श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थान मोहटे येथे शारदीय नवरात्र महोत्सव आढावा बैठक संपन्न प्रेसनोट श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थान मोहटे येथे शारदीय नवरात्र महोत्सव, रविवार दि.२२ ऑक्टोबर २०२६ ते रविवार दि. २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीमध्ये संपन्न होत आहे. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहटा देवस्थानच्या सभागृहात नियोजन व आढावा बैठक उपविभागीय अधिकारी तथा श्री मोहटादेवी यात्रा नोडल ऑफिसर श्री प्रसाद मते यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सर्वं शासकीय विभागाने महोत्सव कालावधीमध्ये कोणकोणते करावयाचे कामे याची सविस्तर माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली. बैठकीत तहसीलदार उद्धव नाईक, पाथर्डी नगरपरिषद मुख्याधिकारी श्री संतोष लांडगे, राज्य परिवहन महामंडळाचे आगार व्यवस्थापक श्री अ.बनसोडे, राष्ट्रीय महामार्ग श्री सी. लाड, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे, वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद गोवेकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन दरंदले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल कांबळे, सार्वजनिक बांधकाम जि.प. विभागाचे श्री आर.के.राजळे, महावितरणचे उपभियंता अ.कुकडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चंद्रकांत रासकर, देवस्थानचे विश्वस्त शशिकांत दहिफळे, अशोक दहिफळे, बाळूशेट लाहोटी, बाबासाहेब दहिफळे, उपसरपंच अविनाश फुंदे पाथर्डी तालुका प्रेस क्लबचे पत्रकार , मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे, आदी उपस्थित होते. नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वीच देवी गडाकडे जाणाऱ्या शहरासह सर्वच रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश मते यांनी दिले. तनपूरवाडी ते आयटीआय रस्त्याचा मुद्दाही बैठकीत चर्चेला आला. या रस्त्याचे डांबरीकरण अजून झाले नसून मागील तीन वर्षापासून रस्त्याचे काम करणे बाकी आहे. पुढील वर्षापर्यंत संपूर्ण रस्त्याचे काम केले जाईल असे पाथर्डी नगरपरिषद मुख्याधिकारी श्री संतोष लांडगे यांनी यावेळी सांगितले. बैठकीस अन्न व औषध प्रशासन व दूरसंचार विभागाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. पूर्वसूचना देऊनही बैठकीस गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले. प्रास्ताविक सुरेश भणगे यांनी, तर यांनी आभार श्री शशिकांत दहिफळे मानले. राष्ट्रीय महामार्गालगत असलेली अतिक्रमणे तातडीने काढून टाकावेत, राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गालगतची अतिक्रमणे व काटेरी झुडपे तातडीने हटविण्याचे आदेश यावेळी दिले. पाथर्डी नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमणे तसेच वाहतुकीस अडथळे येणार नाहीत याप्रमाणे रस्ते अतिक्रमण मुक्त करू. अग्निशमन वाहन, फिरते शौचालय, रस्त्यावर पुरेशा लाईट व्यवस्था, आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक रुग्णवाहिका, २४ तास ओपीडी सुरु ठेवणे, पिण्याच्या पाण्याची तपासणी करणे, आवश्यक आरोग्याच्या सुविधा निर्माण करून देणे, श्री मोहटादेवी रस्त्यावर विकेते यांनी केलेले अतिक्रमणे काढून टाकावेत, त्यासाठी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त दिला जाईल. परिवहन विभागाने या वेळी ११० एसटी बसेसची सोय केली जाणार असल्याचे सांगितले. महावितरणने २४ तास विद्युत पुरवठा, डीपी दुरुस्ती, पोल मधील तारेचे गाळे, तसेच पालखी मार्गावरील विद्युत पोल इ. दुरुस्ती केली जाईल असे यावेळी सांगितले. अवैध दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने करण्याची सूचना मते यांनी केली. दरवर्षीपेक्षा यावेळी अधिक बंदोबस्त दिला जाईल, असे पोलीस स्टेशन पाथर्डी यांचे वतीने सांगण्यात आले. गर्दीच्या वेळेस एकेरी वाहतुक करणे, आवश्यक ठिकाणी गेटची व्यवस्था करणे. श्री मोहटादेवी मंदिर ते मोहटागाव पालखी मार्ग दुरुस्त करून घेण्याचे आदेश दिले. वनविभागा मार्फत दरवर्षी प्रमाणे बंदोबस्त देण्याचे यावेळी सांगितले, नवीन अतिक्रमण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, अभियंता आर.के. राजळे यांना उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले.

