logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वासना, अनैतिक संबंध आणि क्षणिक सुखासाठी एका निष्पाप जीवाचा घेतला बळी! मालेगाव तालुक्यातील घटना चारचौघांसारखा संसार, विश्वासाचे नाते आणि जन्मोजन्मीची दिलेली वचने... पण वासना आणि अनैतिक प्रेमाच्या अंधारात या पवित्र नात्याचीच कशी हत्या होते, याचा सुन्न करणारा प्रकार वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात वाकळवाडी येथे ३१ जुलै रोजी उघडकीस आला आहे. पती हा आपल्या अनैतिक प्रेमातील सर्वात मोठा 'काटा' बनत आहे, हे पाहून पत्नीनेच स्वतःच्या प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजून आणि दोरीने गळा आवळून त्याची निर्घृण हत्या केली. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.काही दिवसांपूर्वी पुण्यातील लोहगड येथे प्रियकराच्या मदतीने पतीचा केलेला घात असो, वा देशभरात गाजलेले सोनम प्रकरण असो... विकृत प्रेमापोटी पोटच्या गोळ्यांचा, सहचारिणीचा किंवा नवऱ्याचाच बळी घेण्याच्या घटनांची मालिका थांबताना दिसत नाही. याच भीषण आणि नराधम मानसिकतेची पुनरावृत्ती आता वाशीमच्या वाकळवाडी (तालुका मालेगाव ) शेतशिवारात पाहायला मिळाली आहे. नेमकी घटना काय?* मिळालेल्या माहितीनुसार, मृतक सुरेश राजाराम झळके (वय ३०, रा. अमानी, ता. मालेगाव) हा तरुण गेल्या चार-पाच दिवसांपासून वाकळवाडी येथील आपल्या सासुरवाडीला गेला होता. ३० जुलै रोजी वाकळवाडी शिवारातील सुनील चोंडकर यांच्या शेतात सुरेश याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार राजेश खेरडे आणि LCB प्रमुख सुधाकर आढे यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मृतक सुरेश याच्या मृत्यूबाबत संशय बळावल्याने मालेगाव पोलिसांनी त्याची पत्नी आशा सुरेश झळके आणि तिचा प्रियकर महादेव बजरंग अंभोरे (वय २५, रा. पूर, ता. मंगरुळनाथ) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. पोलिसांनी आपल्या खास शैलीत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.असा रचला हत्येचा कट!पती सुरेश आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्याने पत्नी आशा हिने प्रियकर महादेव याच्यासोबत मिळून पतीचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. ३० जुलै रोजी संशयित आरोपींनी सुरेश याला बेसुमार दारू पाजली. तो नशेत पूर्णपणे असहाय्य झाल्यानंतर दोघांनी मिळून दोरीने त्याचा गळा घट्ट आवळून फाशी दिली आणि त्याची हत्या केली. हत्येनंतर हा प्रकार आत्महत्या किंवा अपघात वाटेल अशा बेताने मृतदेह शेतात फेकून दिला. मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कायदा कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रात्री उशिरा ही हत्या सुरेश याच्या पत्नीने आपल्या प्रियकर महादेव याला सोबत घेऊन केल्याचे उघडकीस आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक गोखले, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन झगरे, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, पोलीस अंमलदार अमोल इरतकर आणि चालक सुनील तायडे यांच्या पथकाने केली.आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत.वासना, अनैतिक संबंध आणि क्षणिक सुखासाठी एका निष्पाप जीवाचा घेतलेला बळी म्हणजे समाजात निर्माण होत असलेल्या एका भयावह आणि संवेदनाहीन मानसिकतेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

14 hrs ago
user_के.के. रिपोर्टर
के.के. रिपोर्टर
Spa रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
14 hrs ago
c92b3f32-c311-411e-80da-73ba7c9d57b3

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे.  जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे.  हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    1
    हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. 
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. 
हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।
    1
    बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग
बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में  बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए।
अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है।
यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।
    user_गुफरान शेख
    गुफरान शेख
    Local News Reporter बार्शीटाकळी, अकोला, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन ​ खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ​प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. ​ कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा.​"आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.
    1
    मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन

​ खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ​प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. ​ कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा.​"आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती प्रशासनावर नाराज
    1
    लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती प्रशासनावर नाराज
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद मध्ये पावसाचा कहर अनेक शेती पिके व महामार्ग पाण्याखाली पुरस्थीती कायम
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद मध्ये पावसाचा कहर अनेक शेती पिके व महामार्ग पाण्याखाली पुरस्थीती कायम
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.