पार्किंगच्या वादातून पैठण गेटमध्ये तुफान राडा; एकाच कॉलवर टोळके जमले, दुकानात घुसून हाणामारी छत्रपती संभाजीनगर... ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण गेट परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादाने हिंसक वळण घेतले. मोहन टॉकीजसमोरील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स दुकानात दोन गट आमनेसामने येत दुकानात घुसून तुंबळ हाणामारी केली. एका कॉलनंतर मोठे टोळके घटनास्थळी पोहोचल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी तत्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. विशेष म्हणजे, या घटनेत कोणताही पक्ष तक्रार देण्यास पुढे आला नाही. त्यामुळे सिटी चौक पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटांतील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पार्किंगवरून सुरू झालेला हा वाद पुन्हा उफाळून थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली असून, प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल असगर शेख करत आहेत.
पार्किंगच्या वादातून पैठण गेटमध्ये तुफान राडा; एकाच कॉलवर टोळके जमले, दुकानात घुसून हाणामारी छत्रपती संभाजीनगर... ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण गेट परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादाने हिंसक वळण घेतले. मोहन टॉकीजसमोरील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स दुकानात दोन गट आमनेसामने येत दुकानात घुसून तुंबळ हाणामारी केली. एका कॉलनंतर मोठे टोळके घटनास्थळी पोहोचल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी तत्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. विशेष म्हणजे, या घटनेत कोणताही पक्ष तक्रार देण्यास पुढे आला नाही. त्यामुळे सिटी चौक पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटांतील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पार्किंगवरून सुरू झालेला हा वाद पुन्हा उफाळून थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली असून, प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल असगर शेख करत आहेत.
- सरला बेटाला पाण्याचा वेढा; गोदावरीच्या कुशीत खुलले निसर्गाचे अद्भुत रूप छत्रपती संभाजीनगर... सरला बेटाला पाण्याचा वेढा; गोदावरीच्या कुशीत खुलले निसर्गाचे अद्भुत छत्रपती संभाजीनगर... रूप सौजन्य : भगवान फोटो ANC : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीपात्रात वसलेले ६५ एकरांचे सराला बेट सध्या निसर्गसौंदर्याने नटले आहे. यंदाच्या मान्सूनमधील सलग ५९ दिवसांच्या पावसानंतर बेटाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला असून, दाट हिरवळ आणि मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर संकुल पर्यटक व भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात सराला बेटावर खुललेले हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. ANC : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीपात्रात वसलेले ६५ एकरांचे सराला बेट सध्या निसर्गसौंदर्याने नटले आहे. यंदाच्या मान्सूनमधील सलग ५९ दिवसांच्या पावसानंतर बेटाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला असून, दाट हिरवळ आणि मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर संकुल पर्यटक व भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात सराला बेटावर खुललेले हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.1
- शाळेच्या खिचडीत काच; पेडणेकरांचा थेट तुकाराम मुंढेंना फोन!1
- जालन्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती पोलीस बँडची मनोवंदनाने सुभाष चंद्र बोस संस्था चे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते उत्साहून वातावरण संपन्न या दिवशी लोकांना मिथेपिया वाटण्यात आले1
- मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! अनधिकृत बांधकामावर कारवाई, पाडलेल्या दुकानाची नुकसानभरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी.. मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! अनधिकृत बांधकामावर कारवाई, पाडलेल्या दुकानाची नुकसानभरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी.. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असतानाही डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप.. आज दिनांक 01 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित अनधिकृत बांधकाम आणि दुकान पाडल्याच्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. विविध मागण्यांसाठी महेबुब कुरेशी, इरफान कुरेशी, नदीम शेख आणि अरमान शेख या चार रहिवाशांनी 27 जुलैपासून जालना महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले असून, आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित विनापरवानगी बांधकाम तातडीने हटवावे, पाडण्यात आलेल्या दुकानाची नुकसानभरपाई द्यावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अ1
- जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण1
- भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून1
- अचानक प्रकृती बिघडली; भेटीदरम्यान अभिजीत दिपके यांना उलटी, नागरिकांना न भेटताच निवासस्थानी परतावे लागले छत्रपती संभाजीनगर | कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची शनिवारी अचानक प्रकृती बिघडली. नागरिकांच्या भेटीगाठी सुरू असतानाच त्यांना अचानक मळमळ होऊन उलटी झाल्याने उपस्थितांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्यांनी पुढील भेटी रद्द करून तातडीने आपल्या निवासस्थानी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उपचारासाठी डॉक्टर त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.2
- जनहिताच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; जालन्यातील प्रत्येक तालुक्यात ‘रघुपती राघव सत्याग्रह’ आंदोलन करण्याचा निर्णय.. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी, NEET पेपरफुटी व पीककर्जाच्या प्रश्नांवर सरकारविरोधात आंदोलनाचा निर्णय जनहिताच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; जालन्यातील प्रत्येक तालुक्यात ‘रघुपती राघव सत्याग्रह’ आंदोलन करण्याचा निर्णय.. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी, NEET पेपरफुटी व पीककर्जाच्या प्रश्नांवर सरकारविरोधात आंदोलनाचा निर्णय आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अंबड रोडवरील संपर्क कार्यालयात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ‘रघुपती राघव सत्याग्रह’ आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीत विशेषतः शेतकरी कर्जमाफीच्या यादीतील त्रुटी व कथित गैरव्यवहार, लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा समावेश, NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरण, शेतकऱ्यांना पीककर्ज वितरणातील अडचणी तसेच स्थानिक पातळीवरील विविध जनहिताच्या प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. या सर्व प्रश्नांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आंदोलन उभारण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनप्रतिनिधी यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन आंदोलनाची रूपरेषा, नियोजन आणि पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी दिली. ‘शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार’, अशी भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली. शासनाने नागरिकांच्या या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याला श्रद्धांजली बैठकीच्या प्रारंभी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्वर्गीय सवईराम जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या सामाजिक व पक्षीय योगदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले. या बैठकीस राजाभाऊ देशमुख, अशोक उबाळे, भाऊसाहेब सोळुंके, सुभाष कोळकर, संजय इंगळे, शांतीलाल बनसोडे, संजय मुथा, राजाभाऊ कुलकर्णी, शिवाजी वाघ, सुखलाल राठोड, राधाकिसन माने, विलास टाकसाळ, बाजीराव खरात, रहीम शेख, विष्णू गजर, राजेंद्र प्रधान, रऊफ परशुवाले, गंगाधर कवठे, देवराव डोंगरे, राधाकिसन शिंदे, जावेद खान पठाण, दिनेश राका, सुनील चौधरी, प्रदीप लेकरवाळे, दिग्विजय धांडगे, गणेशराव आडे, अविनाश चव्हाण, सुरेश पवार, ज्ञानेश्वर शिंदे, प्रकाश घुले, शेख इब्राहिम, अंकुश राऊत, सीताराम अग्रवाल, ज्ञानेश्वर डूकरे, सुभाष मगरे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन अशोक उबाळे व सुभाष कोळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शांतीलाल बनसोडे यांनी केले.1
- भिवंडी येथील गंगाराम वाडी येथील चार मजली इमारत कोसळून आठ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू भिवंडी येथील गंगाराम वाडी येथील चार मजली इमारत कोसळून आठ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू तसेच अनेक जण जखमी असल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..1