Shuru
Apke Nagar Ki App…
महसूलमंत्री चद्रशेखर बावनकुळे याच 52 दरवाजे उघडणार पहिला दरवाजा उघडा आज दुसरा उघडला असे 52 दरवाजे उघडणार. मंठा तहसीलदार सुमन मोरे लाच घेताना रंगेहाथ पकडलया अटक निलंबित पुन्हा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुर्व पदावर कसं घेतलं. स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट केला आहे रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी बोल बिंदास बोल मध्ये. व्हिडिओ सगळीकडे शेअर करा जगाचा पोशिंदा शेतकरी जगला पाहिजे.
Shaikh irfan Shaikh isa
महसूलमंत्री चद्रशेखर बावनकुळे याच 52 दरवाजे उघडणार पहिला दरवाजा उघडा आज दुसरा उघडला असे 52 दरवाजे उघडणार. मंठा तहसीलदार सुमन मोरे लाच घेताना रंगेहाथ पकडलया अटक निलंबित पुन्हा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुर्व पदावर कसं घेतलं. स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट केला आहे रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी बोल बिंदास बोल मध्ये. व्हिडिओ सगळीकडे शेअर करा जगाचा पोशिंदा शेतकरी जगला पाहिजे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- घरकुल योजनेत गैरप्रकाराचा आरोप; आंदोलनाचा इशारा हिमायतनगर तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप समोर आला आहे. पात्र लाभार्थ्यांना देयके देण्यास टाळाटाळ करून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुल पूर्ण केले, त्यांना देयके न देता अर्धवट काम करणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “टेबलाखालून व्यवहार करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे,” असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ सुधारणा करून पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने देयके द्यावीत, तसेच अभियंता स्तरावर होत असलेली लूट थांबवावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वडगावकर यांनी दिला आहे. तशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घरकुल योजनेत मोठी अनियमितता असल्याची जोरदार चर्चा होते आहे. #Himayatnagar #Nanded #HousingScheme #Corruption #LocalNews MaharashtraNews BreakingNews PublicIssue1
- हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. २०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच? या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे. अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. चौकशी पत्रात अनियमितता अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी न्यायापासून वंचित निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत. भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच "महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- Post by Today One Live1
- Post by सारथी महाराष्ट्र न्यूज1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- 🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩 भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या! हिमायतनगर-वाढोणा येथे श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन!मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे करण्यात आलंय...सर्व भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा. #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending1