logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

"आपला माणूस फाउंडेशन" च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन 5 एप्रिल रोजी "आपला माणूस फाउंडेशन" च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन 5 एप्रिल रोजी नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर : आपला माणूस फाउंडेशन नागपूर तर्फे यावर्षी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव आयोजित सोहळा 2026 मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे. या नव्या उपक्रमाबाबत तसेच फौंडेशनच्या विविध सामाजिक कार्याची माहिती देखील आपला माणूस फाउंडेशनच्या माध्यमातून दिली व मागील काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविल्या गेले आहे. प्रभाग क्रमांक 34 मधील नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार, चित्रकला स्पर्धा, टेनिस बॉल, क्रिकेट स्पर्धा, जागतिक महिला दिनानिमित्ताने कार्यक्रम साई पालखी सोहळा, रक्तदान शिबिर, तसेच आरोग्य समस्यांनी ग्रस्त रुग्णांना भेट देऊन मदत करणे अशा प्रकारे आपला माणूस फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम करीत आहे. येणाऱ्या 5 एप्रिल रोजी, सुभेदार ले आउट मधील गजानन हायस्कूल जवळ, छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावेळी कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती गगन रहांगडाले यांनी दिली. त्यामध्ये मा. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दक्षिणचे आमदार मोहन मते, आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर, सुप्रसिद्ध शिव व्याख्याते सुदर्शन दादा शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संदीप जोशी, सौ.नवनीत राणा, आमदार विजय रहांगदळे, आमदार रवी राणा, राजे मुधोजी भोसले नागपूरचे महापौर व उपमहापौर व प्रभाग क्रमांक 29, 32 व 34 चे सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित राहतील. यावेळी गगन रहांगडाले, ओम प्रकाश झाडे, धनंजय जोशी, विजय रामगीरकर, कमलाकर कुमरे, अविनाश पांढूरकर, आशिष आमलीकवार आणि भूषण बोरकर हे परिश्रम घेत आहेत.

3 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
854de078-888d-4a09-aa69-26ecad8bbc6b

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....
    1
    छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण
जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Suresh k langde
    1
    Post by Suresh k langde
    user_Suresh k langde
    Suresh k langde
    कळमेश्वर, नागपूर, महाराष्ट्र•
    51 min ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    3 hrs ago
  • सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल
    1
    सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
    1
    विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला!
नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे.
अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
    1
    कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
    1
    उमरेड ( राजु जांभुळे )
भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले
    1
    नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.