logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे अभियान राबविण्यात येणार १७ सप्टेंबरपासून राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे अभियान राबविण्यात येणार १७ सप्टेंबरपासून राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ सोनपेठ (दर्शन) :- शासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारी ; महिनाभर लोकसहभागातून सेवेचा जागर ‘सेवा सेतूपासून ‘जनसेवक महाकुंभापर्यंत विविध उपक्रम ; गाव-वॉर्डस्तरावर सामाजिक सेवेची चळवळ शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ पात्र नागरिकांच्या हातात पोहोचावा,प्रशासन आणि सामान्य माणूस यांच्यातील अंतर कमी व्हावे आणि लोकसहभागातून सेवाभावाची व्यापक चळवळ उभी राहावी,या उद्देशाने राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे अभियान राबविण्यात येणार आहे.‘सेवा परमो धर्म’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याच्या भूमिकेतून या महिनाभराच्या अभियानाची आखणी करण्यात आली आहे. तालुक्यात ‘सेवा सेतू’; एकाच ठिकाणी योजनांचा लाभ अभियानातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘सेवा सेतू अभियान’. प्रत्येक तालुकास्तरावर शिबिर घेऊन राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभ पात्रतेनुसार नागरिकांना थेट उपलब्ध करून दिले जाणार आहेत.‘आपले सरकार सेवा केंद्रा’मार्फत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून शक्यतो शिबिरातच लाभ देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक तालुक्यात किमान एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केले जाणार आहे. वनहक्क दाव्यांसाठी ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वनहक्क समित्यांच्या बैठका घेऊन नवीन दावे तसेच पूर्वीच्या दाव्यांतील दुरुस्त्यांची कार्यवाही केली जाणार आहे.अभियानाच्या कालावधीत सर्व दावे निर्णयित होतील,यासाठी जिल्हानिहाय वेळापत्रक तयार करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. सातबाऱ्यापासून आधारपर्यंत २२ सेवा ‘सेवा सेतू’ शिबिरांमधून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित २२ महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहे. प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा व जिवंत सातबारा मोहीम,गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप,मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते उपलब्ध करणे,पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरण,नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र,वनहक्क दावे मंजूर करणे,मालमत्ता हस्तांतरण नोंद,नवीन नळजोडणी, मालमत्ता कर आकारणी व मागणीपत्र,प्रलंबित घरगुती वीजजोडणी मंजुरी आणि मालमत्ता हस्तांतरणानंतर वीजजोडणीवर नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे यांचा त्यात समावेश आहे. याशिवाय बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरींसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी,दिव्यांग प्रमाणपत्र,विवाह नोंदणी प्रमाणपत्र,आधार कार्ड,जन्म-मृत्यू नोंद व प्रमाणपत्र,शिकाऊ वाहनचालक परवाना,महिला बचतगट नोंदणी,ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र,महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप, ७/१२ व ८-अ मधील नोंदी अद्ययावत करणे आणि जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार जमिनीच्या मोजणीशी जोडणे या सेवांचाही समावेश आहे. युवकांच्या कल्पकतेला ‘इनोव्हेशन चॅलेंजचे व्यासपीठ राज्यातील युवक,विद्यार्थी, स्टार्टअप्स,व्यावसायिक,कॉर्पोरेट इनोव्हेटर्स तसेच ग्रामीण भागात नवी समाधाने विकसित करणाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी राज्यस्तरीय ‘इनोव्हेशन चॅलेंज ’आयोजित करण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्था,स्टार्टअप नेटवर्क, इन्क्युबेशन सेंटर आणि खासगी कंपन्यांचा यात सहभाग असेल. उत्कृष्ट इनोव्हेटर्सना तज्ज्ञांसमोर आपल्या कल्पना मांडण्याची संधी मिळेल आणि त्यातून राज्यस्तरीय उत्कृष्ट इनोव्हेटर्सची निवड केली जाईल.कौशल्य,रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यासाठी नोडल विभाग असेल. प्रत्येक गाव-वॉर्डात ‘सेवा माझे योगदान’ अभियानाला खऱ्या अर्थाने लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी प्रत्येक गाव आणि वॉर्डात ‘सेवा माझे योगदान’ कार्यक्रम होणार आहे.युवक,महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह शिक्षण,कला, साहित्य,क्रीडा व समाजसेवा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींना सहभागी करून घेतले जाणार आहे.समुद्रकिनारे,नदीघाट आणि बारवांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवून भविष्यात नियमित स्वच्छता व्हावी यासाठी स्थानिक समित्याही स्थापन केल्या जाणार आहेत.स्वच्छतेनंतर सामूहिक संकल्प घेतला जाणार असून या कामाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येईल. या उपक्रमात स्थानिक गरजेनुसार रक्तदान शिबिर,अनाथालय- वृद्धाश्रम भेट,वृक्षारोपण,‘स्वच्छता ही सेवा’,आरोग्य तपासणी,‘एक गाव दत्तक घ्या-सेवा कार्य’, योग व ध्यान सत्र,प्लास्टिकमुक्ती जागृती, महिलांचे आरोग्य व स्वच्छता, वंचित मुलांसाठी शिक्षण सहकार्य, करिअर कौन्सिलिंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता असे उपक्रम घेता येणार आहेत. यासोबतच अवयवदान संकल्प, व्यसनमुक्त भारत,पोषण व ॲनिमिया,रस्ते सुरक्षा,जलसंधारण व जलस्रोत स्वच्छता,कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग,सायबर सुरक्षा,फिट इंडिया खेळ सत्र, वीरगाथा व सैनिकांचा सन्मान, दिव्यांगजन सहयोग, मतदार जागृती व नोंदणी,‘व्होकल फॉर लोकल’,सरकारी योजनांची जनजागृती आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व प्रमाणपत्रे देण्यासंबंधी उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.