दादा पाटील महाविद्यालयाचे कला व क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश दादा पाटील महाविद्यालयाच्या ओम संतोष कोरडे (हँडबॉल), कु. दीक्षा गेळे, कु. शिवानी जाधव, शिवकन्या कदम (वक्तृत्व) आणि वैष्णवी मासाळ (गीतगायन) या विद्यार्थ्यांनी क्रीडा व कला क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करत उत्तुंग यश संपादन केले आहे. ओम कोरडे या विद्यार्थ्याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नेटबॉल संघात निवड झाली असून एस.ए.जी.आय. विद्यापीठ, भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. भोपाळ येथे रवाना होताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करून महाविद्यालय व विद्यापीठाचा नावलौकिक वाढवावा, असा शुभसंदेश दिला. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातील विद्यार्थिनी दीक्षा बबन गेळे हिने जामखेड येथे संपन्न झालेल्या स्वातंत्र्यसैनिक कै. मधुकाका देशमुख राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत तसेच मिरजगाव येथे झालेल्या कर्मयोगी डॉ. ए. बी. चेडे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत आयोजित गीतगायन स्पर्धेत वैष्णवी अनिल मासाळ हिने विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. तर वक्तृत्व स्पर्धेत शिवानी नवनाथ जाधव हिने तृतीय क्रमांक मिळवला. पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शिवकन्या सुरेश कदम हिने द्वितीय क्रमांक पटकावला. महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कला व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन व मार्गदर्शन केले जाते. त्याचाच परिपाक म्हणून विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अशोक शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा. पवन कडू, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. स्वप्निल म्हस्के, प्रा. वृद्धेश्वर गरुड आणि प्रा. मीना खेतमाळीस यांचे मार्गदर्शन लाभले.

- Post by कर्जत लाईव्ह1
- पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण रावसाहेब तावरे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी गुणवडी गणातील शुभांगी सुनील आगवणे यांची निवड झाली आहे. पणदरे गटातून निवडून आलेल्या किरण तावरे यांच्यावर संघटन कौशल्य आणि कामाच्या अनुभवाच्या जोरावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, ही निवड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार झाल्याची माहिती समोर येत आहे. निवडीनंतर किरण तावरे यांनी बारामती तालुक्यातील ग्रामीण विकास, शेतकरी, महिला आणि युवकांसाठीच्या योजनांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- Post by शहादेव काशिनाथ वैद्य4
- सोलापूर : ज्योती वाघमारे यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहित नव्हते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या नावावरून त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. मात्र, त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहीत नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवशी त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल माहीत झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.1
- सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते1
- राहुरीत पोलिसांवर काही तरुणांनी चा हल्ला हल्ला करणारे तीन तरुण पोलिसांनी अटक करून भर बाजारपेठेमध्ये त्यांची धिंड काढले आहे1
- पुसरा येथील मेंढपाळ बांधव यांना मारहाण. वडवणी प्रतिनिधी- वडवणी तालुक्यातील पुसरा येथील मेंढपाळ बांधव लहू बीटे आणि बाबा बीटे यांना झालेली मारहाण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. गाडीचे झालेले नुकसान भरून दिल्यानंतरही, केवळ सत्तेच्या किंवा पैशाच्या माजातून गरीब मेंढपाळांना ढोरासारखे मारणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. तातडीने गुन्हा दाखल: संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा. पोलीस अधीक्षक हस्तक्षेप: बीड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या घटनेची स्वतः दखल घेऊन पीडित मेंढपाळ बांधवांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1