logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ

1 day ago
user_लक्ष लातूर न्यूज
लक्ष लातूर न्यूज
Advertising Photographer शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
1 day ago

लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ

More news from Maharashtra and nearby areas
  • फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे
    1
    फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे
फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    6 hrs ago
  • कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन बीड | प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. पावसाअभावी आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. “कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्या” या प्रमुख मागणीसह गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने अदा करावी आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. हलगीच्या गजरात प्रशासनाचे लक्ष वेधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक मदत जाहीर करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
    2
    कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या

शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन

कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या
शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन
बीड | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. पावसाअभावी आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्या” या प्रमुख मागणीसह गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने अदा करावी आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
हलगीच्या गजरात प्रशासनाचे लक्ष वेधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक मदत जाहीर करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • ग्रामपंचायत तुळशी तालुका माढा येथील ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू ग्रामपंचायत तुळशी तालुका माढा येथील ग्रामस्थांनी उजनी धरणातून कॅनल द्वारे तुळशी गावाला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे
    1
    ग्रामपंचायत तुळशी तालुका माढा येथील ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू 
ग्रामपंचायत तुळशी तालुका माढा येथील ग्रामस्थांनी उजनी धरणातून कॅनल द्वारे तुळशी गावाला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे
    user_प्रताप शेळके
    प्रताप शेळके
    Farmer मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पीक नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार - पालकमंत्री नरहरी झिरवाळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी केली पीक पाहणी हिंगोली :जिल्ह्यात मागील 20 ते 25 दिवसांपासून पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, सोयाबीन, कापूस व तूर पिकांवर ओलावा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. पिकांच्या नुकसानीसाठी शासन स्तरावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधिक्षक श्रेणीक लोढा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सेनगाव तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या सोयाबीन पीक शेंगा लागणे व दाणे भरणे या उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मात्र, या कालावधीत पावसाचा खंड पडल्याने पिकांमध्ये तीव्र ओलावा ताण निर्माण झाला आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ खुंटलेली, पाने फिकट पडलेली, पिके कोमेजलेली तसेच काही ठिकाणी पाने करपण्याच्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सेनगाव तालुक्यातील शेषेराव मोतीराम मोरे, शेख जाफर शेख दाउद, शेख मुजीब, शेख वाजीद शेख कौसर आणि सुभाष दत्तराम पारिस्कर या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा. शासन त्यांच्या पाठीशी आहे,” असे सांगत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. जिल्ह्यातील प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या पीक परिस्थितीचा संपूर्ण अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांना दिल्या.
    1
    पीक नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार
- पालकमंत्री नरहरी झिरवाळ
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी केली पीक पाहणी
हिंगोली :जिल्ह्यात मागील 20 ते 25 दिवसांपासून पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, सोयाबीन, कापूस व तूर पिकांवर ओलावा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. पिकांच्या नुकसानीसाठी शासन स्तरावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधिक्षक श्रेणीक लोढा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
सेनगाव तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या सोयाबीन पीक शेंगा लागणे व दाणे भरणे या उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मात्र, या कालावधीत पावसाचा खंड पडल्याने पिकांमध्ये तीव्र ओलावा ताण निर्माण झाला आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ खुंटलेली, पाने फिकट पडलेली, पिके कोमेजलेली तसेच काही ठिकाणी पाने करपण्याच्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले.
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सेनगाव तालुक्यातील शेषेराव मोतीराम मोरे, शेख जाफर शेख दाउद, शेख मुजीब, शेख वाजीद शेख कौसर आणि सुभाष दत्तराम पारिस्कर या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
“शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा. शासन त्यांच्या पाठीशी आहे,” असे सांगत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. जिल्ह्यातील प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या पीक परिस्थितीचा संपूर्ण अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांना दिल्या.
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    3 hrs ago
