अहिल्यानगर: उपोषणस्थळी पोलीस वर्तनावरून संताप, चौकशीची मागणी.. जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान घडलेली एक गंभीर घटना समोर आली आहे. शेख नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यास बळजबरीने पत्र देत ते वाचण्यासाठी कोणताही वेळ न देता त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्याचे संबंधित व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेमुळे उपोषणकर्ते व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, या प्रकरणात वाद निर्माण करून उपोषणकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, जी अत्यंत गंभीर बाब आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा सन्मान राखणे आवश्यक असताना अशा प्रकारची जबरदस्ती अयोग्य व निषेधार्ह आहे. त्यामुळे संबंधित घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच, अशा प्रकारे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून तात्काळ बदली करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी मागणीही करण्यात येत आहे. #अहिल्यानगर #जिल्हाधिकारी #मुख्यमंत्री

- जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान घडलेली एक गंभीर घटना समोर आली आहे. शेख नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यास बळजबरीने पत्र देत ते वाचण्यासाठी कोणताही वेळ न देता त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्याचे संबंधित व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेमुळे उपोषणकर्ते व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, या प्रकरणात वाद निर्माण करून उपोषणकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, जी अत्यंत गंभीर बाब आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा सन्मान राखणे आवश्यक असताना अशा प्रकारची जबरदस्ती अयोग्य व निषेधार्ह आहे. त्यामुळे संबंधित घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच, अशा प्रकारे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून तात्काळ बदली करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी मागणीही करण्यात येत आहे. #अहिल्यानगर #जिल्हाधिकारी #मुख्यमंत्री1
- Post by Changdev Barge1
- येथील शिंदे पाटील फाऊंडेशनतर्फे आयोजित भव्य टेनिस बॉल डे-नाईट क्रिकेट स्पर्धा, अर्थात 'शिंदे पाटील चषक २०२६' सध्या मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या स्पर्धेला दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला. यावेळी बोलताना खासदार भगरे म्हणाले की, "खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते युवकांमध्ये शिस्त आणि जिद्द निर्माण करण्याचे उत्तम माध्यम आहे." खेळासोबतच १०० गरजू कुटुंबांना किराणा वाटप करण्याच्या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. आयोजक अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे पाटील यांच्या हस्ते खासदारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कुणाल दराडे, शाहू राजे शिंदे, विशाल परदेशी, नाना भाऊ शिंदे, अरुण काका शिंदे, शंभूराजे शिंदे, प्रशांत शिंदे, दादा फिटर, सुनील शिंदे, अमोल शिंदे, प्रशांत शिनकर, संजय शिंदे, दीपक गुप्ता, दीपक घिगे, पप्पू वाणी, राजू बाकळे आणि योगेश सोनवणे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदारांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेची रंगत वाढली असून खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.1
- Post by मन्सूर शेख1
- ----- (प्रतिनिधी):- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या विहिरीमुळे लहान मुले, दुचाकीस्वार, बैलगाड्या तसेच जनावरांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ध्रुपदी खिल्लारे, गोरख खिल्लारे, मधुकर खिल्लारे, मच्छिंद्र खिल्लारे, बबन खिल्लारे, जालिंदर खिल्लारे, हौसराव खिल्लारे, साहेबराव धुमाळ, दत्तु खिल्लारे यांच्या सह खिल्लारे, मुळीक व झांजुर्णे वस्तीवरील ग्रामस्थांनी संबंधित विहिरीला तातडीने संरक्षक कठडा किंवा भिंत उभारण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी “दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने उपाय योजना कराव्यात,” अशी ठाम भूमिका घेतली असून, या कडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.1
- सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा1
- आकाशवाणी परिसरामध्ये एका चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असून सदरील घटना ही छत्रपती संभाजी नगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये घडली आहे सदरील व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- BT News शी बोलताना जय पवारांनी प्रचारात गाव भेटीत लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस ते बोलताना दादाच्या आठवणी व मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आवाहन करण्यात आले.1