- ऋषिपंचमी निमित्ताने आज मार्कंडेश्वर पर्वतावरती महिला भाविकांची मोठी गर्दी ऋषिपंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर ती महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती - पुराणात सांगितले आहे की ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी ज्या शेतात बैलाने शेतीमध्ये राबलेले किंवा बैलाच्या साह्याने केलेली शेती त्याच्यातून निघालेले उत्पन्न हे ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांना खाता येत नाही त्या दिवशी सुवासिनी महिला व इतर महिला या सकाळी उठल्यानंतर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करून आल्यानंतर त्या महिला ज्या ठिकाणी ऋषी चे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात . सप्तऋषीपैकी नाशिक जिल्ह्यात करंजी येथे कर्दम ऋषी मार्कंडेश्वर पर्वतावर ती मार्कंड ऋषी त्रंबकेश्वर येथे गौतम ऋषी व मनमाड जवळ अगस्ती ऋषी हे असून या ठिकाणी आज कृषी पंचमी निमित्ताने महिलांनी मोठी गर्दी केली होती . मार्कंडेश्वर पर्वतावरती दर्शनासाठी धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व नगर येथील महिला भाविक ह्या दर्शनासाठी आल्या होत्या . यावेळेस कळवण पोलीस स्टेशन व दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ही ठेवला होता .1
- पंचायत में भ्रष्टाचार की सभी आवेदन दिया गया आवेदन देने के बाद भी खबर में उजागर किया गया था कि भ्रष्टाचार बंद हो सके पंचायत में भ्रष्टाचार की सभी आवेदन दिया गया आवेदन देने के बाद भी खबर में उजागर किया गया था कि भ्रष्टाचार बंद हो सके1
- आईच्या आरोग्यासाठी १२ ज्योतिर्लिंग धावती यात्रा करणाऱ्या मोनूचे त्र्यंबकेश्वर मध्ये उत्स्फूर्त स्वागत त्र्यंबकेश्वर :- आपल्या आईच्या उत्तम आरोग्यासाठी नवस करत देशातील १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प केलेला बिहारमधील धावपटू मोनू सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. मोनूने आतापर्यंत पायांनी तब्बल ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला असून, त्याने आतापर्यंत ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केले आहे. आपल्या या प्रेरणादायी प्रवासादरम्यान मोनूचे आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले. त्यावेळी त्याचे उत्स्फूर्त आणि जोरदार स्वागत करण्यात आले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, कैलास मोरे आणि योगेश महाले यांनी मोनूचे स्वागत करून त्याच्या या अनोख्या संकल्पाला शुभेच्छा दिल्या. यानंतर मोनूने Sapkal Knowledge Hub येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी देशभरात विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेले विविध प्रश्न, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता तसेच MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या यावरही त्याने भाष्य केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोनूने मेहनत, सातत्य आणि ध्येयावर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचेही यावेळी व्यक्त करण्यात आले. मोनूचा हा प्रवास केवळ धार्मिक यात्रा नसून आईच्या आरोग्यासाठी केलेला संकल्प, श्रद्धा, जिद्द, शारीरिक क्षमता आणि देशभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश देणारा ठरत आहे. महाराष्ट्रात मोनू चर्चेचा विषय आईच्या आरोग्यासाठी नवस करून १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन निघालेला बिहारचा मोनू सध्या महाराष्ट्रात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास आणि ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करून त्याची ही प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे.1
- शबरी योजनेतील ९९० गायींचे वास्तव काय? ७० हजारांची गाय की कागदोपत्री समृद्धी? एकच गाय चार वेळा खरेदी दाखवल्याचा शेतकऱ्यांचा गंभीर आरोप; व्यापारी–अधिकाऱ्यांच्या संगनमताची चौकशी करण्याची मागणी1
- एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन.. एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन.. अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात गणपती बाप्पांचे झांज व ढोलताशाच्या गजरात आगमन झाले. बाप्पांच्या आगमनासाठी संस्थेचे खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड हे उपस्थित होते. खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. तसेच प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बाप्पांच्या दर्शन घेतले. सर्वांनी बाप्पांकडे आपल्या व आपल्या देशासाठी शांतता, सुख व समृद्धी ची प्रार्थना केली.सर्वांना मोदक व खिरापत वाटप करण्यात आली. सदर बाप्पांच्या आगमनासाठी संदीप वाकचौरे, बाळासाहेब सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक दीपक खैरनार, अजहर खतीब, गणेश सोनवणे, मयूर भागवत सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.4
- कुडूस नाका अतिक्रमणमुक्तीसाठी संघर्ष समिती आक्रमक; विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस नाका येथील अतिक्रमण आणि रस्त्याच्या प्रश्नावर आता ५२ गाव अतिक्रमणमुक्त बाजारपेठ संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ५२ गाव अतिक्रमणमुक्त बाजारपेठ संघर्ष समितीच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले. कुडूस नाका परिसरातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या ४५ मीटर मार्किंगप्रमाणे खुला करण्यात यावा, ही समितीची प्रमुख मागणी आहे. यासोबतच कुडूस येथे नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच कुडूस येथील ब्रिटिशकालीन धर्मशाळा सार्वजनिक वापरासाठी खुली करण्यात यावी, अशी मागणी संघर्ष समितीने प्रशासनाकडे केली आहे. कुडूस नाका परिसरातील अतिक्रमण, रस्त्याची रुंदी, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेचा वापर यासंदर्भातील अनेक मुद्दे निवेदनातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहेत. दरम्यान, या मागण्यांबाबत प्रशासनाकडून सकारात्मक आणि ठोस निर्णय घेण्यात आला नाही, तर कुडूस नाका येथे संघर्ष समितीच्या माध्यमातून भव्य जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन कुडूस नाका परिसरातील प्रश्नांवर काय भूमिका घेते, याकडे ५२ गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. कुडूस नाका अतिक्रमणमुक्त होणार का? ४५ मीटर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार का? आणि संघर्ष समितीच्या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.2
- पंचायत में भ्रष्टाचार की सभा आवेदन दिया गया आवेदन देने के बाद भी खबर में उजागर किया गया था कि भ्रष्टाचार बंद हो सके पंचायत में भ्रष्टाचार की सभा आवेदन दिया गया आवेदन देने के बाद भी खबर में उजागर किया गया था कि भ्रष्टाचार बंद हो सके1
- इलाज के नाम पर शर्मनाक हरकत? 15 साल की बच्ची ने डॉक्टर पर लगाए गंभीर आरोप ऐसी महत्वपूर्ण खबरों के लिए इलाज के नाम पर शर्मनाक हरकत? 15 साल की बच्ची ने डॉक्टर पर लगाए गंभीर आरोप ऐसी महत्वपूर्ण खबरों के लिए1