  • “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू सरकारला दिसत नाहीत का?”; पत्नी सौमित्रा यांची भावनिक साद अंतरवाली सराटी | ओमप्रकाश उढाण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज मंगळवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र मुंबईकडे निघण्यापूर्वी कुटुंबीयांची घेतलेली भेट अत्यंत भावनिक ठरली. जरांगे पाटील यांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले होते. या भेटीच्या वेळी कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि स्वतः जरांगे पाटील यांनाही अश्रू अनावर झाले. कालच्या पत्रकार परिषदेतही जरांगे पाटील भावूक झाले होते. “ही माझी शेवटची भेट असू शकते; पण हार मानायची नाही. जातवान लढा, समाजाची हार होऊ देऊ नका,” असे आवाहन त्यांनी समाजाला केले होते. त्यांच्या या शब्दांची छाया आज कुटुंबीयांच्या निरोपाच्या क्षणीही स्पष्टपणे जाणवली. जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत, “मेला पण शरण नाही गेला, असा संदेश समाजात गेला पाहिजे. छातीवर गोळ्या घेतल्या, पळून नाही गेला, असे वाटले पाहिजे,” अशी भावना व्यक्त केली. तसेच, “जोपर्यंत मी जगेन, तोपर्यंत झुंज देतो. माझ्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावागावात शांतता फेऱ्या काढा,” असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या संघर्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, “दगा-फटका कधी कुणासोबत होईल सांगता येत नाही. संकट कितीही आले आणि शत्रू कितीही मोठा असला तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे,” असे ठामपणे सांगितले. पत्नी सौमित्रा यांची अमृता फडणवीस यांना भावनिक साद दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि अमृता फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बहीण-भाऊ या नात्याचा उल्लेख होत असताना आता जरांगे पाटील यांच्या पत्नी सौमित्रा यांनीही भावनिक साद घातली आहे. “पाटलाच्या कुटुंबीयांची अवस्था पाहूनही सरकारला पाझर फुटत नसेल, तर महाराष्ट्रातील माय-बहिणींना ‘लाडकी बहीण’ म्हणण्याचा सरकारला अधिकार नाही. सरकारला या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू दिसत नाहीत का?” असा भावनिक सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. मुंबईकडे रवाना होताना पतीला निरोप देताना पत्नीच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले. संघर्षाच्या वाटेवर निघालेल्या एका पतीला, वडिलांना आणि कुटुंबप्रमुखाला निरोप देतानाचा हा क्षण अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. एका बाजूला आरक्षणासाठीचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू… जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे रवाना होण्याचा हा क्षण आंदोलनाच्या इतिहासातील अत्यंत भावनिक क्षण ठरला आहे. “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका…”; कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधत जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच.. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज, १५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने कुच केली. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका. लेकरांना कुणाच्या दारात जाऊ देऊ नका. गरज पडली तर रान विकून मुलीचं लग्न करा…” त्यांच्या या भावनिक शब्दांमुळे उपस्थित वातावरण गंभीर झाले.
    3
    “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू
“ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू
“या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू सरकारला दिसत नाहीत का?”; पत्नी सौमित्रा यांची भावनिक साद
अंतरवाली सराटी | ओमप्रकाश उढाण 
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज मंगळवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र मुंबईकडे निघण्यापूर्वी कुटुंबीयांची घेतलेली भेट अत्यंत भावनिक ठरली. जरांगे पाटील यांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले होते. या भेटीच्या वेळी कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि स्वतः जरांगे पाटील यांनाही अश्रू अनावर झाले.
कालच्या पत्रकार परिषदेतही जरांगे पाटील भावूक झाले होते. “ही माझी शेवटची भेट असू शकते; पण हार मानायची नाही. जातवान लढा, समाजाची हार होऊ देऊ नका,” असे आवाहन त्यांनी समाजाला केले होते. त्यांच्या या शब्दांची छाया आज कुटुंबीयांच्या निरोपाच्या क्षणीही स्पष्टपणे जाणवली.
जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत, “मेला पण शरण नाही गेला, असा संदेश समाजात गेला पाहिजे. छातीवर गोळ्या घेतल्या, पळून नाही गेला, असे वाटले पाहिजे,” अशी भावना व्यक्त केली. तसेच, “जोपर्यंत मी जगेन, तोपर्यंत झुंज देतो. माझ्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावागावात शांतता फेऱ्या काढा,” असे आवाहनही त्यांनी केले.
आपल्या संघर्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, “दगा-फटका कधी कुणासोबत होईल सांगता येत नाही. संकट कितीही आले आणि शत्रू कितीही मोठा असला तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे,” असे ठामपणे सांगितले.
पत्नी सौमित्रा यांची अमृता फडणवीस यांना भावनिक साद
दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि अमृता फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बहीण-भाऊ या नात्याचा उल्लेख होत असताना आता जरांगे पाटील यांच्या पत्नी सौमित्रा यांनीही भावनिक साद घातली आहे.
“पाटलाच्या कुटुंबीयांची अवस्था पाहूनही सरकारला पाझर फुटत नसेल, तर महाराष्ट्रातील माय-बहिणींना ‘लाडकी बहीण’ म्हणण्याचा सरकारला अधिकार नाही. सरकारला या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू दिसत नाहीत का?” असा भावनिक सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला.
मुंबईकडे रवाना होताना पतीला निरोप देताना पत्नीच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले. संघर्षाच्या वाटेवर निघालेल्या एका पतीला, वडिलांना आणि कुटुंबप्रमुखाला निरोप देतानाचा हा क्षण अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला.
