पोखरी घाट परिसरात नीलगाईची शिकार, परीसरात खळबळ, गुन्हा दाखल महागाव तालुक्यातील काळी (दौ.) वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोखरी घाटात पुन्हा एकदा नीलगाई (रोही)ची निर्घृण शिकार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात शिकाऱ्यांनी सापळा लावून नीलगाई पकडली आणि धारदार शस्त्राने तिची हत्या करून काही अवयव कापून नेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.मंगळवार, १० मार्च रोजी सकाळी स्थानिक नागरिकांना पोखरी शिवारातील घाट परिसरात नीलगाईचा मृतदेह अस्तव्यस्त अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची पाहणी केली असता हा प्रकार वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा नसून अज्ञात व्यक्तींनी केलेल्या शिकारीचा असल्याचे स्पष्ट झाले. शिकाऱ्यांनी नीलगाईचे पाय, पोटातील अवयव तसेच मोठ्या प्रमाणात मांस कापून नेल्याचेही दिसून आले.घटनेची माहिती मिळताच काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत नीलगाईची पाहणी करून पंचनामा केला, मृत रोहीचा शवविच्छेदन डॉ अमितकुमार झा पशुधन विकास अधिकारी महागाव यांनी केले असून अवयवाचे नमुने घेण्यात आले असून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे,दरम्यान वारंवार होत असलेल्या वन्यप्राण्यांच्या शिकारीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून दोषींना तातडीने शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पोखरी घाट परिसरात नीलगाईची शिकार, परीसरात खळबळ, गुन्हा दाखल महागाव तालुक्यातील काळी (दौ.) वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोखरी घाटात पुन्हा एकदा नीलगाई (रोही)ची निर्घृण शिकार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात शिकाऱ्यांनी सापळा लावून नीलगाई पकडली आणि धारदार शस्त्राने तिची हत्या करून काही अवयव कापून नेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.मंगळवार, १० मार्च रोजी सकाळी स्थानिक नागरिकांना पोखरी शिवारातील घाट परिसरात नीलगाईचा मृतदेह अस्तव्यस्त अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची पाहणी केली असता हा प्रकार वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा नसून अज्ञात व्यक्तींनी
केलेल्या शिकारीचा असल्याचे स्पष्ट झाले. शिकाऱ्यांनी नीलगाईचे पाय, पोटातील अवयव तसेच मोठ्या प्रमाणात मांस कापून नेल्याचेही दिसून आले.घटनेची माहिती मिळताच काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत नीलगाईची पाहणी करून पंचनामा केला, मृत रोहीचा शवविच्छेदन डॉ अमितकुमार झा पशुधन विकास अधिकारी महागाव यांनी केले असून अवयवाचे नमुने घेण्यात आले असून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे,दरम्यान वारंवार होत असलेल्या वन्यप्राण्यांच्या शिकारीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून दोषींना तातडीने शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
- 8मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटना साकोली च्या वतीने जागतिक महिला दिन व 10 मार्च सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त साकोली पोलिस स्टेशन हाल येथे कार्यक्रम पार पडले त्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.इद्रायणी ताई कापगते महिला समुपदेशीका व सामाजिक कार्यकर्त्या प्रमुख पाहुणे= मा.ॲडव्होकेट बघेले मॅडम फौजदारी न्यायालय साकोली मा माहेश्वरी ताई नेवारे माजी जि .प. सदस्या एकोडी प्रभाग मा.इनवाते मॅडम पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन साकोली बोरकर सर पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन साकोली स्वाती शहारे मॅडम तालुका समुह संघटक उपजिल्हा रुग्णालयात साकोली चौधरी मॅडम उपजिल्हा रुग्णालय कनिष्ठ अभियंता साकोली पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्नी. देवराम चांदेवार व उपाध्यक्ष सौ स्मिता खेडीकर हे होते कार्यक्रमाचे संचालन सौ.जयशिला बारसागडे पोलिस पाटील वटेश्वर स्वागत गीत सौ तिलोत्तमा कठाने ,सौ सुनंदा फंदे सौ वंदना मानापुरे ,सौ जयश्री रामटेके पोलिस पाटील प्रास्ताविक सौ दिक्षा उके पो. पाटील परसटोला आभार सौ ममता डडेमल पोलिस पाटील गडकुंभली कार्यक्रमाची सांगता चहा नाश्ता व राष्ट्रगीताने झाली4
- कुही-मौजा चिखली गोन्हा गावासाठी सुमारे 42 लक्ष रुपये नवीन स्मशान भूमी बांधकामासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हाध्यक्ष मा. श्री. आनंदराव राऊत साहेब यांना भेटून त्यांचे सामाजिक कार्यकर्ते आकाश भोयर यांनी आभार मानले. स्मशान भूमीच्या बांधकामासाठी आदरणीय राऊत साहेब यांनि मोलाचे सहकार्य केले व त्या संदर्भात VIDC कडे पाठपुरावा केला.1
- चंद्रपूर : राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले .1
- Post by Pitam Parjapati4
- पवनीतील विकृत शिक्षकाला नागरिकांनी दिला चोप चप्पलांनी मारत विचारला जाब भंडारा: (दि १०) भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात असलेल्या वडेगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेत ५४ वर्षीय शिक्षक अनिल राऊत याने तेथील विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून गैरवर्तन केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गावातील संतप्त पालकांनी त्याला भर चौकात चप्पलांनी मारहाण केली असून पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवणात आला आहे. याआधीही लाखांदूर तालुक्यातील जि प गौराळा शाळेत असतांना त्याच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल झाल्याचे समोर तपासात समोर आले आहे. हा शिक्षक विकृत असून यास निलंबित करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- देश की हिफाज़त करते-करते मुजफ्फरपुर की मिट्टी का एक लाल हमेशा के लिए अमर हो गया। #indian #Jawans #jawansrk #viral #bihar #news #Muzaffarpur #trending #BiharNews #AkashPriyadarshi1
- चंद्रपूर - लोहारडोंगरी खाणीची परवानगी रद्द व्हावी याकरिता इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला महिलांनी पाठिंबा देत सरकारला जागे करण्यासाठी आज थाळी नाद आंदोलन केले. बंडू धोतरे यांच्या आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या उद्याच्या भविष्यासाठी बंडू धोतरे लढत असून नागरिकांनी त्यांना पाठिंबा द्यावा...1
- "जीते जी रक्तदान और मरने के बाद नेत्रदान" - डॉ. हेमकृष्ण कापगते साकोलीत नेत्र व आरोग्य शिबीरात २०५ जणांची तपासणी • १०० जणांची शस्त्रक्रियेला निवड • १२५ चष्मे वाटप • साकोली : "जीते जी रक्तदान और मरने के बाद नेत्रदान" याप्रमाणे प्रत्येक जणांनी हे कार्य राबविले तर जखमी रूग्णांना रक्त मिळून जीवनदान आणि नेत्रहीनांना दृष्टी मिळेल" असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांनी केले. ते ( मंगळ. १० मार्च ) ला जागतिक महिला दिनानिमित्त तसेच स्व. आत्माराम पटले व स्व. मुरलीधर गजापुरे यांच्या स्मरणार्थ आणि महात्मे नेत्र पेढी नागपूर, भंडारा जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान, श्याम बहुउद्देशीय शिक्षण संस्था साकोली, जिजामाता पतसंस्था साकोली व डॉ. हेडगेवार सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने "डोळ्यांची तपासणी व आरोग्य शिबीर" उद्घाटनप्रसंगी बोलत होते. शिबीरात २०५ जणांची तपासणी, १०० जणांची शस्त्रक्रियेला निवड तर १२५ जणांना चष्मे वाटप करण्यात आले. या नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबीराला अतिथी शरद गुप्ता, नगराध्यक्ष देवश्री कापगते, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, प्रशांत गुप्ता, किशोर गुप्ता, मालती लांजेवार, संस्था सचिव ॲड. मनिष कापगते, देवनाथ रहांगडाले, रंजना मस्के आदी उपस्थित होते. शिबिरात महात्मे नेत्र पेढी नागपूरचे डॉ. अरविंद डोंगरवार, डॉ. विश्वजीत निकम, अथर्व भोंदले, ऐश्वर्या कडवे, आस्था बन्सोड, रितू सेलोटे या चमूने नेत्र आरोग्य सेवा दिली. येथे एकुण १०० जणांची मोतिबिंदू शस्त्रक्रियासाठी नागपूरला निवड करण्यात आली. त्यासाठी पहिली ५० जणांची चमू १६ मार्चला व दुसरी ५० जणांची चमू १८ मार्चला नागपूरला रवाना होणार आहेत. या शिबिरात एकुण २०५ जणांनी नोंदणी करून आरोग्य शिबीराचा लाभ घेतला आणि १२५ जणांना चष्मे वाटप करण्यात आले. शिबिरात संचालन ॲड. मनिष कापगते यांनी केले. याप्रसंगी स्व. शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. गजानन डोंगरवार, शकुंतला कापगते, विवेक कापगते, मोरेश्वर गहाणे, प्रतिष्ठानचे प्रसिद्धी प्रमुख आशिष चेडगे, राजू कापगते, युवराज गहाणे, अंगराज समरीत, अस्मिता पुरामकर, मधूकर नगरकर, भागवत लांजेवार, आशिष सैलोकर, सुमन शेंडे आदींनी स्वागत तथा आयोजनात विशेष सहकार्य केले.4