शिंदे पाटील चषक २०२६' मध्ये खासदार भास्करराव भगरे यांच्याकडून खेळाडूंचे कौतुक; सामाजिक उपक्रमाचीही प्रशंसा येथील शिंदे पाटील फाऊंडेशनतर्फे आयोजित भव्य टेनिस बॉल डे-नाईट क्रिकेट स्पर्धा, अर्थात 'शिंदे पाटील चषक २०२६' सध्या मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या स्पर्धेला दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला. यावेळी बोलताना खासदार भगरे म्हणाले की, "खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते युवकांमध्ये शिस्त आणि जिद्द निर्माण करण्याचे उत्तम माध्यम आहे." खेळासोबतच १०० गरजू कुटुंबांना किराणा वाटप करण्याच्या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. आयोजक अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे पाटील यांच्या हस्ते खासदारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कुणाल दराडे, शाहू राजे शिंदे, विशाल परदेशी, नाना भाऊ शिंदे, अरुण काका शिंदे, शंभूराजे शिंदे, प्रशांत शिंदे, दादा फिटर, सुनील शिंदे, अमोल शिंदे, प्रशांत शिनकर, संजय शिंदे, दीपक गुप्ता, दीपक घिगे, पप्पू वाणी, राजू बाकळे आणि योगेश सोनवणे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदारांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेची रंगत वाढली असून खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

- 👉में निधि कुमारी ; हम अपने होश हवास में बोल रही हूँ की मेरे गार्जियन मेरे मर्जी बगैर कही और एक उम्रदराज लड़का के साथ शादी करवा रही थी जिसके वजह से हम अपने मर्जी से घर से निकल कर इस लड़का के साथ खुशहाल शादी कर लिए है और हम जहां भी है इसके साथ खुश है और इसके बारे में हम अपने गार्जियन को कुछ दिन पहले जानकारी भी दिए थे अगर इस लड़का को या इसके परिवार को किसी भी प्रकार के दबाव दिया जाता है तो इसका जिम्मेवार मेरे परिवार और इसमें शामिल मेरे रिश्तेदार होगे !!1
- 👩💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*1
- सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा1
- पिंपळनेर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, बैलांच्या झुंजीत सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत राजधर गंभीर भोई हे गंभीर जखमी झाले आहेत.1
- जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान घडलेली एक गंभीर घटना समोर आली आहे. शेख नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यास बळजबरीने पत्र देत ते वाचण्यासाठी कोणताही वेळ न देता त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्याचे संबंधित व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेमुळे उपोषणकर्ते व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, या प्रकरणात वाद निर्माण करून उपोषणकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, जी अत्यंत गंभीर बाब आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा सन्मान राखणे आवश्यक असताना अशा प्रकारची जबरदस्ती अयोग्य व निषेधार्ह आहे. त्यामुळे संबंधित घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच, अशा प्रकारे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून तात्काळ बदली करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी मागणीही करण्यात येत आहे. #अहिल्यानगर #जिल्हाधिकारी #मुख्यमंत्री1
- माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल2
- येवला: श्री ऋणमुक्तेश्वर महादेव भक्त परिवाराच्या वतीने शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या दोन भव्य संकल्पित प्रवेशद्वारांपैकी, नांदगाव रोडवरील प्रवेशद्वाराचे अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भक्तीमय वातावरणात भूमिपूजन संपन्न झाले. भोलेनाथांच्या आशीर्वादाने आणि एका महान दात्याच्या गुप्तदानामुळे हे भव्य प्रवेशद्वार साकार होत आहे. सदर दात्याने केलेल्या या निस्वार्थ सेवेबद्दल सर्व भक्त परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली आहे. नांदगाव रोडचे काम सुरू झाले असून, वैजापूर रोडवरील दुसऱ्या प्रवेशद्वाराचे कामही लवकरच पूर्णत्वास येईल, असा संकल्प यावेळी सोडण्यात आला. या मंगलप्रसंगी डॉ. निलेश पटेल, सोमनाथ गुंड, अतिष लाड, अतुल घटे, चेतन चवळे, प्रशांत वडनेरे, मोनल बाकळे, चंचल सुपेकर, कान्हा नागपुरे, अक्षय चव्हाण, कृपल पटेल, कुणाल सोनवणे, संदीप लकारे यांसह महादेव भक्त परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशद्वारामुळे शहराच्या सौंदर्यात तर भर पडेलच, शिवाय भाविकांसाठी ही एक आनंदाची पर्वणी ठरणार आहे. 'ऋणमुक्तेश्वर महादेव सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करो', अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.1
- शिरपूर तालुक्यातील खैरखुटी येथे पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ललिता सुनिल पावरा असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती सुनिल सायमल पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.1
- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”1