logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी सर्वंकष उपाययोजना करणार : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक संपन्न नांदेड, दि. 16 एप्रिल : नांदेड हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनले असून राज्यभरातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वंकष उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक पार पडली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. आश्विनी जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तसेच कोचिंग क्लासेसचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी क्लासेस परिसरात ‘दामिनी पथक’ व इतर पथकांमार्फत पोलीस गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देशही पोलीस विभागाला देण्यात आले. मेडिकल स्टोअर्समध्ये अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री होऊ नये, तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री टाळावी, याबाबत दुकानदारांनी दक्षता घ्यावी. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कठोर देखरेख ठेवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिक्षण विभागाने विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवावेत, अशा सूचना देण्यात आल्या. बैठकीदरम्यान कोचिंग क्लासेसच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या समस्याही ऐकून घेण्यात आल्या. दरम्यान, दि. 20 ते 24 एप्रिल 2026 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते 12 या वेळेत शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडिअम येथे पालक व विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना सुरक्षित, निरोगी व सकारात्मक वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी नमूद केले.

3 hrs ago
user_राजुभाऊ गायकवाड
राजुभाऊ गायकवाड
मी 2021 पासून पत्रकार आहे हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
3 hrs ago
126f5799-d427-4d1d-99e2-0553b0252b1b

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • घरकुल योजनेत गैरप्रकाराचा आरोप; आंदोलनाचा इशारा हिमायतनगर तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप समोर आला आहे. पात्र लाभार्थ्यांना देयके देण्यास टाळाटाळ करून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुल पूर्ण केले, त्यांना देयके न देता अर्धवट काम करणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “टेबलाखालून व्यवहार करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे,” असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ सुधारणा करून पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने देयके द्यावीत, तसेच अभियंता स्तरावर होत असलेली लूट थांबवावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वडगावकर यांनी दिला आहे. तशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घरकुल योजनेत मोठी अनियमितता असल्याची जोरदार चर्चा होते आहे. #Himayatnagar #Nanded #HousingScheme #Corruption #LocalNews MaharashtraNews BreakingNews PublicIssue
    1
    घरकुल योजनेत गैरप्रकाराचा आरोप; आंदोलनाचा इशारा
हिमायतनगर तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप समोर आला आहे. पात्र लाभार्थ्यांना देयके देण्यास टाळाटाळ करून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली.
ज्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुल पूर्ण केले, त्यांना देयके न देता अर्धवट काम करणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “टेबलाखालून व्यवहार करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे,” असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ सुधारणा करून पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने देयके द्यावीत, तसेच अभियंता स्तरावर होत असलेली लूट थांबवावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वडगावकर यांनी दिला आहे. तशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घरकुल योजनेत मोठी अनियमितता असल्याची जोरदार चर्चा होते आहे.
#Himayatnagar #Nanded #HousingScheme #Corruption #LocalNews MaharashtraNews BreakingNews PublicIssue
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Shaikh irfan Shaikh isa
    1
    Post by Shaikh irfan Shaikh isa
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • 🚩 धार्मिक उत्साहाची पर्वणी – सर्वांचे आग्रहाचे निमंत्रण! 🚩 हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी दक्षिणामुखी हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रा निघणार आहे. या पवित्र धार्मिक कार्यक्रमात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे, असे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि उत्सवाची शोभा वाढवा! सर्व भाविकांना सहभागी होण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण 🙏 #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona ReligiousEvent Bhakti Maharashtra Trending
    1
    🚩 धार्मिक उत्साहाची पर्वणी – सर्वांचे आग्रहाचे निमंत्रण! 🚩
हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी दक्षिणामुखी हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रा निघणार आहे.
या पवित्र धार्मिक कार्यक्रमात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे, असे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि उत्सवाची शोभा वाढवा! सर्व भाविकांना सहभागी होण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण 🙏
#JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona ReligiousEvent Bhakti Maharashtra Trending
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    5 min ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    30 min ago
  • Post by सारथी महाराष्ट्र न्यूज
    1
    Post by सारथी महाराष्ट्र न्यूज
    user_सारथी महाराष्ट्र न्यूज
    सारथी महाराष्ट्र न्यूज
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यांच्या औचित्याने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड शहर शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नवीन कवठा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप
    5
    राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यांच्या औचित्याने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड शहर शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नवीन कवठा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • 🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩 भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या! हिमायतनगर-वाढोणा येथे श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन!मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे करण्यात आलंय...सर्व भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा. #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending
    1
    🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩
भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या!
हिमायतनगर-वाढोणा येथे श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त 
दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन!मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे करण्यात आलंय...सर्व भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा. 
#JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.