मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा."आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.

- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा."आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.1
- 👉थायराईड वर आलेला रियांश अमृत जूस चा जबरदस्त रिजल्ट ✅🥰1
- बुलढाण्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद मध्ये पावसाचा हाहाकार. हजारो हेक्टर वरील पिके वाहून गेली. राष्ट्रीय महामार्ग 161 जी ठप्प1
- मुसळधार पावसाचा फटका! शेगांव-कालखेड–वरवट बकाल मार्गावरील वाहतूक ठप्प; नाल्याला पूर आल्याने नागरिक अडकले.. मुसळधार पावसाचा फटका! शेगांव-कालखेड–वरवट बकाल मार्गावरील वाहतूक ठप्प; नाल्याला पूर आल्याने नागरिक अडकले.. शेगांव, दि. 31 जुलै : शेगाव तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेगांव-कालखेड–वरवट बकाल मार्गावरील पालघर नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नाल्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांची ये-जा बंद झाली असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गाचा वापर शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी तसेच रोज अप-डाऊन करणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र नाल्यावरील पाण्याची पातळी वाढल्याने अनेकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत असून प्रवासात विलंब होत आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. प्रशासनाने नागरिकांना पूराच्या पाण्यातून वाहन किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. पाण्याचा प्रवाह कमी होईपर्यंत या मार्गावरून प्रवास टाळण्याचेही आवाहन करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात नाल्याला पूर आल्याने वाहतूक विस्कळीत होते आणि विद्यार्थी, नोकरदार व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी उंच पुलाचे किंवा अन्य कायमस्वरूपी पर्यायाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांना आवाहन: पूराचे पाणी ओसरत नाही तोपर्यंत या मार्गावरून प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची सुरक्षितता जपावी.1