देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा केज | प्रतिनिधी केज तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत १५ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामविकास अधिकारी श्री. पोटभरे यांच्यासह संबंधित सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाची विशेष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणी दि. ७ एप्रिल २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मा. श्री. चौरे ए.बी. व श्री. हतागळे एस.डी. यांनी दि. ४ जुलै २०२५ रोजी देवगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या चौकशीदरम्यान १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे न करता सुमारे २ लाख रुपयांची रक्कम कथितरित्या उचलल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. या चौकशीचा अहवाल दि. १२ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती, केज यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, अहवाल सादर होऊनही संबंधित ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधितांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या सर्व कामांची कामनिहाय खर्चासह सखोल चौकशी व आर्थिक लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, बीड येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या प्रकरणी प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि चौकशी अहवालाच्या आधारे पुढील काय कारवाई केली जाते, याकडे देवगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा केज | प्रतिनिधी केज तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत १५ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामविकास अधिकारी श्री. पोटभरे यांच्यासह
संबंधित सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाची विशेष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणी दि. ७ एप्रिल २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मा. श्री. चौरे ए.बी. व श्री. हतागळे एस.डी. यांनी दि. ४ जुलै २०२५ रोजी देवगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या चौकशीदरम्यान १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे न करता सुमारे
२ लाख रुपयांची रक्कम कथितरित्या उचलल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. या चौकशीचा अहवाल दि. १२ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती, केज यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, अहवाल सादर होऊनही संबंधित ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधितांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या सर्व कामांची कामनिहाय
खर्चासह सखोल चौकशी व आर्थिक लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, बीड येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या प्रकरणी प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि चौकशी अहवालाच्या आधारे पुढील काय कारवाई केली जाते, याकडे देवगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
- कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन बीड | प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. पावसाअभावी आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. “कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्या” या प्रमुख मागणीसह गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने अदा करावी आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. हलगीच्या गजरात प्रशासनाचे लक्ष वेधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक मदत जाहीर करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.2
- पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी जंतर- मंतर येथील देशव्यापी आंदोलनात सहभागी व्हा - अमरजान पठाण बीड(प्रतिनिधी):अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)च्या बीड जिल्हाध्यक्षपदी उच्चशिक्षित व युवा पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. यानिमित्त शहरातील नीलकमल हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात समितीचे मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ समाजसेवक व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते पठाण अमरजान यांनी नियुक्तीपत्र स्वीकारून जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. शहरातील नीलकमल हॉटेल येथे अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांनी राजेश कुमार जोगदंड (मार्गदर्शक), मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ, पत्रकार बालाजी जगतकर, पत्रकार नितीन जोगदंड, शेख पाशाभाई (सदस्य, मार्गदर्शक मंडळ), रमेश गंगाधरे, शेख पाशुभाई, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ पठाण आणि शेख वजीरभाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारून अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला. पुनर्निवडीनंतर बोलताना पठाण अमरजान यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्कांचे संरक्षण, पत्रकारांना मिळणारा सन्मान आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न यासाठी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला.बीड जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे उभे राहण्यासोबतच पत्रकारांवरील हल्ले, धमक्या, दबाव तसेच खोटे गुन्हे दाखल करून होणाऱ्या कथित अन्यायाविरोधात कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांवरील हल्ले आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर होत असताना देशभरात पत्रकार सुरक्षा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर-मंतरवर १ डिसेंबरपासून आयोजित देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पठाण अमरजान यांनी उपस्थित पत्रकारांना दिली. पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी सक्षम कायदेशीर संरक्षण मिळणे आवश्यक असून, देशभर पत्रकार सुरक्षा कायदा लागू होईपर्यंत लोकशाही आणि संविधानिक मार्गाने हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)चे शेख जावेद, सय्यद रेहान हुसेनी, शेख मोहसीन, शेख इद्रीस, सह समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.3
- महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज (मठाधिपती नारायणगड संस्थान), आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (नवगण राजुरी), महंत महादेव महाराज भारती (बेलेश्वर संस्थान बेलगाव) श्री क्षेत्र भालचंद्र गणपतीच्या चरणी नतमस्तक.:-डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर1
- मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.1
- 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना ! ताफ्यासह 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अखेर आज १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना झाले आहेत. कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्यांनी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.ड्रोन व्हिडीओ1
- सोनपेठ शहरातील प्रमुख श्री गणेश मंडळाचे दर्शन...2026....गल्लोगल्लीत मोठ मोठ्याच मंगलमुर्ती... सोनपेठ शहरातील प्रमुख श्री गणेश मंडळाचे दर्शन...2026....गल्लोगल्लीत मोठ मोठ्याच मंगलमुर्ती... सोनपेठ (दर्शन) :- श्री आर्य वैश्य समाज नगरेश्वर गणेश मंडळ सोनपेठ. श्री एकता गणेश मित्र मंडळ महाजन गल्ली सोनपेठ. श्री मोरया प्रतिष्ठान गरुड चौक सोनपेठ. श्री सुखकर्ता गणेश मंडळ वरकड गल्ली सोनपेठ. श्री कुंभार गल्ली गणेश मित्र मंडळ सोनपेठ. श्री सार्वजणीक रामेश्वर प्रासादिक गणेश मंडळ सोनपेठ. श्री चिंतामणी गणेश मित्र मंडळ सोनपेठ. श्री अष्ठविनायक गणेश मंडळ सारडा गल्ली सोनपेठ. श्री जय भवानी गणेश मित्र मंडळ निरगुड वट्टा सोनपेठ. श्री जय मल्हार गणेश मंडळ दहिखेड सोनपेठ. श्री जगदंब प्रासादिक गणेश मंडळ सोनपेठ. श्री सार्वजनिक गणेश मंडळ सोनखेड सोनपेठ. श्री सोमेश्वर गणेश मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री चर्मकार गणेश मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री लहुजीनगरचा राजा गणेश मंडळ सोनपेठ. श्री संभाजीनगर गणेश मंडळ सोनपेठ. श्री सुवर्णकार गणेश मंडळ हनुमान मंदिर सोनपेठ. श्री छत्रपती प्रतिष्ठान गणेश मंडळ होळकर चौक सोनपेठ. श्री सोनपेठचा राजा प्रतिष्ठाण गणेश मंडळ छत्रपती चौक सोनपेठ. श्री नवतरुण गणेश मंडळ गणेशनगर सोनपेठ. श्री श्रीराम गणेश मंडळ मसनजोगी वसाहत सोनपेठ. श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर सोनपेठ.1
- श्री सोमेश्वर संस्थेचा अमृतमहोत्सव आणि भव्य व्याख्यानमाला जाहीर1
- देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा केज | प्रतिनिधी केज तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत १५ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामविकास अधिकारी श्री. पोटभरे यांच्यासह संबंधित सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाची विशेष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणी दि. ७ एप्रिल २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मा. श्री. चौरे ए.बी. व श्री. हतागळे एस.डी. यांनी दि. ४ जुलै २०२५ रोजी देवगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या चौकशीदरम्यान १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे न करता सुमारे २ लाख रुपयांची रक्कम कथितरित्या उचलल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. या चौकशीचा अहवाल दि. १२ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती, केज यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, अहवाल सादर होऊनही संबंधित ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधितांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या सर्व कामांची कामनिहाय खर्चासह सखोल चौकशी व आर्थिक लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, बीड येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या प्रकरणी प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि चौकशी अहवालाच्या आधारे पुढील काय कारवाई केली जाते, याकडे देवगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.4