Shuru
Apke Nagar Ki App…
जिल्हा परिषद शाळा पिंपळवाडी ता राहता येथील इयत्ता 7 वी च्या विद्यार्थी व विद्यार्थिनी निरोप समारंभ मेळावा संपन्न झाला
शिवाजी पोपटराव कवडे पाटील
जिल्हा परिषद शाळा पिंपळवाडी ता राहता येथील इयत्ता 7 वी च्या विद्यार्थी व विद्यार्थिनी निरोप समारंभ मेळावा संपन्न झाला
More news from महाराष्ट्र and nearby areas
- गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरातील आरापूर–सुलतानाबाद एमआयडीसी संदर्भात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी, २५ एप्रिल रोजी गवळीशिवरा येथील सप्ताह मैदानात पार पडली. या बैठकीला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.एमआयडीसी प्रकल्प, जमीन अधिग्रहण, स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होत असताना आमदार बंब यांनी शिक्षण व्यवस्थेबाबतही कठोर भूमिका मांडली.1
- नाशिक RTO परिसरात उघडं चेंबर; तरुण पडला, नागरिकांनी वाचवला जीव #NashikNews #BreakingNews ----------------------------------------- नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. RTO कार्यालयाजवळील परिसरात उघड्या चेंबरमध्ये एक तरुण पडल्याची घटना घडली. चेंबरवर कोणतेही झाकण नव्हते, तसेच कोणतीही सूचना फलकही लावलेला नव्हता, त्यामुळे हा अपघात घडल्याचं स्पष्ट होत आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत तरुणाला बाहेर काढलं आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे नाशिक महानगरपालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरात अशा उघड्या चेंबर्समुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असून प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.1
- मालेगाव शहरातील वार्ड क्रमांक ८, हिंगलाज नगर, गली क्रमांक २ येथे नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. जर वेळेवर योग्य पाणीपुरवठा झाला नाही, तर येथील जनतेची अवस्था अतिशय वाईट होऊ शकते. पिण्याच्या पाण्याअभावी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होत आहे. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.1
- Post by Anand Gangurde3
- मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही नाशिकमधील उत्तम नगर भागात राहणारी असून ती एका खासगी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. कौटुंबिक अडचणी आणि मानसिक त्रासामुळे तिला तिच्या पालकांनी धरणगाव खडक येथील एका मंदिरात नेले होते. तेथे महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याने तिच्यावर 'करणीबाधा' असल्याचे सांगून तिला उपचारांच्या नावाखाली जाळ्यात ओढले. अत्याचाराचा घटनाक्रम पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुरुवातीला बाबाने तिला पूजेसाठी दर गुरुवारी येण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिच्या मोबाईलवर वैयक्तिक आणि आक्षेपार्ह मेसेजेस पाठवण्यास सुरुवात केली. २३ ऑगस्ट २०२४ रोजी बाबाने पीडितेची दिशाभूल करून तिला पंचवटी परिसरात बोलावले. तिथून त्याने तिला आपल्या चारचाकी गाडीने त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजवर नेले. महिलेने विरोध केला असता, त्याने आपल्या गळ्यातील रुद्राक्ष मणी दाखवत "माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तू काहीच प्रतिकार करू शकणार नाहीस," अशी भीती घातली आणि तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकेच नाही तर तिचे विवस्त्र फोटो काढून तिला धमकावले. धमकावून पुरावे नष्ट केले या प्रकारानंतर पीडितेने आपल्या पतीला ही हकीकत सांगितली. जेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा विचार केला, तेव्हा आरोपीने तिला कार्यालयात बोलावून "मी गुंड आहे, कोणाला काही सांगितलेस तर गाठ माझ्याशी आहे" अशी धमकी दिली. तसेच पीडितेच्या हाता मोबाईल हिसकावून त्यातील सर्व आक्षेपार्ह मेसेजेस आणि पुरावे डिलीट करून टाकले. अंनिसच्या मदतीने पोलिसांत धाव काही काळ भीतीपोटी शांत बसल्यानंतर, पीडित महिलेने आता धाडस दाखवून या प्रकाराची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला /माहिती दिल्यानंतर गुन्हा दाखल आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली एका २८ वर्षीय महिलेवर शारीरिक अत्याचार करून तिला धमकावल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. 'धारणगाव खडकमध्ये' (ता. निफाड) वास्तव्यास असलेल्या एका भोंदू बाबाने दैवी शक्तीची भीती दाखवून हे कृत्य केल्याचे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.1
- 📚 अभ्यासासाठी शांत आणि योग्य ठिकाण शोधताय? Saraswati Abhyasika मध्ये मिळवा शांत, स्वच्छ आणि एकाग्रतेसाठी योग्य वातावरण. 👉 आजच Admission घ्या! Call 93720036441
- घरफोडीचा ‘पहिला वर्धापन दिन’ साजरा; तपास रखडल्याने पीडित कुटुंबाचा संतप्त इशारा पाथर्डी | प्रतिनिधी तालुक्यातील माळीबाभुळगाव येथील वाळके वस्तीवरील घरफोडी प्रकरणाचा तपास एक वर्ष उलटूनही लागला नसल्याने पीडित कुटुंबाने संतप्त भावना व्यक्त करत आपल्या घरफोडीचा “पहिला वर्धापन दिन” साजरा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अनोख्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाच्या तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्री भाऊसाहेब नाना वाळके, रा. माळीबाभुळगाव (वाळके वस्ती), ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, दि. २७ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी मोठी घरफोडी केली होती. या घटनेत कष्टाने जमवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. विशेष म्हणजे हे घर पाथर्डी पोलीस ठाण्यापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असूनही एवढी मोठी चोरी होणे आणि त्यानंतर तब्बल एक वर्ष उलटूनही तपासाचा ठोस निष्कर्ष न लागणे, यामुळे पीडित कुटुंब हताश झाले आहे. दि. २७ एप्रिल २०२६ रोजी या चोरीला एक वर्ष पूर्ण झाल्याने वाळके यांनी उपरोधिक पद्धतीने “पहिला वर्धापन दिन” साजरा केल्याचे जाहीर केले. या निमित्ताने त्यांनी जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रशासन, पोलीस अधिकारी, तपास यंत्रणा आणि संबंधित पदाधिकाऱ्यांचे “मनःपूर्वक अभिनंदन” करत तीव्र नाराजी व्यक्त केली. वाळके यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, चोरीचा तपास तातडीने लावून गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा. अन्यथा स्वतःवर व कुटुंबावर आमरण उपोषण तसेच आत्मदहनाची वेळ येऊ शकते, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास वेळेत न लागल्यास जनतेचा विश्वास ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर दोषींना गजाआड करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: ९४२००२५३९५ / ८०१०११६११५ #दैनिक_जनता_जागृती1
- नाशिकच्या देवी मंदिरासमोर घडली घटना. एका लहान मुलीला ही बाई उचलुन नेत होती. कृपया आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आपल्या मुलांना खाली एकट सोडू नका. व अनोळखी फेरी वाले किंवा सेल्समन लोकांना आत येऊ देऊ नका. आपल्या लहान मुलांची काळजी घ्या व त्यांना एकट्याने दुकानात किंवा खाली पार्किंग मध्ये पाठवू नका . सगळ्यांनी काळजी घ्यावी.....1