logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

17 सप्टेंबर2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची प्रतिक्रिया. 17 सप्टेंबर 2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची विशेष प्रतिक्रिया.

2 hrs ago
user_Mahadev pakhare super
Mahadev pakhare super
मराठवाडा अभिनेता,पत्रकार मंठा, जालना, महाराष्ट्र•
2 hrs ago

17 सप्टेंबर2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची प्रतिक्रिया. 17 सप्टेंबर 2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची विशेष प्रतिक्रिया.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. दोन मिठाई विक्रेत्यांकडून एकूण 855 किलो, 1 लाख 26 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 16 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी आर.पी. रोड येथील मे. आकाश नंदकिशोर अग्रवाल या पेढीवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून मैसूर पाक, हलवा आणि शेव या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले.
    1
    सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई..

दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..


सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई..
दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..
दोन मिठाई विक्रेत्यांकडून एकूण 855 किलो, 1 लाख 26 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त..
आज दिनांक 16 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी आर.पी. रोड येथील मे. आकाश नंदकिशोर अग्रवाल या पेढीवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून मैसूर पाक, हलवा आणि शेव या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.
    1
    रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा

नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.

रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा
नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.
    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केली सेनगाव परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी सेनगाव तालुक्यातील नागा सिनगी येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते मारोती गीते यांच्या मागण्याची अखेर शासनाच्या वतीने दखल घेण्यात आली असून हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकरी नेते मारोती गिते यांच्या सेनगाव परिसरात असलेल्या शेतातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी पाहणी केली. यावेळी तात्काळ शेतकऱ्यांना 100% पीक विमा व सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते मारोती गीते यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री नरहरी झिरवळ हे आजेगाव कडून सेनगावच्या दिशेने जात असताना मारोती गीते यांनी सेनगाव परिसरातील आपल्या शेतात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी नेते मारोती गीते यांच्या कार्याचे कौतुक देखील पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केले. हिंगोली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन सह पिके धोक्यात सापडुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पावसाअभावी पिके वाळून जात आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकरी नेते मारोती गीते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
    1
    पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केली सेनगाव परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी
सेनगाव तालुक्यातील नागा सिनगी येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते मारोती गीते यांच्या मागण्याची अखेर शासनाच्या वतीने दखल घेण्यात आली असून हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकरी नेते मारोती गिते यांच्या सेनगाव परिसरात असलेल्या शेतातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी पाहणी केली. यावेळी तात्काळ शेतकऱ्यांना 100% पीक विमा व सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते मारोती गीते यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री नरहरी झिरवळ हे आजेगाव कडून सेनगावच्या दिशेने जात असताना मारोती गीते यांनी सेनगाव परिसरातील आपल्या शेतात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी नेते मारोती गीते यांच्या कार्याचे कौतुक देखील पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केले. हिंगोली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन सह पिके धोक्यात सापडुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पावसाअभावी पिके वाळून जात आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकरी नेते मारोती गीते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून पालकमंत्री  नरहरी झिरवळ यांनी आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; हेक्टरी १ लाखांची मदत द्या! रिसोड, ता. 17 : पावसाने दडी मारल्याने रिसोड तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक भागांत सोयाबीनसह इतर पिके पाण्याअभावी सुकून करपली असून, शेतकऱ्यांच्या हातातून यंदाचा हंगाम अक्षरशः निसटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पिकांना निर्णायक अवस्थेत पाण्याचा ताण बसला. शेतातील सोयाबीनची पाने पिवळी पडून झाडे सुकू लागली आहेत. काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बियाणे, खत, मशागत, मजुरी आणि औषधांवर मोठा खर्च करूनही हातात काहीच उरणार नाही, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित दर आणि आता पावसाच्या दडीमुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडला आहे.
    2
    रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; हेक्टरी १ लाखांची मदत द्या!
रिसोड, ता. 17 : पावसाने दडी मारल्याने रिसोड तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक भागांत सोयाबीनसह इतर पिके पाण्याअभावी सुकून करपली असून, शेतकऱ्यांच्या हातातून यंदाचा हंगाम अक्षरशः निसटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पिकांना निर्णायक अवस्थेत पाण्याचा ताण बसला. शेतातील सोयाबीनची पाने पिवळी पडून झाडे सुकू लागली आहेत. काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बियाणे, खत, मशागत, मजुरी आणि औषधांवर मोठा खर्च करूनही हातात काहीच उरणार नाही, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित दर आणि आता पावसाच्या दडीमुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडला आहे.
    user_Shankar Maroti Sadar
    Shankar Maroti Sadar
    रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे
    1
    ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे
ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    23 hrs ago
  • सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
    1
    सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जालन्यात खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम!.. जिल्ह्यात जूनपासून केवळ ८१ टक्के पाऊस; संयुक्त पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर.. जालन्यात खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम!.. जिल्ह्यात जूनपासून केवळ ८१ टक्के पाऊस; संयुक्त पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर.. आज दिनांक 16 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने ओढ दिल्याने जालना जिल्ह्यातील पिकांच्या परिस्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसातील अनिश्चितता आणि वारंवार पडलेल्या खंडामुळे खरीप पिकांची वाढ, उत्पादन क्षमता आणि एकूणच शेतीची स्थिती चिंताजनक बनली आहे. १४ सप्टेंबरअखेर जिल्ह्यात जूनपासून सरासरीच्या केवळ ८१ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. सप्टेंबर महिन्यात तर १४ तारखेपर्यंत सरासरीच्या केवळ ३३.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खरीप पिकांची वस्तुनिष्ठ परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रशासनाने संयुक्त पीक पाहणी केली असून, सर्व तालुक्यांचा संकलित प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक घेण्यात आली.
    1
    जालन्यात खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम!..

