Shuru
Apke Nagar Ki App…
Nanded बाजार में पहले रोज़े इफ्तार की खरीदी का मंज़र
Today One Live
Nanded बाजार में पहले रोज़े इफ्तार की खरीदी का मंज़र
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नांदेड मध्ये महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून नांदेड येथील कुसुम सभागृहात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, वसमत रोड खानापूर फाटा येथील भव्य मिरवणुकीसाठी शिवप्रेमींना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन1
- 🔱 महाशिवरात्री यात्रा उत्सवात शिवजयंती उत्साहात साजरी! 🚩 हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात सुरू असलेल्या महाशिवरात्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात Chhatrapati Shivaji Maharaj यांची जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. पारायणार्थी महिला मंडळाच्या पुढाकारातून झालेल्या या सोहळ्यात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या शौर्य, पराक्रम व स्वराज्य स्थापनेच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. प्रवचनातून शिवचरित्राचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले असून भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. 🚩🔱 #हिमायतनगर #महाशिवरात्री2026 #शिवजयंती #छत्रपतीशिवाजीमहाराज #श्रीपरमेश्वरमंदिर हरिनामसप्ताह ज्ञानेश्वरीपारायण धार्मिकउत्सव NNLDigitalMedia1
- धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांन बरोबर केली शिवजयंती साजरी1
- आर्णी पोलीस स्टेशन हददीत नागपूर-तुळजापूर हायवे लगत ढाब्यावर चालू असलेला अंमली पदार्थ (Drugs) विक्रीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून भांडाफोड 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा), 27 किलो 721 ग्रॅम Poppy Straw (डोडा पावडर) व इतर साहीत्य असा लाखो रुपयाचा मुददेमाल जप्त NDPS कायदया अंतर्गत कारवाई यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत. दिनांक 18/02/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना 15/30 वाजता सुमारांस गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, पोलीस स्टेशन आर्णी हददीतील सरबजीतहसंग ऊर्फ करण ढिलोन हा त्याचे मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या दशमेश पंजाबी ढाबा येथे अंमली पदार्थ Heroin (चिट्टा) व Poppy Straw (डोडा पावडर) अंमली पदार्थ विक्री करीत आहे. अशी माहीती मिळाल्याने त्या संदर्भात प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस स्टेशन आर्णी हददीत मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या सरबजीतसिंग ऊर्फ करण ढिलोन याचे दशमेश पंजाबी ढाबा येथे रात्री 19/30 वाजता राजपत्रीत अधिकारी, कृषी अधिकारी, पंच व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अतिशय कौशल्यपुर्णरितीने छापा टाकून दोन इसमांस ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1) सरबजीतसिंग ऊर्फ करण भुटटासिंग ढिलोन वय 37 वर्ष, रा. दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आणि जि. यवतमाळ 2) जगिरसिंग मख्त्यारसिंग सिंधू वय 53 वर्ष, रा.दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आणि जि. यवतमाळ असे सांगितले. त्याचे समक्ष दशमेश पंजाबी ढाबा यांची झडती घेतली असता ढाब्यामध्ये अंमली पदार्थ 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा) किंमत 1,81,500/-रु तसेच Poppy Straw (डोडा पावडर) 27 किलो 721 ग्रॅम किंमत 1,38,605 व इतर साहीत्य असा एकूण 3,35,245/-रुचा मुददेमाल जप्तीसह नमूद इसमा विरुध्द अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8 (c), 15 (b), 21(b) अन्वये पोलीस स्टेशन आर्णी येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती. सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा श्री. सिध्देश्वर भोरे सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, सपोनि मनिष गावंडे, पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच मा. नायब तहसिलदार आर्णी श्री संतोष आदगुलवाड, कृषी अधिकारी आर्णी श्री. आनंद बदखल, फॉरेन्सीक टिम यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.3
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- 📚🚩 हिमायतनगरात शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य सामान्य ज्ञान परीक्षा – २०२६! हिमायतनगर सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेला तब्बल 2000 विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वरिष्ठ व कनिष्ठ गटात, तसेच मराठी व सेमी इंग्लिश माध्यमात दोन सत्रांमध्ये परीक्षा पार पडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अशा शैक्षणिक उपक्रमांचा जयंती उत्सवात सातत्याने समावेश व्हावा, असे आवाहन केले. आकर्षक रोख बक्षिसे, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रांमुळे स्पर्धकांमध्ये विशेष उत्साह आणि चुरस पाहायला मिळाली. शिवजन्मोत्सवाला शैक्षणिक व विधायक दिशा देणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला. 👏 #हिमायतनगर #शिवजयंती2026 #सामान्यज्ञानपरीक्षा #विद्यार्थीउत्सव #छत्रपतीशिवाजीमहाराज #शैक्षणिकउपक्रम #NNLDigitalMedia1
- परभणी (प्रतिनिधी) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साह, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते. या निमित्ताने जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. त्यांच्या या प्रेरणादायी कृतीमुळे युवकांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला असून अनेकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेत सहभाग नोंदवला. “शिवरायांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी कार्य करणे हीच खरी सेवा आहे,” असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साह, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.1