logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मिनी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न परभणी(प्रतिनिधी):-जिल्हा तलवारबाजी क्रीडा संघटना व वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ७ वी चाइल्ड व १८ वी मिनी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ही स्पर्धा २१, २२ व २३ ऑगस्ट रोजी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली. बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रा. प्रकाश काटोळे हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदाक डॉ. राहुल पाटील, अध्यक्ष परभणी जिल्हा बॉक्सिंग संघटना, रवी पतंगे, प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे, प्रा. डॉ. अर्जुन मोरे, प्राचार्य, वसुंधरा महाविद्यालय तसेच शेषनारायण लोढे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील खेळाडूंचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अशा प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन होणे अत्यंत आवश्यक आहे. अशा स्पर्धांमधून ग्रामीण व जिल्हास्तरावरील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळत असून, भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्यास मदत होईल. प्रास्ताविकात प्रा. डॉ. पांडुरंग रणमाळ यांनी, तीन दिवस चाललेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत ६०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला. सहभागी खेळाडूंच्या निवास, भोजन, पदके व ट्रॉफी आदींची व्यवस्था संघटनेमार्फत करण्यात आली होती. ही स्पर्धा प्रामुख्याने १० व १२ वर्षांखालील वयोगटातील खेळाडूंसाठी असल्याने लहान वयातच खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेचा अनुभव मिळत आहे. या खेळाडूंमधून भविष्यात देशाचे नाव उज्ज्वल करणारे उत्कृष्ट तलवारबाज निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध गटांतील विजेत्या व गुणवंत खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक, ट्रॉफी व बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विजेत्या खेळाडूंचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सुशील देशमुख यांनी केले, तर गोविंद शर्मा यांनी आभार प्रदर्शन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी अजय देशमुख, अनिल देशमुख, अनिल राऊळे, विनीत रणमाळ, सुशील जोरगेकर, संतोष तुरे, संजय भुमकर, पिराजी कुसळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

12 hrs ago
user_जागर महाराष्ट्राचा न्यूज
जागर महाराष्ट्राचा न्यूज
मानवत, परभणी, महाराष्ट्र•
12 hrs ago
3f94bfd1-ded7-4d88-aad4-4ccea016b37b

मिनी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न परभणी(प्रतिनिधी):-जिल्हा तलवारबाजी क्रीडा संघटना व वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ७ वी चाइल्ड व १८ वी मिनी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ही स्पर्धा २१, २२ व २३ ऑगस्ट रोजी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली. बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रा. प्रकाश काटोळे हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदाक डॉ. राहुल पाटील, अध्यक्ष परभणी जिल्हा बॉक्सिंग संघटना, रवी पतंगे, प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे, प्रा. डॉ. अर्जुन मोरे, प्राचार्य, वसुंधरा महाविद्यालय तसेच शेषनारायण लोढे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील खेळाडूंचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अशा प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन होणे अत्यंत आवश्यक आहे. अशा स्पर्धांमधून ग्रामीण व जिल्हास्तरावरील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळत असून, भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्यास मदत होईल. प्रास्ताविकात प्रा. डॉ. पांडुरंग रणमाळ यांनी, तीन दिवस चाललेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत ६०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला. सहभागी खेळाडूंच्या निवास, भोजन, पदके व ट्रॉफी आदींची व्यवस्था संघटनेमार्फत करण्यात आली होती. ही स्पर्धा प्रामुख्याने १० व १२ वर्षांखालील वयोगटातील खेळाडूंसाठी असल्याने लहान वयातच खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेचा अनुभव मिळत आहे. या खेळाडूंमधून भविष्यात देशाचे नाव उज्ज्वल करणारे उत्कृष्ट तलवारबाज निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध गटांतील विजेत्या व गुणवंत खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक, ट्रॉफी व बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विजेत्या खेळाडूंचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सुशील देशमुख यांनी केले, तर गोविंद शर्मा यांनी आभार प्रदर्शन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी अजय देशमुख, अनिल देशमुख, अनिल राऊळे, विनीत रणमाळ, सुशील जोरगेकर, संतोष तुरे, संजय भुमकर, पिराजी कुसळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

More news from Maharashtra and nearby areas
  • माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार
    1
    माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख 
हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट
शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार
माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख 
हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट
शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    16 min ago
  • साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय! १० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा
    1
    साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय!

१० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा
    user_मराठवाडा संवाद न्युज
    मराठवाडा संवाद न्युज
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • कै.सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन संपन्न वडवणी प्रतिनिधी : वडवणी येथील प्रतिष्ठित कुरकुटे परिवारातील कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त चौंडेश्वरी मंगल कार्यालय, वडवणी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवकीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या “शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी । विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥” या अभंगावर निरूपण करत उपस्थितांना भक्ती, संतविचार आणि जीवनाचे मर्म समजावून सांगितले. आपल्या किर्तनातून महाराजांनी संत तुकाराम महाराजांची विठ्ठल चरणी असलेली अखेरची विनवणी अत्यंत भावपूर्ण पद्धतीने मांडली. “हे देवा, माझा तुम्हाला कधीही विसर पडू देऊ नका. मी तुमच्या चरणी आहे, तुमची सेवा करणे एवढेच मला ठाऊक आहे,” असा या अभंगाचा भावार्थ त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या रसाळ वाणीतून संतविचार ऐकताना उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. गंगापूजनानिमित्त कुरकुटे परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी गोड जेवणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या स्मृतीस दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “गंध असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा; गंध संपला तरी, गंध दरवळत राहावा...” या भावनेतून कै. सौ. शांताबाई कुरकुटे यांच्या प्रेमळ आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला. कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या पश्चात हनुमंत कुरकुटे, दत्तात्रय कुरकुटे, डिगांबर कुरकुटे अशी तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुरकुटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील. कार्यक्रमास कुरकुटे परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    कै.सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन संपन्न
वडवणी प्रतिनिधी : वडवणी येथील प्रतिष्ठित कुरकुटे परिवारातील कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त चौंडेश्वरी मंगल कार्यालय, वडवणी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवकीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या “शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी । विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥” या अभंगावर निरूपण करत उपस्थितांना भक्ती, संतविचार आणि जीवनाचे मर्म समजावून सांगितले.
आपल्या किर्तनातून महाराजांनी संत तुकाराम महाराजांची विठ्ठल चरणी असलेली अखेरची विनवणी अत्यंत भावपूर्ण पद्धतीने मांडली. “हे देवा, माझा तुम्हाला कधीही विसर पडू देऊ नका. मी तुमच्या चरणी आहे, तुमची सेवा करणे एवढेच मला ठाऊक आहे,” असा या अभंगाचा भावार्थ त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या रसाळ वाणीतून संतविचार ऐकताना उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
गंगापूजनानिमित्त कुरकुटे परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी गोड जेवणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या स्मृतीस दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
“गंध असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा;
गंध संपला तरी, गंध दरवळत राहावा...”
या भावनेतून कै. सौ. शांताबाई कुरकुटे यांच्या प्रेमळ आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला.
कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या पश्चात हनुमंत कुरकुटे, दत्तात्रय कुरकुटे, डिगांबर कुरकुटे अशी तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुरकुटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील.
कार्यक्रमास कुरकुटे परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    9 hrs ago
  • 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट
    1
    🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!”
 शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू,
📍 वसमत, जि. हिंगोली
शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली—
🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!”
असा स्पष्ट इशारा!
✊ जमीन आमची — निर्णय आमचा!
🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द!
#शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट
    user_Ramprasad Magar news reporter
    Ramprasad Magar news reporter
    Local News Reporter बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते
    1
    सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न 
अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    14 hrs ago
  • *‘सड़क के गड्ढे नहीं, सिस्टम का आलस भर रहे हैं’—युवा समाजसेवी प्रभाष सिंह पटेल का वायरल कारनामा!* शंकरगढ़(प्रयागराज) प्रयागराज के शंकरगढ़ में जब जर्जर सड़कों से परेशान जनता और बेपरवाह तंत्र के बीच उम्मीद की कोई किरण नहीं दिख रही थी, तब एक युवा आगे आया और उसने दिखा दिया कि जनसेवा भाषणों से नहीं, कर्मों से होती है। युवा समाजसेवी प्रभाष सिंह पटेल ने किसी सरकारी बजट या प्रशासनिक मंजूरी का इंतजार किए बिना, अपनी जेब से पैसे खर्च कर सड़क के खतरनाक गड्ढों को भरवाने की एक अनूठी और प्रेरणादायक पहल शुरू की है। सोशल मीडिया पर प्रभाष सिंह पटेल के इस कदम की चौतरफा तारीफ हो रही है। लोग उनकी तस्वीरों और वीडियो को शेयर करते हुए लिख रहे हैं—"नेता सिर्फ वादे करते हैं, लेकिन प्रभाष जैसे युवा बदलाव लाते हैं।" *क्या बोले स्थानीय लोग?* इस सड़क से गुजरने वाले दैनिक यात्रियों और ग्रामीणों के चेहरे पर राहत साफ देखी जा सकती है। लोगों का कहना है कि आए दिन इन गड्ढों की वजह से हादसे हो रहे थे। प्रभाष पटेल ने अपने निजी खर्च से गिट्टी और मौरंग मंगवाकर न सिर्फ सड़क को चलने लायक बनाया, बल्कि कई अनमोल जिंदगियों को हादसों से भी बचा लिया। *प्रशासन की नींद कब खुलेगी?* युवा समाजसेवी की इस सराहनीय पहल ने जहां एक तरफ जनता का दिल जीत लिया है, वहीं दूसरी तरफ संबंधित प्रशासनिक अधिकारियों की कार्यशैली पर भी बड़े सवाल खड़े कर दिए हैं। *सामूहिक प्रयास ही असली समाधान* प्रभाष सिंह पटेल की यह पहल एक बड़ा संदेश देती है: अगर समाज का हर नागरिक और प्रशासनिक अमला एक साथ मिलकर कदम उठाए, तो आमजन को सुरक्षित, सुगम और दुर्घटनामुक्त आवागमन मिल सकता है। प्रभाष पटेल का यह जज्बा आज के युवाओं के लिए एक मिसाल बन चुका है। सलाम है ऐसे जनसेवकों को, जो समाज को गड्ढों से निकालकर प्रगति की राह पर ले जाने का दम रखते हैं!