ग्रामीण भागात गटविकास अधिकारी,तर शहरी भागात मुख्याधिकारी अथवा वॉर्ड अधिकारी नोडल अधिकारी असतील. ‘विकसित भारताचा बदल नागरिकांसमोर राज्यातील महत्त्वाचे व परिवर्तनकारी प्रकल्प आणि क्षेत्रांची यादी तयार करून या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या जीवनमान,सुरक्षा,अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि संधींमध्ये झालेल्या बदलांची माहिती संकलित केली जाणार आहे. ‘विकसित भारत-२०४७ सेवा ज्योत यात्रा’ प्रत्येक गावातून काढण्यात येईल,तर शहरी भागात बाइक रॅली आयोजित केली जाईल.गाव आणि शहरांतील प्रमुख ठिकाणी विकसित भारत-२०४७ तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाईल.कार्यक्रमाच्या शेवटी ‘विकसित भारत-२०४७’चा सामूहिक संकल्प घेतला जाईल. जिल्हास्तरावर पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील भारत कागदावर अन् शब्दांत शासकीय आणि खासगी शाळांमध्ये ‘विकसित भारत’ संकल्पनेवर चित्रकला स्पर्धा होईल.‘मुलांच्या स्वप्नातील भारत’ आणि ‘विकसित भारत-२०४७’ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतील.विजेत्यांना पुरस्कार देण्यात येतील.निवडक स्पर्धकांचे व्हिडिओ तयार करून जिल्हास्तरीय आणि त्यानंतर राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. तालुकास्तरावर गटशिक्षण अधिकारी नोडल अधिकारी असतील. अंगणवाडी उत्सवात माता-बालकांच्या आरोग्यावर भर सर्व अंगणवाडी केंद्रांवर मुलांसोबत मातांनाही निमंत्रित करून ‘अंगणवाडी उत्सव’ साजरा केला जाणार आहे. महिलांना आरोग्य व पोषण योजनांची माहिती, मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच फळे व मिठाईचे वाटप केले जाईल.अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.लाभार्थी महिलाही पोषण व आरोग्य योजनांमुळे झालेल्या फायद्यांचे अनुभव सांगतील. लाभार्थ्यांच्या घरी पेटणार ‘आशीर्वादाचा दिवा’ अभियानातील हृदयस्पर्शी उपक्रम म्हणून ‘आशीर्वादाचा दिवा’ राबविण्यात येणार आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी संबंधित विभागांचे अधिकारी जाऊन दीप प्रज्वलित करतील. विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या याद्या ११ सप्टेंबरपर्यंत मुख्य सचिवांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व मंत्रालयीन विभागांना देण्यात आले आहेत. ‘बदलाची गोष्ट’ सांगणार लाभार्थ्यांची यशोगाथा शासकीय योजनांनी एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यात नेमका काय बदल घडविला,हे आता लाभार्थी स्वतः सांगणार आहेत.‘बदलाची गोष्ट’ या उपक्रमांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमुळे लाभार्थ्यांच्या जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदलांच्या यशोगाथा नावासह व्हिडिओ स्वरूपात संकलित केल्या जातील. उत्कृष्ट व्हिडिओ व रिल्सची राज्यस्तरावर निवड केली जाणार आहे. १७ सप्टेंबरला ‘आभार आणि संकल्पाची रांगोळी’ १७ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी जनकल्याणकारी योजना,राष्ट्रीय प्रतीके आणि विकसित भारत या संकल्पनांवर आधारित मानवी रांगोळी साकारली जाणार आहे. नैसर्गिक साहित्याचा वापर करून कला- परंपरा,पर्यटन, निसर्ग आणि संस्कृतीवर आधारित रांगोळ्याही काढण्यात येतील. सांस्कृतिक कार्य विभाग या उपक्रमासाठी नोडल विभाग असेल. २ ऑक्टोबरला ‘नमो सेवागाथा’ केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती कला व नाट्यपथकांद्वारे शाळा,महाविद्यालये आणि ग्रामपंचायतस्तरापर्यंत पोहोचविली जाणार आहे.उत्कृष्ट पथकांना जिल्हा व राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळेल आणि स्थानिक कलाकार,विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान केला जाईल. २ ऑक्टोबर रोजी तालुकास्तरावर ‘नमो सेवागाथा’ कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. संकल्प यात्रा याच अभियानांतर्गत ‘जल,जन आणि सेवा संकल्प यात्रा’ धुळे जिल्ह्यातून जाणार असून तेथे यात्रेचे स्वागत करून स्थानिक योजना आणि विकासकामांबाबत संवाद कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.यात्रेतील एलईडी स्क्रीनवर माहितीपट दाखविण्यात येतील.१७ ऑक्टोबरला ‘जनसेवक महाकुंभ’ ; अभियानाची सांगता अभियानाचा समारोप १७ ऑक्टोबर रोजी ‘जनसेवक महाकुंभा’ने होईल. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत काम करणारे लोकप्रतिनिधी यात सहभागी होतील.सरपंचापासून संसद सदस्यांपर्यंत विविध स्तरांवरील लोकप्रतिनिधी विकसित भारताबाबत आपले अनुभव मांडतील. मा.पंतप्रधान हे उपस्थित लोकप्रतिनिधींना संबोधित करतील.त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व लोकप्रतिनिधी विकसित भारताचा संकल्प करतील.त्यानंतर ‘सेवा संकल्प अभियानाची’ सांगता होईल. ग्रामविकास विभाग या कार्यक्रमासाठी नोडल विभाग असेल.हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. संकलन : जिल्हा माहिती कार्यालय परभणी

