“ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू सरकारला दिसत नाहीत का?”; पत्नी सौमित्रा यांची भावनिक साद अंतरवाली सराटी | ओमप्रकाश उढाण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज मंगळवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र मुंबईकडे निघण्यापूर्वी कुटुंबीयांची घेतलेली भेट अत्यंत भावनिक ठरली. जरांगे पाटील यांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले होते. या भेटीच्या वेळी कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि स्वतः जरांगे पाटील यांनाही अश्रू अनावर झाले. कालच्या पत्रकार परिषदेतही जरांगे पाटील भावूक झाले होते. “ही माझी शेवटची भेट असू शकते; पण हार मानायची नाही. जातवान लढा, समाजाची हार होऊ देऊ नका,” असे आवाहन त्यांनी समाजाला केले होते. त्यांच्या या शब्दांची छाया आज कुटुंबीयांच्या निरोपाच्या क्षणीही स्पष्टपणे जाणवली. जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत, “मेला पण शरण नाही गेला, असा संदेश समाजात गेला पाहिजे. छातीवर गोळ्या घेतल्या, पळून नाही गेला, असे वाटले पाहिजे,” अशी भावना व्यक्त केली. तसेच, “जोपर्यंत मी जगेन, तोपर्यंत झुंज देतो. माझ्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावागावात शांतता फेऱ्या काढा,” असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या संघर्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, “दगा-फटका कधी कुणासोबत होईल सांगता येत नाही. संकट कितीही आले आणि शत्रू कितीही मोठा असला तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे,” असे ठामपणे सांगितले. पत्नी सौमित्रा यांची अमृता फडणवीस यांना भावनिक साद दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि अमृता फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बहीण-भाऊ या नात्याचा उल्लेख होत असताना आता जरांगे पाटील यांच्या पत्नी सौमित्रा यांनीही भावनिक साद घातली आहे. “पाटलाच्या कुटुंबीयांची अवस्था पाहूनही सरकारला पाझर फुटत नसेल, तर महाराष्ट्रातील माय-बहिणींना ‘लाडकी बहीण’ म्हणण्याचा सरकारला अधिकार नाही. सरकारला या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू दिसत नाहीत का?” असा भावनिक सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. मुंबईकडे रवाना होताना पतीला निरोप देताना पत्नीच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले. संघर्षाच्या वाटेवर निघालेल्या एका पतीला, वडिलांना आणि कुटुंबप्रमुखाला निरोप देतानाचा हा क्षण अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. एका बाजूला आरक्षणासाठीचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू… जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे रवाना होण्याचा हा क्षण आंदोलनाच्या इतिहासातील अत्यंत भावनिक क्षण ठरला आहे. “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका…”; कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधत जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच.. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज, १५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने कुच केली. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका. लेकरांना कुणाच्या दारात जाऊ देऊ नका. गरज पडली तर रान विकून मुलीचं लग्न करा…” त्यांच्या या भावनिक शब्दांमुळे उपस्थित वातावरण गंभीर झाले.
“ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू सरकारला दिसत नाहीत का?”; पत्नी सौमित्रा यांची भावनिक साद अंतरवाली सराटी | ओमप्रकाश उढाण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज मंगळवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र मुंबईकडे निघण्यापूर्वी कुटुंबीयांची घेतलेली भेट अत्यंत भावनिक ठरली. जरांगे पाटील यांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले होते. या भेटीच्या वेळी कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि स्वतः जरांगे पाटील यांनाही अश्रू अनावर झाले. कालच्या पत्रकार परिषदेतही जरांगे पाटील भावूक झाले होते. “ही माझी शेवटची भेट असू शकते; पण हार मानायची नाही. जातवान लढा, समाजाची हार होऊ देऊ नका,” असे आवाहन त्यांनी समाजाला केले होते. त्यांच्या या शब्दांची छाया आज कुटुंबीयांच्या निरोपाच्या क्षणीही स्पष्टपणे जाणवली. जरांगे पाटील
यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत, “मेला पण शरण नाही गेला, असा संदेश समाजात गेला पाहिजे. छातीवर गोळ्या घेतल्या, पळून नाही गेला, असे वाटले पाहिजे,” अशी भावना व्यक्त केली. तसेच, “जोपर्यंत मी जगेन, तोपर्यंत झुंज देतो. माझ्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावागावात शांतता फेऱ्या काढा,” असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या संघर्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, “दगा-फटका कधी कुणासोबत होईल सांगता येत नाही. संकट कितीही आले आणि शत्रू कितीही मोठा असला तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे,” असे ठामपणे सांगितले. पत्नी सौमित्रा यांची अमृता फडणवीस यांना भावनिक साद दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि अमृता फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बहीण-भाऊ या नात्याचा उल्लेख होत असताना आता जरांगे पाटील यांच्या पत्नी सौमित्रा यांनीही भावनिक साद घातली आहे. “पाटलाच्या कुटुंबीयांची अवस्था पाहूनही सरकारला पाझर फुटत नसेल, तर महाराष्ट्रातील माय-बहिणींना ‘लाडकी बहीण’ म्हणण्याचा सरकारला अधिकार नाही. सरकारला या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू दिसत नाहीत का?” असा भावनिक सवाल या
