थकीत करासाठी शिरूर नगरपरिषदेची धडक कारवाई; पाच मालमत्ता सील, दोन नळजोडण्या खंडित थकीत करासाठी शिरूर नगरपरिषदेची धडक कारवाई; पाच मालमत्ता सील, दोन नळजोडण्या खंडित शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी शिरूर नगरपरिषद प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. करसंकलन विभागाने मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकीदारांवर जप्तीची मोहीम तीव्र केली आहे. या कारवाईअंतर्गत मंगळवारी (दि. १० मार्च) शहरातील जुना बाजी मार्केट परिसरातील एक दुकान तसेच मारुती आळी येथील चार दुकाने अशा एकूण पाच मालमत्तांना थकीत करापोटी सील ठोकण्यात आले. तसेच दोन ठिकाणच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. नगरपरिषदेकडून आतापर्यंत सात मालमत्तांवर सीलची कारवाई करण्यात आली असून २६ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. आर्थिक वर्षाअखेरीस थकबाकी वसुलीसाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईदरम्यान कर निरीक्षक माधव गाजरे, प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ यांच्यासह दीपक कोल्हे, रत्नदीप पालके, तेजस शिंदे, सचिन वाळूज, ज्ञानेश्वर चाकने, आदित्य बनकर, अंकुश इचके, दत्तात्रय टोपे, विकी उमाप, चंद्रकांत पठारे, भूषण कडेकर, भगवान दळवी, अमृत भंवर, रविंद्र जाधव, स्वप्नील तरटे, संतोष फुलडाळे, संतोष गायकवाड आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. थकीत करधारकांनी तत्काळ कराचा भरणा करून जप्ती व अटकावणीसारखी अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी केले आहे.

- गॅसची साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांना शासनाचे निर्देश राज्यात एलपीजी गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करून साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश महसूल विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत राहावा आणि काळाबाजार रोखावा यासाठी प्रशासन सतर्क झाले असून तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. साठेबाजी, जादा दराने विक्री किंवा नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. #MaharashtraRevenue #RevenueDepartment #GasHoarding #ActionAgainstHoarding #GasShortage #LPGCrisis #LPGSupply1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- #pcmc #commisionerofpcmc #marathinews #ncp #bjp1
- पिंपरी चिंचवड : - अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews1
- Post by Vruttshakti Digital News1
- *नागपूर मोर्चात सहभागी व्हा; मोहन भागवत यांना जाब विचारू – प्रकाश आंबेडकर* पुणे : सरकारच्या सध्याच्या धोरणांमुळे देशातील सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच नागपूरमध्ये होणाऱ्या मोर्चात सहभागी होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना जाब विचारण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीत केंद्र सरकारची भूमिका कमकुवत ठरत आहे. इराणने जम्मू-काश्मीर प्रश्नावर भारताच्या बाजूने भूमिका घेतली होती, मात्र इराणवर हल्ला झाल्यानंतर भारताने त्यांच्या बाजूने उभे राहण्याचे स्पष्ट केले नाही, अशी टीका त्यांनी केली. इराण हा चीनचा मित्र देश असून योग्य धोरण अवलंबले असते तर भारताला गॅस पुरवठा मिळू शकला असता आणि सध्याचा गॅस तुटवडा निर्माण झाला नसता, असेही ते म्हणाले. याशिवाय सरकार आंदोलनांवर निर्बंध आणणारे नवे कायदे करत असल्याचा आरोप करत आंबेडकर म्हणाले की, ज्यांच्याकडे स्पष्ट धोरण नाही ते केवळ जात आणि धर्माच्या राजकारणावर भर देत आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी राजकारण करणे शक्य नसल्याची टीकाही त्यांनी केली. सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून बँकिंग व्यवस्थेबाबतही लोकांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टीका केली. दरम्यान, देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आपली भूमिका ठामपणे मांडावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.1
- पिंपरीतून एका व्यापाऱ्याचा अपहरण 'खंडणी विरुद्ध पथक 'काळेवाडी पोलीस स्टेशन 'संगमनेर पोलीस यांच्या मदतीने व्यापाऱ्याची झाली सुटका .1
- Post by Vruttshakti Digital News1