logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

एक दिवसीय 'संस्कृतीक' वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न! एक दिवसीय 'संस्कृती' वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न! नागपूर:- शीला मल्टिपर्पज सोसायटी संचलित शिलादेवी कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि हिवरकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक ९ मार्च २०२६ रोजी एकदिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश हिवरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव लता हिवरकर उपस्थित होत्या. तसेच सहसंचालक किरण हिवरकर, सहसचिव अवंती हिवरकर, प्राचार्या डॉ. सुरेखा शर्मा, प्राचार्या डॉ. लता खापरे, मार्गदर्शक डॉ. लिना तायवाडे, प्रा. सुजाता काळबांडे व प्रा. राजेश्वरी सांगोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे तीन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. दुसऱ्या सत्रात ‘झटपट फेरी’ स्पर्धा आयोजित करण्यात आली. तिसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नृत्य स्पर्धेत बी.ए.च्या विद्यार्थिनी सायली शेंडे हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर नितेश बसकर याला द्वितीय क्रमांक मिळाला. झटपट फेरी स्पर्धेत खुशबू बागडे आणि साहिल आत्राम यांनी प्रथम क्रमांक मिळवला. शतरंज स्पर्धेत सुयेश मेश्राम विजेता ठरला. कॅरम स्पर्धेत रोशन प्रसाद आणि नितेश बसकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच शिलादेवी कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांमध्ये संगीत मयूर मेश्राम आणि कॅरम स्पर्धेत साक्षी तैल यांनी प्रथम क्रमांक मिळवला. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संगीत व वाद्यवृंदाची जबाबदारी प्रा. निशा पिसे यांनी सांभाळली. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शुभांगी बनसोड व वर्षा बेलोरकर यांनी विशेष योगदान दिले. छायाचित्रणाची जबाबदारी प्रा. विद्या साखरे आणि प्रा. शीतल गोमकर यांनी पार पाडली. स्पर्धा व्यवस्थापनाची जबाबदारी प्रा. प्रतिभा भागवत यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अवंतिका वानखेडे व प्रा. प्रांजली मस्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. यामिनी डफरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अंकित जगताप, प्रा. आतिश गजभे यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले. तसेच कर्मचारीवर्गातील शिवांजली चकोले, सारिका आखरे, शैला बुटे, योगीता देवतळे, अर्चना मनोहर, रक्षा मनोहर, धरती जीभे, सुनिता काळे आणि रेखा ताई यांनीही मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभल्यामुळे हे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडले.

12 hrs ago
user_SATISH BHALERAO
SATISH BHALERAO
नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
12 hrs ago
6873d07f-84c2-46d5-af25-f0786acbd0a5

एक दिवसीय 'संस्कृतीक' वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न! एक दिवसीय 'संस्कृती' वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न! नागपूर:- शीला मल्टिपर्पज सोसायटी संचलित शिलादेवी कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि हिवरकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक ९ मार्च २०२६ रोजी एकदिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश हिवरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव लता हिवरकर उपस्थित होत्या. तसेच सहसंचालक किरण हिवरकर, सहसचिव अवंती हिवरकर, प्राचार्या डॉ. सुरेखा शर्मा, प्राचार्या डॉ. लता खापरे, मार्गदर्शक डॉ. लिना तायवाडे, प्रा. सुजाता काळबांडे व प्रा. राजेश्वरी सांगोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे तीन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. दुसऱ्या सत्रात ‘झटपट फेरी’ स्पर्धा आयोजित करण्यात आली. तिसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नृत्य स्पर्धेत बी.ए.च्या विद्यार्थिनी सायली शेंडे हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर नितेश बसकर याला द्वितीय क्रमांक मिळाला. झटपट फेरी स्पर्धेत खुशबू बागडे आणि साहिल आत्राम यांनी प्रथम क्रमांक मिळवला. शतरंज स्पर्धेत सुयेश मेश्राम विजेता ठरला. कॅरम स्पर्धेत रोशन प्रसाद आणि नितेश बसकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच शिलादेवी कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांमध्ये संगीत मयूर मेश्राम आणि कॅरम स्पर्धेत साक्षी तैल यांनी प्रथम क्रमांक मिळवला. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संगीत व वाद्यवृंदाची जबाबदारी प्रा. निशा पिसे यांनी सांभाळली. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शुभांगी बनसोड व वर्षा बेलोरकर यांनी विशेष योगदान दिले. छायाचित्रणाची जबाबदारी प्रा. विद्या साखरे आणि प्रा. शीतल गोमकर यांनी पार पाडली. स्पर्धा व्यवस्थापनाची जबाबदारी प्रा. प्रतिभा भागवत यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अवंतिका वानखेडे व प्रा. प्रांजली मस्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. यामिनी डफरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अंकित जगताप, प्रा. आतिश गजभे यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले. तसेच कर्मचारीवर्गातील शिवांजली चकोले, सारिका आखरे, शैला बुटे, योगीता देवतळे, अर्चना मनोहर, रक्षा मनोहर, धरती जीभे, सुनिता काळे आणि रेखा ताई यांनीही मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभल्यामुळे हे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मीना ढवळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर सादर केलेली एकांकिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सादर केली एकांकिका. नागपुर: आज 10 मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने मीना ढवळे यांनी केलेली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सादर केलेली एकांकिका.
