संगमनेरात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार सन्मान सोहळा संगमनेरात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉक्टरांना साहेब शिंदे पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे तसेच डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट यांना तर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृति पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांना जाहीर झाला असून सहकारातील आदर्श नेतृत्व हा पुरस्कार माजी आमदार राजेश टोपे यांना जाहीर करण्यात आला आहे. 12 जानेवारी 2025 रोजी दु.12.30 वा. यशोधन कार्यालयाजवळील मैदान येथे या पुरस्कार सोहळ्यासाठी कोल्हापूरचे काँग्रेस पक्षाचे खासदार शाहू महाराज व आमदार विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात येणार असल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे व युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी दिली आहे. यावर्षी कृषी, तंत्रज्ञान, शिक्षण ,समाजसेवा आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल असणारा डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांना जाहीर झाला आहे. तर साहित्य ,समाजसेवा, पर्यावरण, माध्यम आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा.डॉ. रावसाहेब कसबे यांना जाहीर झाला आहे याचबरोबर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार राज्याचे माजी आमदार राजेश टोपे यांना जाहीर झाला आहे. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.