एका बाजूला आरक्षणासाठीचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू… जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे रवाना होण्याचा हा क्षण आंदोलनाच्या इतिहासातील अत्यंत भावनिक क्षण ठरला आहे.
“वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका…”; कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधत जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच..
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज, १५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने कुच केली. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधला.
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका. लेकरांना कुणाच्या दारात जाऊ देऊ नका. गरज पडली तर रान विकून मुलीचं लग्न करा…” त्यांच्या या भावनिक शब्दांमुळे उपस्थित वातावरण गंभीर झाले.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सर्व समाज बांधवांना विनंती आहे की उद्या परभणी येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती महाराष्ट्रातील सर्व तमाम धनगर समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे उद्या 17 सप्टेंबर या दिवशी परभणी येथे धनगर एसटी आरक्षण संदर्भामध्ये यलगार मोर्चाची नियोजन केले आहे तरी आपण सर्वांनी सकाळी ठीक दहा वाजता परभणी येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती
    1
    सर्व समाज बांधवांना विनंती आहे की उद्या परभणी येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती
महाराष्ट्रातील सर्व तमाम धनगर समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे उद्या 17 सप्टेंबर या दिवशी परभणी येथे धनगर एसटी आरक्षण संदर्भामध्ये यलगार मोर्चाची नियोजन केले आहे तरी आपण सर्वांनी सकाळी ठीक दहा वाजता परभणी येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत सोनपेठ (दर्शन) :- मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत, आजच्या नव्या पिढिला मराठी जुणे गाणे नकोसे वाटतात तेच जुण्या पिढिला जुण्या आठवणीत घेऊन जातात.
    1
    मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत  
मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत   
सोनपेठ (दर्शन) :- 
मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत, आजच्या नव्या पिढिला मराठी जुणे गाणे नकोसे वाटतात तेच जुण्या पिढिला जुण्या आठवणीत घेऊन जातात.
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त
    1
    सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त
सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    22 hrs ago
  • देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा केज | प्रतिनिधी केज तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत १५ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामविकास अधिकारी श्री. पोटभरे यांच्यासह संबंधित सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाची विशेष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणी दि. ७ एप्रिल २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मा. श्री. चौरे ए.बी. व श्री. हतागळे एस.डी. यांनी दि. ४ जुलै २०२५ रोजी देवगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या चौकशीदरम्यान १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे न करता सुमारे २ लाख रुपयांची रक्कम कथितरित्या उचलल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. या चौकशीचा अहवाल दि. १२ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती, केज यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, अहवाल सादर होऊनही संबंधित ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधितांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या सर्व कामांची कामनिहाय खर्चासह सखोल चौकशी व आर्थिक लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, बीड येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या प्रकरणी प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि चौकशी अहवालाच्या आधारे पुढील काय कारवाई केली जाते, याकडे देवगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
    4
    देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा

देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी
ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा
केज | प्रतिनिधी
केज तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत १५ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामविकास अधिकारी श्री. पोटभरे यांच्यासह संबंधित सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाची विशेष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या प्रकरणी दि. ७ एप्रिल २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मा. श्री. चौरे ए.बी. व श्री. हतागळे एस.डी. यांनी दि. ४ जुलै २०२५ रोजी देवगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या चौकशीदरम्यान १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे न करता सुमारे २ लाख रुपयांची रक्कम कथितरित्या उचलल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या चौकशीचा अहवाल दि. १२ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती, केज यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, अहवाल सादर होऊनही संबंधित ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधितांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या सर्व कामांची कामनिहाय खर्चासह सखोल चौकशी व आर्थिक लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, बीड येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या प्रकरणी प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि चौकशी अहवालाच्या आधारे पुढील काय कारवाई केली जाते, याकडे देवगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.