9 hrs ago
user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
साप्ताहिक सोनपेठ दर्शन
Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी सोनपेठ (दर्शन) :- तब्बल 35000 कोटी रुपयांचा खर्च सहा पदरी ग्रीन फील एक्सप्रेस वे आणि माळशिरस घाटात तब्बल आठ किलोमीटरचा भव्य असा बोगदा मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे कल्याण परिसराला मराठवाड्याची जोडणाऱ्या कल्याण ते लातूर जनकल्याण एक्सप्रेस वेला राज्य सरकारची मंजुरी दिलेली आहे सध्या लातूर ते कल्याण प्रवासासाठी 12 तास वेळ लागतो तू वेळ हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर चार तासाचा होणार आहे.
    1
    मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी 

सोनपेठ (दर्शन) :- 
तब्बल 35000 कोटी रुपयांचा खर्च सहा पदरी ग्रीन फील एक्सप्रेस वे आणि माळशिरस घाटात तब्बल आठ किलोमीटरचा भव्य असा बोगदा मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे कल्याण परिसराला मराठवाड्याची जोडणाऱ्या कल्याण ते लातूर जनकल्याण एक्सप्रेस वेला राज्य सरकारची मंजुरी दिलेली आहे सध्या लातूर ते कल्याण प्रवासासाठी 12 तास वेळ लागतो तू वेळ हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर चार तासाचा होणार आहे.
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद
    1
    परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद
    user_Beed News Express
    Beed News Express
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त
    1
    सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त

    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    4 hrs ago
  • मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
    1
    मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका!
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत.
मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
    user_Saath maharashtrachi news
    Saath maharashtrachi news
    News Anchor केज, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .
    1
    वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश..
.
.
.
.
.
    user_मराठवाडा संवाद न्युज
    मराठवाडा संवाद न्युज
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.
    1
    महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे.

सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर.
मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026.
लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय द्या! राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्याचे आवाहन. भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय द्या! राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्याचे आवाहन. सोनपेठ (दर्शन) :- छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी आपले सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय द्यावेत. दि.१८ सप्टेंबर २०२६ ⏰ सकाळी १० ते सायंकाळी ६ 📍 आठही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांत विशेष कक्ष 🏛️ २१ सप्टेंबर २०२६ | सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात उच्चस्तरीय समिती नागरिक व संबंधित घटकांशी थेट चर्चा करणार. 📧 प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्यास लेखी अभिप्राय पाठवा आपला अभिप्राय — अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती परीक्षेकडे एक महत्त्वाचे पाऊल!
    1
    भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय द्या!
राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्याचे आवाहन.

छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी आपले सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय द्यावेत.
दि.१८ सप्टेंबर २०२६
⏰ सकाळी १० ते सायंकाळी ६
📍 आठही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांत विशेष कक्ष
🏛️ २१ सप्टेंबर २०२६ | सकाळी १०.३० वाजता
छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात उच्चस्तरीय समिती नागरिक व संबंधित घटकांशी थेट चर्चा करणार.
📧 प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्यास लेखी अभिप्राय पाठवा 
आपला अभिप्राय — अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती परीक्षेकडे एक महत्त्वाचे पाऊल!
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ
    1
    लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ
    user_लक्ष लातूर न्यूज
    लक्ष लातूर न्यूज
    Advertising Photographer शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.