. एवढेच नाही तर, गावातील हातपंप किंवा सार्वजनिक बोअरवेलमध्येही पाणी उपलब्ध नाही. गावातील काही भागांमध्ये रस्ते खाली गेले असून नाले उंच झाल्याने पावसाळ्यात या रस्त्यांमध्ये पाणी साचून तळ्यासारखी स्थिती निर्माण होते. काही ठिकाणी नाल्यांची बिले उचलली गेली असली तरी, तिथे नाले बांधले गेलेले नाहीत. नामफलकावर दर्शवल्याप्रमाणे नाले जेवढ्या रस्त्यावर दाखवले आहेत, त्याच्या अर्ध्या भागातच काम झाले असून अर्धा भाग तसाच अपूर्ण आहे, असा भोंगळ कारभार या गावात दिसून येतो. ग्रामपंचायतीत कागदपत्रे काढणे असो किंवा इतर कामे असो, ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गावातील सरंपच महिन्यातून केवळ एक-दोन वेळा गावात येत असल्याने ग्रामस्थांच्या अनंत समस्या अधिकच वाढत आहेत.1
- हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.1
- खासदार नागेश आष्टीकर अखेर जनतेसमोर आले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथे एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यशवाडी येथील मारुती मंदिराच्या सभामंडपाचा काही भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेमुळे अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सध्या या घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या दुर्घटनेतील बाधित नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळो व सर्वजण सुरक्षित राहोत, अशी प्रार्थना केली जात आहे.1