logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाबुभाई खान यांनी जाहीरपणे शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे दर्यापूरच्या राजकारणात नवे वळण आले आहे.

on 7 June
user_विदर्भ शासन न्यूज..
विदर्भ शासन न्यूज..
दर्यापूर, अमरावती, महाराष्ट्र•
on 7 June

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाबुभाई खान यांनी जाहीरपणे शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे दर्यापूरच्या राजकारणात नवे वळण आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथे दर रविवारी व्यसनाधीन व्यक्तींना मोफत व्यसनमुक्तीचे धडे दिले जातात. येथील व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक दशरथ ठाकरे हे गेल्या १५ वर्षांपासून शेषराव महाराजांच्या आशीर्वादाने आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत आहेत. या व्यसनमुक्ती आश्रमाच्या भिंतींवर 'दारूत रंगला संसार भंगला' अशा म्हणी रेखाटलेल्या असून, दशरथ ठाकरे प्रत्येक व्यसनाधीन व्यक्तीला मोफत सल्ला देतात. ते व्यसनाची सवय कशी लागते आणि ती कशी सोडवता येते, याबद्दल मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक व्यसनाधीन व्यक्ती येथे येऊन व्यसनमुक्त झाले आहेत. दशरथ ठाकरे यांनी 'व्यसनमुक्ती सप्ताह' साजरा करत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन व्यसनमुक्तीचे धडे दिले आहेत. त्यांनी राज्यभर 'नशा मुक्ती जनजागृती अभियान'ही राबवले, ज्याला अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आणि यासाठी त्यांचा अनेक ठिकाणी सत्कारही करण्यात आला.
    4
    अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथे दर रविवारी व्यसनाधीन व्यक्तींना मोफत व्यसनमुक्तीचे धडे दिले जातात. येथील व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक दशरथ ठाकरे हे गेल्या १५ वर्षांपासून शेषराव महाराजांच्या आशीर्वादाने आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत आहेत.

या व्यसनमुक्ती आश्रमाच्या भिंतींवर 'दारूत रंगला संसार भंगला' अशा म्हणी रेखाटलेल्या असून, दशरथ ठाकरे प्रत्येक व्यसनाधीन व्यक्तीला मोफत सल्ला देतात. ते व्यसनाची सवय कशी लागते आणि ती कशी सोडवता येते, याबद्दल मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक व्यसनाधीन व्यक्ती येथे येऊन व्यसनमुक्त झाले आहेत.

दशरथ ठाकरे यांनी 'व्यसनमुक्ती सप्ताह' साजरा करत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन व्यसनमुक्तीचे धडे दिले आहेत. त्यांनी राज्यभर 'नशा मुक्ती जनजागृती अभियान'ही राबवले, ज्याला अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आणि यासाठी त्यांचा अनेक ठिकाणी सत्कारही करण्यात आला.
    user_राजकुमार वानखडे
    राजकुमार वानखडे
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • शेगावच्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीने अकोला जिल्ह्यातील आपला चार दिवसांचा मुक्काम पूर्ण केला आहे. आज पहाटे ही पालखी पातूर शहरातून वाशिम जिल्ह्याकडे प्रस्थान करते झाली. पातूर घाटातून वाशिमकडे मार्गस्थ झालेल्या या पालखी सोहळ्याचे विहंगम ड्रोन दृश्य खास प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आले आहे, ज्यामध्ये गजानन महाराजांच्या भक्तिमय पालखी सोहळ्याचे सुंदर दृश्य अनुभवता येते.
    1
    शेगावच्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीने अकोला जिल्ह्यातील आपला चार दिवसांचा मुक्काम पूर्ण केला आहे. आज पहाटे ही पालखी पातूर शहरातून वाशिम जिल्ह्याकडे प्रस्थान करते झाली. पातूर घाटातून वाशिमकडे मार्गस्थ झालेल्या या पालखी सोहळ्याचे विहंगम ड्रोन दृश्य खास प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आले आहे, ज्यामध्ये गजानन महाराजांच्या भक्तिमय पालखी सोहळ्याचे सुंदर दृश्य अनुभवता येते.
    user_Akola daily news update
    Akola daily news update
    Local News Reporter अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • अमरावती ते बडनेरा मुख्य रस्त्यावर, समर्थ शाळेजवळच्या चौकातील ट्रॅफिक विभागाचे सिग्नल बंद असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, नगरसेवक मिलिंद बांबल यांनी मागणी केली आहे की हे बंद असलेले सिग्नल तातडीने सुरू करण्यात यावे. बांबल यांनी इशारा दिला आहे की, जर त्यांची ही मागणी पूर्ण झाली नाही, तर ते आंदोलन करतील.
    1
    अमरावती ते बडनेरा मुख्य रस्त्यावर, समर्थ शाळेजवळच्या चौकातील ट्रॅफिक विभागाचे सिग्नल बंद असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, नगरसेवक मिलिंद बांबल यांनी मागणी केली आहे की हे बंद असलेले सिग्नल तातडीने सुरू करण्यात यावे. बांबल यांनी इशारा दिला आहे की, जर त्यांची ही मागणी पूर्ण झाली नाही, तर ते आंदोलन करतील.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर संतांच्या पालखी सोहळ्यांच्या आयोजनासाठी राज्य प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वाहतूक, गर्दी व्यवस्थापन, वैद्यकीय पथके, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने सर्व जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित विभागांना समन्वयाने काम करून पालखी सोहळा शांततापूर्ण, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
    1
    आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर संतांच्या पालखी सोहळ्यांच्या आयोजनासाठी राज्य प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वाहतूक, गर्दी व्यवस्थापन, वैद्यकीय पथके, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाने सर्व जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित विभागांना समन्वयाने काम करून पालखी सोहळा शांततापूर्ण, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    3 hrs ago
  • खामगाव येथे युवक काँग्रेसने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडल्याच्या निषेधार्थ हा 'गलथान कारभार' असल्याची टीका करण्यात आली. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्ट कारभारावर जोरदार टीका करत, यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या कोट्यवधी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले. या प्रकरणी मोदी सरकारच्या अपयसाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित या आंदोलनात जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी "धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या!" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
    3
    खामगाव येथे युवक काँग्रेसने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडल्याच्या निषेधार्थ हा 'गलथान कारभार' असल्याची टीका करण्यात आली. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्ट कारभारावर जोरदार टीका करत, यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या कोट्यवधी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले.