    1
    मीना ढवळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर सादर केलेली एकांकिका
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सादर केली एकांकिका.
नागपुर: आज 10 मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने मीना ढवळे यांनी केलेली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सादर केलेली एकांकिका.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • कुही-मौजा चिखली गोन्हा गावासाठी सुमारे 42 लक्ष रुपये नवीन स्मशान भूमी बांधकामासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हाध्यक्ष मा. श्री. आनंदराव राऊत साहेब यांना भेटून त्यांचे सामाजिक कार्यकर्ते आकाश भोयर यांनी आभार मानले. स्मशान भूमीच्या बांधकामासाठी आदरणीय राऊत साहेब यांनि मोलाचे सहकार्य केले व त्या संदर्भात VIDC कडे पाठपुरावा केला.
    1
    कुही-मौजा चिखली गोन्हा गावासाठी सुमारे 42 लक्ष रुपये नवीन स्मशान भूमी बांधकामासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हाध्यक्ष मा. श्री. आनंदराव राऊत साहेब यांना भेटून त्यांचे सामाजिक कार्यकर्ते आकाश भोयर यांनी आभार मानले. स्मशान भूमीच्या बांधकामासाठी आदरणीय राऊत साहेब यांनि मोलाचे सहकार्य केले व त्या संदर्भात VIDC कडे पाठपुरावा केला.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • देश की हिफाज़त करते-करते मुजफ्फरपुर की मिट्टी का एक लाल हमेशा के लिए अमर हो गया। #indian #Jawans #jawansrk #viral #bihar #news #Muzaffarpur #trending #BiharNews #AkashPriyadarshi
    1
    देश की हिफाज़त करते-करते मुजफ्फरपुर की मिट्टी का एक लाल हमेशा के लिए अमर हो गया।
#indian #Jawans #jawansrk #viral #bihar #news #Muzaffarpur #trending #BiharNews #AkashPriyadarshi
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Pitam Parjapati
    4
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • वर्ध्याच्या रामनगरात महिलेचे मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावले; घटना सीसीटीव्हीत कैद हिंगणघाटः वर्धा वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गिरीपेठ परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना काल सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अत्यंत चलाखीने पत्ता विचारण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून क्षणार्धात पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन चोरटे दुचाकीवरून परिसरात आले होते. काही अंतरावर दुचाकी थांबवून मागे बसलेला चोरटा खाली उतरला आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या जवळ गेला. पाहता क्षणी त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि तिथेच उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून दोघांनीही धूम ठोकली. या संपूर्ण घटनेचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर संबंधित महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात बाईकस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
    1
    वर्ध्याच्या रामनगरात महिलेचे मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावले; घटना सीसीटीव्हीत कैद
हिंगणघाटः वर्धा
वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गिरीपेठ परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना काल सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अत्यंत चलाखीने पत्ता विचारण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून क्षणार्धात पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन चोरटे दुचाकीवरून परिसरात आले होते. काही अंतरावर दुचाकी थांबवून मागे बसलेला चोरटा खाली उतरला आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या जवळ गेला. पाहता क्षणी त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि तिथेच उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून दोघांनीही धूम ठोकली.