    1
    *‘सड़क के गड्ढे नहीं, सिस्टम का आलस भर रहे हैं’—युवा समाजसेवी प्रभाष सिंह पटेल का वायरल कारनामा!*
शंकरगढ़(प्रयागराज) प्रयागराज के शंकरगढ़ में जब जर्जर सड़कों से परेशान जनता और बेपरवाह तंत्र के बीच उम्मीद की कोई किरण नहीं दिख रही थी, तब एक युवा आगे आया और उसने दिखा दिया कि जनसेवा भाषणों से नहीं, कर्मों से होती है। युवा समाजसेवी प्रभाष सिंह पटेल ने किसी सरकारी बजट या प्रशासनिक मंजूरी का इंतजार किए बिना, अपनी जेब से पैसे खर्च कर सड़क के खतरनाक गड्ढों को भरवाने की एक अनूठी और प्रेरणादायक पहल शुरू की है।
सोशल मीडिया पर प्रभाष सिंह पटेल के इस कदम की चौतरफा तारीफ हो रही है। लोग उनकी तस्वीरों और वीडियो को शेयर करते हुए लिख रहे हैं—"नेता सिर्फ वादे करते हैं, लेकिन प्रभाष जैसे युवा बदलाव लाते हैं।"
*क्या बोले स्थानीय लोग?*
इस सड़क से गुजरने वाले दैनिक यात्रियों और ग्रामीणों के चेहरे पर राहत साफ देखी जा सकती है। लोगों का कहना है कि आए दिन इन गड्ढों की वजह से हादसे हो रहे थे। प्रभाष पटेल ने अपने निजी खर्च से गिट्टी और मौरंग मंगवाकर न सिर्फ सड़क को चलने लायक बनाया, बल्कि कई अनमोल जिंदगियों को हादसों से भी बचा लिया।
*प्रशासन की नींद कब खुलेगी?*
युवा समाजसेवी की इस सराहनीय पहल ने जहां एक तरफ जनता का दिल जीत लिया है, वहीं दूसरी तरफ संबंधित प्रशासनिक अधिकारियों की कार्यशैली पर भी बड़े सवाल खड़े कर दिए हैं।
*सामूहिक प्रयास ही असली समाधान*
प्रभाष सिंह पटेल की यह पहल एक बड़ा संदेश देती है: अगर समाज का हर नागरिक और प्रशासनिक अमला एक साथ मिलकर कदम उठाए, तो आमजन को सुरक्षित, सुगम और दुर्घटनामुक्त आवागमन मिल सकता है। प्रभाष पटेल का यह जज्बा आज के युवाओं के लिए एक मिसाल बन चुका है। सलाम है ऐसे जनसेवकों को, जो समाज को गड्ढों से निकालकर प्रगति की राह पर ले जाने का दम रखते हैं!
    user_पवन कुमार पाल पत्रकार
    पवन कुमार पाल पत्रकार
    Georai, Beed•
    7 hrs ago
  • जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नबी पर बारादरी रोशन खां मोहल्ला में इज्तेमाई 30 शादियाँ संपन्न जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नबी पर बारादरी रोशन खां मोहल्ला में इज्तेमाई 30 शादियाँ संपन्न
    1
    जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नबी पर बारादरी रोशन खां मोहल्ला में इज्तेमाई 30 शादियाँ संपन्न
जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नबी पर बारादरी रोशन खां मोहल्ला में इज्तेमाई 30 शादियाँ संपन्न
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    1 hr ago
  • 🚨महापुराचा कहर ; बघा भयानक व्हिडिओ ; महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, १००० हून अधिक नागरिक बेपत्ता 🚨महापुराचा कहर ; बघा भयानक व्हिडिओ काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, १००० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १०० हून अधिक भारतीय नागरिक नॉट रिचेबल असल्याने भारतातील त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
    1
    🚨महापुराचा कहर ; बघा भयानक व्हिडिओ ;   महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, १००० हून अधिक नागरिक बेपत्ता
🚨महापुराचा कहर ; बघा भयानक व्हिडिओ 
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, १००० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १००  हून अधिक भारतीय नागरिक नॉट रिचेबल असल्याने भारतातील त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.