Shuru
Apke Nagar Ki App…
Shivrajya Band Chandwad 55 New Gadi Opening | #Sambhal_Kawadi | शिवराज्य बँड चांदवड | New Gadi
Binod singh
Shivrajya Band Chandwad 55 New Gadi Opening | #Sambhal_Kawadi | शिवराज्य बँड चांदवड | New Gadi
More news from Chandvad and nearby areas
- गुलब्या चांदवड कांदा ...1
- चांदवड । किराणा दुकानातुन ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या अज्ञाताने लांबवल्या1
- Mama deola and mama no #network at it1
- शेतकऱ्यांच्या व्यथा रोज मरे त्याला कोण रडे....... निसर्ग,सरकार आणि बाजार अशा तिघांकडूनही शेतकरी मार खात आहे. जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक देश म्हणून भारताची ओळख आहे. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, आंध्रप्रदेश, तेलंगणा अशा विविध राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतात. कांदा उत्पादनात आपला देश स्वयंपूर्ण आहे. लासलगाव,पिंपळगाव-बसवंत, उमराणे, सटाणा, मनमाड, येवला या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी कांदा विक्री करण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसत आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची आर्थिक नस असलेल्या या नगदी पिकाला जेव्हा भाव नसतो तेव्हा त्याचा विपरीत परिणाम येथील इतर व्यवसायावरही स्पष्ट जाणवू लागतो. जिल्ह्यातील बहुतांशी तालुके व प्रमुख गावांमध्ये संपूर्ण व्यापाराची भिस्त नेहमीच शेतकऱ्यांवर अवलंबून राहिलेली आहे.शेतकऱ्याच्या हाती दोन पैसे आले तरच ग्रामीण भागातील बाजारपेठेत रेलचेल असते. मात्र सरकारचे कांद्याबाबत योग्य धोरण नसल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आज ही कायम आहेत.मागील काही वर्षापासून सातत्यानं कांद्याच्या भावातील चढउतार त्यामुळे सतत कवडीमोल भावानं तो विकावा लागतो. कधीतरी कांदा टंचाई निर्माण झाली की थोडाफार भाव मिळतो.मात्र तशी परिस्थिती निर्माण होताच सरकार शहरातील ग्राहक डोळ्यासमोर ठेऊन कांदा भाव नियंत्रणात आणण्यासाठी कांदा आयात करते.तसेच व्यापाऱ्यांवर बंधन आणून कांद्याचे भाव पाडले जातात. त्यामुळे आम्ही कांदा उत्पादक शेतकरी त्यात भरडले जातो.असं शेतकऱ्यांचं मत आहे.1
- श्री मारुती पानगव्हाणे उगाव, निफाड.... मी कांदा पिकात पाण्याची व्यवस्थापन फाईलचे निरो वापरून करणार आहे.... आपण देखील आपल्या कांदा पिकात पाणी व्यवस्थापनासाठी फायलोची निरो वापरू शकता..1
- *एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा.* प्रतिनिधी सचिन वखारे येवला अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्री.चक्रधर स्वामी यांची जयंती व भारताचे द्वितीय राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक एच. पी. सजन, प्रा. सौ.विनिता अमोल सोनवणे, संस्थेचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्रा. आर. बी. गायकवाड हे होते, तर अध्यक्षस्थानी स्कूलचे प्रिन्सिपल अल्ताफ खान हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला व श्री.चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला व सहकार व शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्यमाला अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी देवरे तर पाहुण्यांचा परिचय अजहर खतीब यांनी उपस्थितांना करून दिला.यानंतर स्कुलच्या वतीने सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. इ.सहावीच्या विद्यार्थिनी खदीजा खान, पायल माळी, तन्वी माळी, ईश्वरी आहेर यांनी शिक्षक गीत सादर केले.मधुरा आहेर व खुशी भागवत यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले भाषण सादर केले.प्रमुख पाहुणे आर.बी.गायकवाड, एच.पी. सजन यांनी विद्यार्थी जीवनात शिक्षकांचे योगदान किती आवश्यक असते हे नमूद केले व शिक्षक दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या.आज प्रिन्सिपल झालेला विद्यार्थी प्रज्ज्वल निकम याने ही आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणांत प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्माता आहे असे नमूद केले.यावेळी इ.दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना भेट वस्तू दिली.संपूर्ण दिवस दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गावर जाऊन तासिका घेतल्या,विद्या दानाचे कार्य केले.एका दिवसाचे शिक्षक बनून शिकवण्याचा आनंद घेतला. याप्रसंगी गणेश सोनवणे,अमोल आहेर, अजीम पटेल,सचिन घोडके, राजेश कांबळे,माधुरी माळी, अर्चना एंडाईत,निलिमा देशमुख,सुनीता वडे,शोभा निकम,धनश्री काळंगे, मयुरी गोरे, श्वेता बोरावके आदि सह सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणीता कचरे व श्रावणी सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.1
- नांदगाव तालुक्याचे चे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार व भावी मंत्री माननीय श्री. सुहासजी (आण्णा ) कांदे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा1
- फळ्यावर साकारलेली अतिशय सुंदर जिवंत कलाकृती चांदवड#बैलपोळाची जिवंत कलाकृती1