निमित्ताने उपस्थित करण्यात आला. मुंबईकडे रवाना होताना पतीला निरोप देताना पत्नीच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले. संघर्षाच्या वाटेवर निघालेल्या एका पतीला, वडिलांना आणि कुटुंबप्रमुखाला निरोप देतानाचा हा क्षण अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. एका बाजूला आरक्षणासाठीचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू… जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे रवाना होण्याचा हा क्षण आंदोलनाच्या इतिहासातील अत्यंत भावनिक क्षण ठरला आहे. “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका…”; कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधत जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच.. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज, १५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने कुच केली. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका. लेकरांना कुणाच्या दारात जाऊ देऊ नका. गरज पडली तर रान विकून मुलीचं लग्न करा…” त्यांच्या या भावनिक शब्दांमुळे उपस्थित वातावरण गंभीर झाले.
- प्रभाग १० मध्ये नाल्यावर जंतुनाशक फवारणी सुरू; नगरसेवकांच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल!.. शेख अनिस मित्र मंडळाच्या मागणीची आयुक्त अंजली शर्मा यांनी घेतली तात्काळ दखल; ‘जे काम नगरसेवकांनी करायचे, ते सामाजिक कार्यकर्त्यांना का करावे लागते?’ प्रभाग १० मध्ये नाल्यावर जंतुनाशक फवारणी सुरू; नगरसेवकांच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल!.. शेख अनिस मित्र मंडळाच्या मागणीची आयुक्त अंजली शर्मा यांनी घेतली तात्काळ दखल; ‘जे काम नगरसेवकांनी करायचे, ते सामाजिक कार्यकर्त्यांना का करावे लागते?’ आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : प्रभाग क्रमांक १० मधील माळीपुरा परिसरातील नाल्यांमध्ये घाण, दुर्गंधी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेख अनिस मित्र मंडळाच्या वतीने नाल्यावर जंतुनाशक फवारणी आणि नाल्याची साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी तात्काळ दखल घेत स्वच्छता विभागाला आवश्यक आदेश दिले. त्यानंतर आज माळीपुरा परिसरातील नाल्यावर जंतुनाशक फवारणी आणि नाल्याची साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली.1
- नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात.. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग.. नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात.. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग..1
- मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात निधोनायेथे चंदनझिरा पोलीस आणि एस पी पथकाची मोठी कारवाई जुगार अड्ड्यावर छापा टाकून १४ जुगारावर गुन्हा दाखल २५लाख ८९हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त1
- 17 सप्टेंबर2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची प्रतिक्रिया. 17 सप्टेंबर 2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची विशेष प्रतिक्रिया.1
- मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली ; उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज भासली. पाटोदा येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना सलाईन देण्यात आली आणि रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, २० दिवसांचे उपोषण संपवल्यानंतर जरांगे पाटील बीडमधून छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.1
- जालन्यात मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला! चंदनझिऱ्यातील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना; मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप जालन्यात मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला! चंदनझिऱ्यातील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना; मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप1
- आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.1
- जालन्यात गीतांजली कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला!.. चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?.. जालन्यात गीतांजली कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला!.. चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?.. चंदनझिऱ्यातील घटनेनंतर काही दिवसांतच दुसरी घटना; मनपा प्रशासन नेमकी कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतेय? सामाजिक कार्यकर्ता कामरान खान यांचा थेट सवाल.. चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?.. आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आता केवळ नागरिकांच्या त्रासापुरता राहिलेला नसून, लहान मुलांच्या जीविताच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. चंदनझिऱ्यात दीड वर्षांच्या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता डीएड कॉलेज, गीतांजली कॉलनी व नॅशनल नगर परिसरात दोन वर्षांच्या जैनब पठाण या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने तिच्या गालाचा अक्षरशः लचका तोडल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमी जैनबवर जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, दोन वर्षांच्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर झालेल्या या जखमेने मोकाट कुत्र्यांच्या समस्येचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.1