Shuru News - विशेष माहिती* *हेडलाईन* _कुटुंबाला मोठा दिलासा! घर, फ्लॅट किंवा शेतजमीन नावावर करताना आता फक्त ₹200 नोंदणी शुल्क_ *Shuru News - विशेष माहिती* *हेडलाईन* _कुटुंबाला मोठा दिलासा! घर, फ्लॅट किंवा शेतजमीन नावावर करताना आता फक्त ₹200 नोंदणी शुल्क_ *महाराष्ट्र : Shuru News वृत्तसेवा | दिनांक: 1 ऑगस्ट 2026* मालमत्ता हस्तांतरणासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात, ही सर्वसामान्यांची समजूत आता बदलणार आहे. महाराष्ट्र शासनाने कुटुंबातील सदस्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार घर, फ्लॅट, प्लॉट किंवा शेतीची जमीन रक्ताच्या नात्यातील व्यक्तीच्या नावावर बक्षीसपत्र `Gift Deed` द्वारे हस्तांतरित केल्यास नोंदणीसाठी फक्त *₹200 शुल्क* आकारले जाणार आहे. अनेकांना वाटते की मालमत्ता नावावर करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणीवर मोठा खर्च येतो. पण शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार विशिष्ट नातेवाईकांमध्ये `बक्षीसपत्र` केले तर दस्तऐवज नोंदणीसाठी केवळ 200 रुपये मोजावे लागतील. *बक्षीसपत्र म्हणजे काय?* बक्षीसपत्र म्हणजे कोणताही मोबदला न घेता आपली मालमत्ता दुसऱ्याला स्वेच्छेने देणे. यात घर, फ्लॅट, शेती, दुकान अशा सर्व मालमत्तांचा समावेश होऊ शकतो. ही सवलत प्रामुख्याने आई-वडील, मुले, नवरा-बायको, भाऊ-बहीण यांसारख्या जवळच्या नातेवाईकांसाठी लागू आहे. यामुळे कुटुंबातील मालमत्तेचे हस्तांतरण आता अधिक सुलभ आणि कमी खर्चात होणार आहे. कायदेविषयक गुंतागुंत टाळून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी शासनाचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मालमत्ता हस्तांतरण करू इच्छिणाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
Shuru News - विशेष माहिती* *हेडलाईन* _कुटुंबाला मोठा दिलासा! घर, फ्लॅट किंवा शेतजमीन नावावर करताना आता फक्त ₹200 नोंदणी शुल्क_ *Shuru News - विशेष माहिती* *हेडलाईन* _कुटुंबाला मोठा दिलासा! घर, फ्लॅट किंवा शेतजमीन नावावर करताना आता फक्त ₹200 नोंदणी शुल्क_ *महाराष्ट्र : Shuru News वृत्तसेवा | दिनांक: 1 ऑगस्ट 2026* मालमत्ता हस्तांतरणासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात, ही सर्वसामान्यांची समजूत आता बदलणार आहे. महाराष्ट्र शासनाने कुटुंबातील सदस्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार घर, फ्लॅट, प्लॉट किंवा शेतीची जमीन रक्ताच्या नात्यातील व्यक्तीच्या नावावर बक्षीसपत्र `Gift Deed` द्वारे हस्तांतरित केल्यास नोंदणीसाठी फक्त *₹200 शुल्क* आकारले जाणार आहे. अनेकांना वाटते की मालमत्ता नावावर करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणीवर मोठा खर्च येतो. पण शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार विशिष्ट नातेवाईकांमध्ये `बक्षीसपत्र` केले तर दस्तऐवज नोंदणीसाठी केवळ 200 रुपये मोजावे लागतील. *बक्षीसपत्र म्हणजे काय?* बक्षीसपत्र म्हणजे कोणताही मोबदला न घेता आपली मालमत्ता दुसऱ्याला स्वेच्छेने देणे. यात घर, फ्लॅट, शेती, दुकान अशा सर्व मालमत्तांचा समावेश होऊ शकतो. ही सवलत प्रामुख्याने आई-वडील, मुले, नवरा-बायको, भाऊ-बहीण यांसारख्या जवळच्या नातेवाईकांसाठी लागू आहे. यामुळे कुटुंबातील मालमत्तेचे हस्तांतरण आता अधिक सुलभ आणि कमी खर्चात होणार आहे. कायदेविषयक गुंतागुंत टाळून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी शासनाचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मालमत्ता हस्तांतरण करू इच्छिणाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
- अण्णाभाऊंच्या ‘माझी मैना’ या अजरामर रचनेबद्दल तुम्हाला हे सत्य आधी माहिती होतं का? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! अण्णाभाऊंच्या ‘माझी मैना’ या अजरामर रचनेबद्दल तुम्हाला हे सत्य आधी माहिती होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇1
- वसई विरार महानगरपालिका आयुक्ताच्या मौन भूमीकीमुळे अतिक्रमणला आला हुत वसई-विरार महानगरपालिका : आयुक्तांच्या मौन भूमिकेमुळे 'त्रिमूर्ती' दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि मनोज घरत यांचे प्रभाग 'जी' मध्ये वर्चस्व? अनधिकृत बांधकामांना पुन्हा ऊत, असा आरोप वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग 'जी' मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा आरोप नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तक्रारदारांकडून सातत्याने केला जात आहे. अनेक तक्रारी, पुरावे आणि वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.तक्रारदारांचा आरोप आहे की अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि मनोज घरत* यांच्या कार्यपद्धतीमुळे अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे भूमाफियांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित अधिकाऱ्यांनीही याबाबत सार्वजनिक स्पष्टीकरण दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. नागरिकांमध्ये असा प्रश्न विचारला जात आहे की, प्रशासनाचे मौन हे केवळ विलंबामुळे आहे की अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईबाबत ठोस निर्णयाचा अभाव आहे?जर कायद्याचे राज्य टिकवायचे असेल, तर कोणताही दबाव, प्रभाव किंवा हस्तक्षेप न मानता अनधिकृत बांधकामांवर तातडीने आणि निष्पक्ष कारवाई होणे आवश्यक आहे.1
- भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद सोलापूर तथा माजी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास मंडल अध्यक्ष विजय मगर, विजय इंगोले, विशाल बनसोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- विजेच्या धक्क्याने दोन दिवसात दोन गायी ठार ;भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथील घटना विजेच्या धक्क्याने दोन दिवसांत दोन गायी ठार ; हरिश्चंद्रीतील धोकादायक विद्युत वाहिन्यांवर प्रश्नचिन्ह. विक्रम शिंदे /भोर दि. 1ऑगस्ट हरिश्चंद्री, ता. भोर : राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२६ रोजी घडली. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने याच परिसरात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात विद्युत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, महावितरणच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना जीविताला धोका निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील लाईनची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित झाडे , शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली. सलग दोन घटनांनंतर महावितरणकडून कोणती कारवाई केली जाणार? मृत गायींच्या मालकांना नुकसानभरपाई मिळणार का? तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.2
- कर्जमाफी प्रोसेस वर्षभर सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे1
- प्रभाग १२ मध्ये जुनी भाजी मंडई परिसरात मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य प्रभाग १२ मधील मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप आण्णाभाऊ साठे जयंतीसाठी परिसर स्वच्छ, मात्र संपूर्ण वाड्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार लोणंद : प्रभाग क्रमांक १२ मधील जुनी भाजी मंडई परिसरातील मातंगवस्तीत सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ज्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या परिसराची संबंधित विभागाकडून साफसफाई करण्यात आली. मात्र, संपूर्ण मातंगवस्तीतील अंतर्गत रस्ते व परिसर घाणीतच राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नियमित स्वच्छता होत नसल्याने कचऱ्याचे ढीग, साचलेली घाण आणि अस्वच्छ वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशी केवळ कार्यक्रमस्थळापुरती साफसफाई करून उर्वरित वस्तीची उपेक्षा करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावेळी बोलताना स्थानिक नागरिक प्रकाश खंडागळे म्हणाले, "मातंगवस्तीत माणसे राहतात, जनावरे नाहीत. आम्हालाही स्वच्छ परिसरात राहण्याचा अधिकार आहे. प्रशासनाने केवळ औपचारिक साफसफाई न करता संपूर्ण वस्तीची नियमित स्वच्छता करावी." नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने संपूर्ण मातंगवस्तीची स्वच्छता करून नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला.1
- "संजय राऊतांनी आपल्या लायकीत राहून बोलावं; अमित शहांवरील टीकेवर मंत्री नितेश राणे यांचा पलटवार"1
- भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.अशी माहिती जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली जाहीर आवाहन भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.अशी माहिती जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली पुढे खडसे म्हणाल्या या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जळगांव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला तसेच आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच खडसे म्हणाल्या माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, पूरग्रस्त किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि गरजू व बाधित बांधवांना शक्य ती मदत करावी. आपली सतर्कता आणि परस्पर सहकार्य हीच या संकटाच्या काळात सर्वात मोठी ताकद आहे.1
- रशियामध्ये राजकपूर नंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे रशिया देशाला प्रिय आहेत सांगली जिल्ह्याचे सुपुत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दीड दिवस शाळा शिकली पण राज कपूर नंतर रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बांधण्यात आला व त्या ठिकाणीही त्यांचे चाहते आहेत1