भगवती गौरीमाता शिक्षण संकुलास राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान धोत्री येथील श्री भगवती गौरीमाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयास एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोलापूरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, नवीमुंबईचे नगरसेवक कदम, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब अडसूळ आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र मुख्याध्यापक श्री गिरमल बुगडे सर, पर्यवेक्षक श्री सचिन देगांवकर सर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक अरुण हत्ताळी सर, सुभाष बेळ्ळे, नागेशप्पा लंगोटे , रविराज रासुरे,प्रा. मल्लिनाथ हुलसुरे, प्रा.दत्तात्रय बिराजदार ,महासिद्ध ब्याळे , शामराव बगले, मल्लिकार्जुन गुरव, ज्योती कलबुर्गी, सुगलाबाई हत्तुरे आदी शिक्षक वृंद उपस्थित होते. श्री भगवती गौरीमाता प्रशालेने शैक्षणिक व विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान केल्याचे राज्य अध्यक्ष अडसूळ सर यांनी सांगितले. धोत्री पंचक्रोशीत शाळेचे कौतुक होत आहे.

- ज्ञानेश्वर विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा ९७.५७% दमदार निकाल लातूर, दि. 11 (प्रतिनिधी):- लातूर शहरातील शाहू चौक परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाने यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९७.५७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच वैष्णवी पानहळवे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर सृष्टी चव्हाण हिने ९९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांची संस्थाअध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष प्रल्हाद दूडीले, सचिव डी.एन. शेळके, कोषाध्यक्ष विनायक पिनाटे, सहसचिव विठ्ठल इगे, संचालक प्रा. प्रकाशराव शिंगाडे, नाथराव कोल्हे माधवराव गोलावार अनिरुद्ध शेळके हरिचंद्र निर्मित डॉक्टर सोपानराव जटाळ चंदुलाल बलवा यांच्यासह प्राचार्य संजय मलवाडे उप प्राचार्य माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत बैनगिरे, पूनम पाटील, संजय कासले, परीक्षा प्रमुख सुधाकर बुरगे, लिपिक अजय अरदवाड आदींनी कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बामणी पाटीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हैद्राबाद येथील असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- चित्रपट कलावंत विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना लाखोंच्या जनतेसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.1
- सांगली जिल्ह्यात एका महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हत्येमागचे कारण अद्याप गूढ आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.1
- प्रधानमंत्री मोदी की अपील पर देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया। 'जरूरत पड़ने पर ही ईंधन का इस्तेमाल करें', #pmmodi #devendrafadnavis #maharashtra #primenews83 #breakingnews #hindinews प्रधानमंत्री मोदी की अपील पर देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया। 'जरूरत पड़ने पर ही ईंधन का इस्तेमाल करें',1
- Post by नागनाथ ससाने1
- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.1
- छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त "यशवंत फेस्टिवल 2026" 14,15,16,17 मे गुंडादाजी लॉन कराड पलूस रोड, पलूस या ठिकाणी आयोजित केले आहे. आयोजक - पप्रदीप ( अप्पा ) कदम1