या संपूर्ण घटनेचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर संबंधित महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात बाईकस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • देवळी (जि. वर्धा) : परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीचा पर्दाफाश केल्याच्या कारणावरून एका पत्रकारावर व त्यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना देवळी येथे घडली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे पत्रकार शंकर अंबादास केवदे (रा. देवळी, जि. वर्धा) यांनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीबाबत बातमी प्रसारित केली होती. तसेच या संदर्भात संबंधित पोलिसांसोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सोशल मीडियावर प्रसारित केली होती. सदर बाबीची माहिती संबंधित व्यक्तींना मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकार शंकर केवदे यांना घरातून बोलावून घेतले व त्यांनीच ती रेकॉर्डिंग त्यांना ऐकवली. त्यानंतर “तू आमच्या विरोधात तक्रार का करतोस” या कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर तसेच त्यांच्या पत्नीवर एकत्रितपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या पत्नीच्या हाताला दुखापत झाली असून घटनेदरम्यान आरोपींकडे शस्त्र असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले आहे : रामदास डायरे विशाल पारिसे (देवळी)श्रावण डाहे (रा. निंबोली) सदर सर्व व्यक्ती बेकायदेशीर दारू विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत असून परिसरात त्यांच्या दादागिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केवळ भारतीय दंड संहिता कलम 115 व 352 अंतर्गत गुन्हा नोंद केल्याचे समजते. मात्र घटनेचे स्वरूप गंभीर असताना अधिक कठोर व संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पत्रकार शंकर केवदे यांच्या पत्नीचा मेडिकल रिपोर्ट (MLC) देण्यात न आल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. — शंकर अंबादास केवदे पत्रकार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशन रा. देवळी, जि. वर्धा मोबाईल : 7058416743
    2
    देवळी (जि. वर्धा) : परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीचा पर्दाफाश केल्याच्या कारणावरून एका पत्रकारावर व त्यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना देवळी येथे घडली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे पत्रकार शंकर अंबादास केवदे (रा. देवळी, जि. वर्धा) यांनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीबाबत बातमी प्रसारित केली होती. तसेच या संदर्भात संबंधित पोलिसांसोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सोशल मीडियावर प्रसारित केली होती.
सदर बाबीची माहिती संबंधित व्यक्तींना मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकार शंकर केवदे यांना घरातून बोलावून घेतले व त्यांनीच ती रेकॉर्डिंग त्यांना ऐकवली. त्यानंतर “तू आमच्या विरोधात तक्रार का करतोस” या कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर तसेच त्यांच्या पत्नीवर एकत्रितपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या पत्नीच्या हाताला दुखापत झाली असून घटनेदरम्यान आरोपींकडे शस्त्र असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले आहे :
रामदास डायरे विशाल पारिसे (देवळी)श्रावण डाहे (रा. निंबोली)
सदर सर्व व्यक्ती बेकायदेशीर दारू विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत असून परिसरात त्यांच्या दादागिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केवळ भारतीय दंड संहिता कलम 115 व 352 अंतर्गत गुन्हा नोंद केल्याचे समजते. मात्र घटनेचे स्वरूप गंभीर असताना अधिक कठोर व संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
तसेच पत्रकार शंकर केवदे यांच्या पत्नीचा मेडिकल रिपोर्ट (MLC) देण्यात न आल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
— शंकर अंबादास केवदे
पत्रकार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशन
रा. देवळी, जि. वर्धा
मोबाईल : 7058416743
    user_Shankar Kevade
    Shankar Kevade
    Voice of people देवळी, वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • 8मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटना साकोली च्या वतीने जागतिक महिला दिन व 10 मार्च सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त साकोली पोलिस स्टेशन हाल येथे कार्यक्रम पार पडले त्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.इद्रायणी ताई कापगते‌ महिला समुपदेशीका व सामाजिक कार्यकर्त्या प्रमुख पाहुणे= मा.ॲडव्होकेट बघेले मॅडम फौजदारी न्यायालय साकोली मा माहेश्वरी ताई नेवारे माजी‌ जि .प. सदस्या एकोडी प्रभाग मा.इनवाते मॅडम पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन साकोली बोरकर सर पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन साकोली स्वाती शहारे मॅडम तालुका समुह संघटक उपजिल्हा रुग्णालयात साकोली चौधरी मॅडम उपजिल्हा रुग्णालय कनिष्ठ अभियंता साकोली पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्नी. देवराम चांदेवार व उपाध्यक्ष सौ स्मिता खेडीकर हे होते कार्यक्रमाचे संचालन सौ.जयशिला बारसागडे पोलिस पाटील वटेश्वर स्वागत गीत सौ तिलोत्तमा कठाने ,सौ सुनंदा फंदे सौ वंदना मानापुरे ,सौ जयश्री रामटेके पोलिस पाटील प्रास्ताविक सौ दिक्षा उके पो. पाटील परसटोला आभार सौ ममता डडेमल पोलिस पाटील गडकुंभली कार्यक्रमाची सांगता चहा नाश्ता व राष्ट्रगीताने झाली