जिल्ह्यात जूनपासून केवळ ८१ टक्के पाऊस; संयुक्त पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर..


जालन्यात खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम!..
जिल्ह्यात जूनपासून केवळ ८१ टक्के पाऊस; संयुक्त पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर..
आज दिनांक 16 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने ओढ दिल्याने जालना जिल्ह्यातील पिकांच्या परिस्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसातील अनिश्चितता आणि वारंवार पडलेल्या खंडामुळे खरीप पिकांची वाढ, उत्पादन क्षमता आणि एकूणच शेतीची स्थिती चिंताजनक बनली आहे. १४ सप्टेंबरअखेर जिल्ह्यात जूनपासून सरासरीच्या केवळ ८१ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. सप्टेंबर महिन्यात तर १४ तारखेपर्यंत सरासरीच्या केवळ ३३.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खरीप पिकांची वस्तुनिष्ठ परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रशासनाने संयुक्त पीक पाहणी केली असून, सर्व तालुक्यांचा संकलित प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक घेण्यात आली.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड : १४ जुगाऱ्यांवर कारवाई पोलीस ठाणे चंदनझिर जालना जुगाराचे साहीत्य व वाहनांसह २५ लक्ष ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक यांचे पथक व चंदनझिरा पोलीस यांची संयुक्त कारवाई निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड : १४ जुगाऱ्यांवर कारवाई पोलीस ठाणे चंदनझिर जालना जुगाराचे साहीत्य व वाहनांसह २५ लक्ष ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक यांचे पथक व चंदनझिरा पोलीस यांची संयुक्त कारवाई
    1
    निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड : १४ जुगाऱ्यांवर कारवाई पोलीस ठाणे चंदनझिर जालना

जुगाराचे साहीत्य व वाहनांसह २५ लक्ष ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक यांचे पथक व चंदनझिरा पोलीस यांची संयुक्त कारवाई

निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड : १४ जुगाऱ्यांवर कारवाई पोलीस ठाणे चंदनझिर जालना
जुगाराचे साहीत्य व वाहनांसह २५ लक्ष ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक यांचे पथक व चंदनझिरा पोलीस यांची संयुक्त कारवाई
    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पावसाने फिरवली पाठ;सेनगावच्या शेतकऱ्याचे सुकळी खुर्द शिवारातील ४ एकर सोयाबीन जळून खाक,महसुल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार? सेनगाव/विश्वनाथ देशमुख निसर्गाच्या लहरीपणाचा आणि पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके डोळ्यादेखत करपून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.सेनगाव येथील एका शेतकऱ्याचे उभे पीक पाऊस न पडल्याने जळून खाक झाले आहे.पावसाने ऐन गरजेच्या वेळी पाठ फिरवल्यामुळे सेनगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांच्या सुकळी खुर्द शिवारातील तब्बल चार एकर क्षेत्रातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाळून नष्ट झाले आहे.शेती सुकळी शिवारात असली तरी देशमुख हे सेनगाव शहरात राहून तिथूनच शेतीचा संपूर्ण कारभार पाहत होते.या कोरड्या दुष्काळामुळे देशमुख यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून,त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.मात्र,या गंभीर परिस्थितीनंतरही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने 'महसूल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार?'असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी लक्ष्मण देशमुख यांनी मोठ्या आशेने सुकळी खुर्द शिवारातील आपल्या गट क्रमांक १०९ मधील चार एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती.बियाणे,खते,कोळपणी आणि खुरपणीसाठी हजारो रुपयांचे कर्ज काढून त्यांनी पिकाला पोटच्या पोरासारखे सांभाळले.पीक जोमात असतानाच अचानक पावसाने दीर्घकाळ दडी मारली.कडक ऊन आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे अखेर हे उभे पीक करपून गेले.या दुर्दैवी घटनेमुळे सेनगाव आणि सुकळी खुर्द परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.आधीच संकटात असलेल्या बळीराजाला आता शासनाच्या आधाराची अत्यंत गरज आहे.पिकाचे नुकसान होऊन दिवस उलटत चालले तरी महसूल विभाग किंवा कृषीऐ विभागाचा एकही अधिकारी सुकळी शिवाराकडे फिरकलेला नाही.त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने या गंभीर नुकसानीची दखल घेऊन तातडीने संयुक्त पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विशेष सरकारी मदत व पीक विमा मंजूर करावा,अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. "कर्ज काढून पोटाच्या पोरासारखं सोयाबीन सांभाळलं,पण पावसाने दगा दिला अन डोळ्यादेखत सोन्यासारखं रान जळून कोळसा झालं! चार एकरात आता फक्त काळ्या काड्या उरल्यात.हे उध्वस्त रान पाहताना काळजाचा तुकडा तुटल्यागत वेदना होत आहेत.कर्ज कसं फेडू आणि लेकरांना काय खायला घालू? पीक जळून राख झाली तरी अधिकारी अजून बांधावर आले नाहीत.सरकारने तातडीने मदत दिली नाही,तर आमच्यावर फाशी घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही!" — लक्ष्मण रामराव देशमुख (पीडित शेतकरी,सेनगाव)
    1
    पावसाने फिरवली पाठ;सेनगावच्या शेतकऱ्याचे सुकळी खुर्द शिवारातील ४ एकर सोयाबीन जळून खाक,महसुल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार?
सेनगाव/विश्वनाथ देशमुख 
निसर्गाच्या लहरीपणाचा आणि पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके डोळ्यादेखत करपून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.सेनगाव येथील एका शेतकऱ्याचे उभे पीक पाऊस न पडल्याने जळून खाक झाले आहे.पावसाने ऐन गरजेच्या वेळी पाठ फिरवल्यामुळे सेनगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांच्या सुकळी खुर्द शिवारातील तब्बल चार एकर क्षेत्रातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाळून नष्ट झाले आहे.शेती सुकळी शिवारात असली तरी देशमुख हे सेनगाव शहरात राहून तिथूनच शेतीचा संपूर्ण कारभार पाहत होते.या कोरड्या दुष्काळामुळे देशमुख यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून,त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.मात्र,या गंभीर परिस्थितीनंतरही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने 'महसूल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार?'असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी लक्ष्मण देशमुख यांनी मोठ्या आशेने सुकळी खुर्द शिवारातील आपल्या गट क्रमांक १०९ मधील चार एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती.बियाणे,खते,कोळपणी आणि खुरपणीसाठी हजारो रुपयांचे कर्ज काढून त्यांनी पिकाला पोटच्या पोरासारखे सांभाळले.पीक जोमात असतानाच अचानक पावसाने दीर्घकाळ दडी मारली.कडक ऊन आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे अखेर हे उभे पीक करपून गेले.या दुर्दैवी घटनेमुळे सेनगाव आणि सुकळी खुर्द परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.आधीच संकटात असलेल्या बळीराजाला आता शासनाच्या आधाराची अत्यंत गरज आहे.पिकाचे नुकसान होऊन दिवस उलटत चालले तरी महसूल विभाग किंवा कृषीऐ विभागाचा एकही अधिकारी सुकळी शिवाराकडे फिरकलेला नाही.त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने या गंभीर नुकसानीची दखल घेऊन तातडीने संयुक्त पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विशेष सरकारी मदत व पीक विमा मंजूर करावा,अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
"कर्ज काढून पोटाच्या पोरासारखं सोयाबीन सांभाळलं,पण पावसाने दगा दिला अन डोळ्यादेखत सोन्यासारखं रान जळून कोळसा झालं! चार एकरात आता फक्त काळ्या काड्या उरल्यात.हे उध्वस्त रान पाहताना काळजाचा तुकडा तुटल्यागत वेदना होत आहेत.कर्ज कसं फेडू आणि लेकरांना काय खायला घालू? पीक जळून राख झाली तरी अधिकारी अजून बांधावर आले नाहीत.सरकारने तातडीने मदत दिली नाही,तर आमच्यावर फाशी घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही!"
— लक्ष्मण रामराव देशमुख (पीडित शेतकरी,सेनगाव)
    user_Vishwanath Deshmukh
    Vishwanath Deshmukh
    सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.