या प्रकरणी मोदी सरकारच्या अपयसाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित या आंदोलनात जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी "धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या!" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) तालुक्यातील तरोडा खुर्द गावातील रस्त्याच्या सद्यस्थितीची नोंद घेण्यात आली आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) तालुक्यातील तरोडा खुर्द गावातील रस्त्याच्या सद्यस्थितीची नोंद घेण्यात आली आहे.
    user_संजय चिंधाजी पवार
    संजय चिंधाजी पवार
    Farmer जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • राज्यात सुरू असलेल्या 'ऑपरेशन कवच' या विशेष मोहिमेअंतर्गत, धामणगाव रेल्वे येथील दत्तापूर पोलीस स्टेशनने आमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्यासाठी एक भव्य जनजागृती बाईक रॅली आयोजित केली. या रॅलीच्या माध्यमातून युवकांसह सर्वसामान्य नागरिकांना नशेपासून दूर राहण्याचे तसेच व्यसनमुक्त, सुदृढ आणि सुरक्षित समाज घडविण्याचे प्रभावी आवाहन करण्यात आले. दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन परिसरातून निघालेली ही बाईक रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरली. रॅलीदरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'नशा सोडा, जीवन जोडा', 'आमली पदार्थांना ठाम नकार', 'व्यसनमुक्त युवक, सशक्त भारत' अशा विविध जनजागृतीपर संदेशांचे फलक हातात घेऊन नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळी युवकांना आमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच त्यांना नशेच्या आहारी न जाता शिक्षण, क्रीडा, सामाजिक कार्य व राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. या जनजागृती रॅलीमध्ये ठाणेदार गिरीश ताथोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, महिला व पुरुष पोलीस अधिकारी, अमलदार आणि सर्व पोलीस कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत दत्तापूर पोलिसांच्या जनहिताच्या या मोहिमेचे कौतुक केले. 'ऑपरेशन कवच' अंतर्गत राबविण्यात आलेला हा उपक्रम युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणारा आणि समाजाला व्यसनमुक्तीच्या दिशेने प्रेरित करणारा ठरला. यावेळी समाजातील प्रत्येक नागरिकाने आमली पदार्थांविरोधात सजग राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
    1
    राज्यात सुरू असलेल्या 'ऑपरेशन कवच' या विशेष मोहिमेअंतर्गत, धामणगाव रेल्वे येथील दत्तापूर पोलीस स्टेशनने आमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्यासाठी एक भव्य जनजागृती बाईक रॅली आयोजित केली. या रॅलीच्या माध्यमातून युवकांसह सर्वसामान्य नागरिकांना नशेपासून दूर राहण्याचे तसेच व्यसनमुक्त, सुदृढ आणि सुरक्षित समाज घडविण्याचे प्रभावी आवाहन करण्यात आले.

दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन परिसरातून निघालेली ही बाईक रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरली. रॅलीदरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'नशा सोडा, जीवन जोडा', 'आमली पदार्थांना ठाम नकार', 'व्यसनमुक्त युवक, सशक्त भारत' अशा विविध जनजागृतीपर संदेशांचे फलक हातात घेऊन नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळी युवकांना आमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच त्यांना नशेच्या आहारी न जाता शिक्षण, क्रीडा, सामाजिक कार्य व राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या जनजागृती रॅलीमध्ये ठाणेदार गिरीश ताथोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, महिला व पुरुष पोलीस अधिकारी, अमलदार आणि सर्व पोलीस कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत दत्तापूर पोलिसांच्या जनहिताच्या या मोहिमेचे कौतुक केले. 'ऑपरेशन कवच' अंतर्गत राबविण्यात आलेला हा उपक्रम युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणारा आणि समाजाला व्यसनमुक्तीच्या दिशेने प्रेरित करणारा ठरला. यावेळी समाजातील प्रत्येक नागरिकाने आमली पदार्थांविरोधात सजग राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    7 hrs ago
  • गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत २ लाख ७५ हजार रुपयांचे इलेक्ट्रॉनिक सिगारेट जप्त केले आहेत.
    1
    गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत २ लाख ७५ हजार रुपयांचे इलेक्ट्रॉनिक सिगारेट जप्त केले आहेत.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.