Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक: चांदवडजवळ ट्रॅव्हल्स बस उलटली; एक ठार, अनेक जखमी चांदवड : मालेगावहून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. हॉटेल निकिताजवळ मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेत राजेंद्र अमरसिंग सोळंकी (६०, पुणे) यांचा मृत्यू झाला, तर ७ जण गंभीर आणि सुमारे २० प्रवासी किरकोळ जखमी झाले. एमएच १८ बीजी ४००५ क्रमांकाची लक्झरी बस टायर फुटल्यानंतर दुभाजकालगत उलटली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस, हायवे रुग्णवाहिका आणि पेट्रोलिंग पथकाने तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
Kapil Katyare
नाशिक: चांदवडजवळ ट्रॅव्हल्स बस उलटली; एक ठार, अनेक जखमी चांदवड : मालेगावहून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. हॉटेल निकिताजवळ मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेत राजेंद्र अमरसिंग सोळंकी (६०, पुणे) यांचा मृत्यू झाला, तर ७ जण गंभीर आणि सुमारे २० प्रवासी किरकोळ जखमी झाले. एमएच १८ बीजी ४००५ क्रमांकाची लक्झरी बस टायर फुटल्यानंतर दुभाजकालगत उलटली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस, हायवे रुग्णवाहिका आणि पेट्रोलिंग पथकाने तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पूर्णिया में गर्लफ्रेंड घुमाने का नतीजा प्रेमी जोड़ा को साथ घूमते हुए .... लोगों ने पकड़ा फिर पुलिस के हवाले किया लड़की के पिता ने कहा दोनों का शादी होगा अब... पूर्णिया में गर्लफ्रेंड घुमाने का नतीजा प्रेमी जोड़ा को साथ घूमते हुए .... लोगों ने पकड़ा फिर पुलिस के हवाले किया लड़की के पिता ने कहा दोनों का शादी होगा अब...1
- नाशिक:भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची साडेपाच तास चौकशी नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडून तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्या पुण्याकडे रवाना झाल्या. माध्यमांशी संवाद साधताना चाकणकर म्हणाल्या, “एसआयटीच्या प्रश्नांना मी पूर्ण सहकार्य केले असून तपास यंत्रणेचे समाधान झाले असावे असे मला वाटते. पुढील तपासासाठी गरज भासल्यास पुन्हा हजर राहून सहकार्य करेन.” या प्रकरणातील तपास अधिक गतीने सुरू असून एसआयटी विविध बाबींची सखोल चौकशी करत आहे.1
- नाशिकमधील सारडा सर्कल परिसरातील पक्के बांधकाम व पत्र्याचे शेड अतिक्रमण महापालिकेने हटवले आहे. नाशिककरांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर झालेल्या या कारवाईमुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.1
- रूपाली चाकणकर यांची नाशिक येथे खरात प्रकरणात एसआयटी तपासासाठी हजेरी1
- जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांनीची अप्रतिम चित्रकारी नक्की पहा1
- सुरगाणा तालुक्यातील बोरगाव खरुडे रस्त्याची दुरवस्था, वाहन चालक त्रस्त1
- पालघरच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी 'एल्गार'! पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निर्मितीसाठी प्रमोद पवारांची मुंबई उच्च न्यायालयात 'लेटर पिटिशन' पालघर/ गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (TDC Bank) विभाजनाचा प्रश्न आता थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी ठाणे बँकेच्या बेकायदेशीर निवडणूक प्रक्रियेला आणि नोकरभरतीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात लेटर पिटिशन' (पत्राद्वारे याचिका)दाखल केली आहे. यामुळे सहकार क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. १ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली, मात्र १२ वर्षे उलटूनही जिल्ह्याची स्वतंत्र सहकारी बँक स्थापन झालेली नाही. ७,३०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा बँकेवर आजही ठाण्यातील राजकीय नेत्यांचेच वर्चस्व आहे. पालघरमधील शेतकरी आणि कष्टकरी भूमिपुत्रांचा पैसा ठाण्याच्या राजकारणासाठी वापरला जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रमोद पवार यांनी केला आहे. बँकेचे कार्यक्षेत्र बदललेले असताना, नवीन मतदार यादी आणि मतदारसंघांची पुनर्रचना न करताच निवडणूक घेतली जात आहे. मालमत्ता आणि दायित्वाचे वाटप होण्यापूर्वी निवडणूक घेणे म्हणजे पालघरच्या तिजोरीवर डल्ला मारण्यासारखे आहे. बँक विभाजनापूर्वीच घाईघाईने केली जाणारी नोकरभरती ही पालघरच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हक्कावर घाला घालणारी आहे. "विभाजन आधी - भरती नंतर" अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या मध्ये असलेल्या अधिकारांचा वापर करून बँकांचे विभाजन करणे अनिवार्य असताना सहकार विभागाने डोळे झाकून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पत्राद्वारे प्रमोद पवार यांनी उच्च न्यायालयाला विनंती केली आहे की: १. बँकेची विद्यमान बेकायदेशीर निवडणूक प्रक्रिया तत्काळ रद्द करावी. २. सुरू असलेली संशयास्पद नोकरभरती थांबवण्यात यावी. ३. कलम ७७-अ अन्वये बँकेवर आय.ए.एस. (IAS) दर्जाच्या प्रशासकाची नियुक्ती करावी. एकीकडे मुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि निबंधकांना दिलेल्या अल्टिमेटमनंतर आता थेट उच्च न्यायालयात धाव घेतल्याने प्रशासन हबकले आहे. जर तातडीने विभाजनाचा निर्णय झाला नाही, तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात जनआंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. आता मुंबई उच्च न्यायालय या 'लेटर पिटिशन'ची दखल घेऊन पालघरला न्याय देणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, सहकारमंत्री तसेच सर्व संबंधिताना याबाबत निवेदन देण्यात आले असून ठाणे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातही निवेदन देण्यात आले आहे. यावेळी आज अध्यक्ष प्रमोद पवार, कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस स्वप्निल वाघ, जिल्हा संघटक महेश ठाकरे, पालघर तालुका अध्यक्ष विकास धोडी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.1
- हाथीदहजवळ गंगा नदीत एका महिलेने आपल्या मुला-मुलीसोबत उडी मारण्याचा प्रयत्न केला. सिक्स लेन पुलाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे ती पोलिसांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी वेळेत तिला वाचवले. कौटुंबिक वादामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले असून, तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.1