    4
    8मार्च जागतिक महिला दिनानिमित्त 
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटना साकोली च्या वतीने जागतिक महिला दिन व 10 मार्च सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त साकोली पोलिस स्टेशन हाल येथे कार्यक्रम पार पडले 
त्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.इद्रायणी ताई कापगते‌ महिला समुपदेशीका व सामाजिक कार्यकर्त्या 
प्रमुख पाहुणे=
मा.ॲडव्होकेट बघेले मॅडम  फौजदारी न्यायालय साकोली 
मा माहेश्वरी ताई नेवारे माजी‌ जि .प. सदस्या एकोडी प्रभाग
मा.इनवाते मॅडम पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन साकोली 
बोरकर सर पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन साकोली 
स्वाती शहारे मॅडम तालुका समुह संघटक उपजिल्हा रुग्णालयात साकोली 
चौधरी मॅडम उपजिल्हा रुग्णालय कनिष्ठ अभियंता साकोली  
पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्नी. देवराम चांदेवार व उपाध्यक्ष सौ स्मिता खेडीकर हे होते 
कार्यक्रमाचे संचालन सौ.जयशिला बारसागडे पोलिस पाटील वटेश्वर 
स्वागत गीत सौ तिलोत्तमा कठाने ,सौ सुनंदा फंदे सौ वंदना मानापुरे ,सौ जयश्री रामटेके पोलिस पाटील 
प्रास्ताविक सौ दिक्षा उके पो.
पाटील परसटोला 
आभार सौ ममता डडेमल पोलिस पाटील गडकुंभली
कार्यक्रमाची सांगता चहा नाश्ता  व राष्ट्रगीताने झाली
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    पत्रकार साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्यातील शासकीय नोकर भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शुल्क कमी करण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. शासकीय नोकर भरती प्रक्रियेत वाढलेल्या शुल्काच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क किमान ५० टक्के कमी करण्याची गरज व्यक्त केली. तसेच समाजातील सर्व घटकांतील गरीब विद्यार्थ्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये प्रवेशासाठी समान संधी मिळावी यासाठी शुल्क सवलत आणि इतर आर्थिक सहाय्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. परीक्षा केंद्रांपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ३०० ते ३५० किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने बस व रेल्वे प्रवासात सवलत देण्याचा विचार करावा, अशी मागणीही आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यासाठी ‘एक्झाम सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ उपक्रम राबवण्याची सूचना करत CSR निधीचा वापर गरीब विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी करावा, असे त्यांनी सांगितले. राज्यातील सव्वा दोन लाख रिक्त पदांची भरती प्रक्रिया लांबणीवर पडणे आणि किचकट प्रक्रिया याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षांचे पाच वर्षांचे पूर्वनियोजित वेळापत्रक तयार करावे, अशी मागणी त्यांनी केली असून यावर मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत इतर राज्ये व केंद्र सरकारच्या परीक्षा प्रक्रियेचा अभ्यास करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
    1
    विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्यातील शासकीय नोकर भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शुल्क कमी करण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. शासकीय नोकर भरती प्रक्रियेत वाढलेल्या शुल्काच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क किमान ५० टक्के कमी करण्याची गरज व्यक्त केली. तसेच समाजातील सर्व घटकांतील गरीब विद्यार्थ्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये प्रवेशासाठी समान संधी मिळावी यासाठी शुल्क सवलत आणि इतर आर्थिक सहाय्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
परीक्षा केंद्रांपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ३०० ते ३५० किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने बस व रेल्वे प्रवासात सवलत देण्याचा विचार करावा, अशी मागणीही आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यासाठी ‘एक्झाम सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ उपक्रम राबवण्याची सूचना करत CSR निधीचा वापर गरीब विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी करावा, असे त्यांनी सांगितले. राज्यातील सव्वा दोन लाख रिक्त पदांची भरती प्रक्रिया लांबणीवर पडणे आणि किचकट प्रक्रिया याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षांचे पाच वर्षांचे पूर्वनियोजित वेळापत्रक तयार करावे, अशी मागणी त्यांनी केली असून यावर मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत इतर राज्ये व केंद्र सरकारच्या परीक्षा प्रक्रियेचा अभ्यास करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.