मयत कुटुंबियांची वैजनाथ पावडे यांनी घेतली भेट 👏👏👏 हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव येथील रहिवासी धोंडीबा बार्शी हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय करत आहेत. त्यांचा मुलगा योगेश धोंडीबा बार्शी हा देखील आपल्या आई-वडिलांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी रात्रंदिवस रानोमाळ फिरून मेंढपाळ व्यवसाय करत होता. परंतु नियतीने अचानक घाला घातल्याने योगेश बार्शी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील पूर्णा परिसरामध्ये मेंढ्या चारत असताना दिनांक ६ मे रोजी योगेश यांनी मेंढ्यांना तलावावर पाणी पाजण्यासाठी नेले होते. त्यानंतर स्वतः आंघोळ करण्यासाठी तलावात उतरले असता अचानक पाय घसरल्याने त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतरही संबंधित प्रशासनाने अद्याप या कुटुंबाची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आज धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष – वैजनाथ पावडे यांनी मयताच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच संबंधित भागातील तहसीलदार आणि मतदारसंघातील आमदार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून या कुटुंबाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत व न्याय मिळवून देण्याची मागणी केली. “गरीब मेंढपाळ कुटुंबावर ओढवलेले हे संकट अत्यंत वेदनादायी असून शासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे करावा,” अशी अपेक्षा यावेळी वैजनाथ पावडे यांनी व्यक्त केली. धनगर समाज युवा मल्हार सेना ही सदैव मेंढपाळ समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास देखील त्यांनी कुटुंबियांना दिला.

- श्री. संत गजानन महाराज संस्थानचा कडक निर्णय : मंदिर परिसरात मोबाईल वापरास पूर्ण बंदी; नियम मोडल्यास मोबाईल जप्त होणार श्री गजानन महाराज संस्थानचा कडक निर्णय : मंदिर परिसरात मोबाईल वापरास पूर्ण बंदी; नियम मोडल्यास मोबाईल जप्त होणार शेगाव : अध्यात्म, पावित्र्य आणि शिस्त यांची ओळख असलेल्या श्री गजानन महाराजांच्या पवित्र नगरीत आता मंदिर परिसरातील मोबाईल वापरावर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. श्री गजानन महाराज संस्थानने याबाबत स्पष्ट आणि कडक इशारा देत भाविकांना मंदिर परिसरात मोबाईल वापरण्यास सक्त मनाई असल्याचे जाहीर केले आहे. मंदिर परिसरातील वाढती गर्दी, दर्शन व्यवस्थेतील अडथळे, तसेच काहींकडून मोबाईलद्वारे होणारे फोटो, व्हिडिओ आणि अनावश्यक गोंधळ यामुळे मंदिराचे पावित्र्य बाधित होत असल्याची गंभीर दखल संस्थानने घेतली आहे. यामुळे आता मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वारावरच मोबाईल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संस्थानने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करताना कोणी आढळल्यास संबंधितांचा मोबाईल तात्काळ जप्त करण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाईल परत मिळवण्यासाठी होणारा मानसिक त्रास, वेळेची नासाडी आणि गैरसोय टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दररोज लाखो भाविक श्रींच्या दर्शनासाठी शेगावात येतात. मात्र काही जण मोबाईलमध्ये व्यस्त राहून दर्शन रांगेत अडथळे निर्माण करतात, सेल्फी आणि व्हिडिओच्या नादात शिस्त मोडतात, अशी तक्रार वारंवार समोर येत होती. या पार्श्वभूमीवर संस्थानने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. “श्रींचे दर्शन हे श्रद्धेचे, शांततेचे आणि भक्तीचे असावे; मोबाईलच्या गोंधळाचे नव्हे,” असा स्पष्ट संदेश संस्थानने या निर्णयातून दिला आहे. त्यामुळे आता मंदिर परिसरात ‘नो मोबाईल झोन’ची कडक अंमलबजावणी होणार असून भाविकांनीही याला सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शिस्त, सुरक्षितता आणि पावित्र्य जपण्यासाठी संस्थानने उचललेले हे कठोर पाऊल सध्या संपूर्ण शेगाव परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.1
- बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक डिझेल टँकर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून, कॅन-बाटल्या घेऊन डिझेल जमा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली.1
- Post by नागनाथ ससाने1
- बुलडाणा जिल्ह्यातील धरणगावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये २ ते ९ मे दरम्यान धम्म बालसंस्कार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिराच्या समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांनी धम्म शांतता रॅली काढली.1
- जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अकोला बायपास परिसरात एका भरधाव कारने अचानक पेट घेतला. आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.1
- ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मनसैनिकांनी शाई आणि ऑइल फेकले. मनसे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे या घटनेतून समोर आले.1
- Har bimariyo ka elaj riyansh amrit juce ke pass... har har riyansh har ghar riyansh1