पाचोरा नगरपरिषदेकडून थकीत मालमत्ता करावर ‘अभय योजना’; ३१ मार्चपर्यंत १००% दंडमाफी पाचोरा नगरपरिषदेकडून थकीत मालमत्ता करावर ‘अभय योजना’; ३१ मार्चपर्यंत १००% दंडमाफी पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा नगरपरिषदेकडून थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी नागरिकांना दिलासा देणारी ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या दिनांक ३० मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार ही योजना राबविण्यात येत असून, थकीत करधारकांना दंड व शास्ती रकमेवर मोठी सूट मिळणार आहे. योजनेनुसार, ज्या मालमत्ता धारकांनी दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत आपला संपूर्ण थकीत मालमत्ता कर एकरकमी भरला, त्यांना १९ मे २०२५ पूर्वीच्या दंड व शास्ती रकमेवर १०० टक्के सूट दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना थकीत कर भरण्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नगरपरिषद प्रशासनाने सर्व नगरसेवक व प्रभाग प्रमुखांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या प्रभागातील मालमत्ता धारकांना या योजनेची माहिती देऊन कर भरण्यास प्रोत्साहित करावे. विशेष म्हणजे, ३१ मार्च २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालय सकाळी ८.०० वाजल्यापासून नागरिकांसाठी खुले राहणार असून, त्या दिवशी कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभय योजनेच्या प्रमुख अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत : थकीत मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा ३१ मार्च २०२६ पर्यंत करणे आवश्यक आहे. कराची एकरकमी रक्कम न भरल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. मूळ मालमत्ता करावर कोणतीही सवलत मिळणार नाही. मालमत्ता करासोबत पाणीपट्टी कर भरणे बंधनकारक आहे. विहित नमुन्यात नगरपरिषदेकडे अर्ज करणे आवश्यक आहे. नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या अभय योजनेचा लाभ घेऊन आपला थकीत कर वेळेत भरावा व दंडमाफीचा फायदा घ्यावा.

- जळगाव शहरात अवकाळी पाऊसला सुरवात लोकांची तारांबळ आणि धावपळ1
- सिडकोत रिक्षा चालकांचा आक्रमक पवित्रा; प्रवाशांना अडवणाऱ्यांवर कडक कारवाई छत्रपती संभाजीनगर शहरात रिक्षा चालकांनी गॅस टंचाईच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला असून, या पार्श्वभूमीवर सिडको चौक परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. संपादरम्यान काही रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेत प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, काही चालकांनी सिटी बस तसेच सुरू असलेल्या रिक्षा अडवून प्रवाशांना प्रवास करण्यास मज्जाव केला. काही ठिकाणी प्रवाशांना जबरदस्तीने वाहनांतून खाली उतरवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली. घटनेची माहिती मिळताच सिडको वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणत प्रवाशांना त्रास देणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या रिक्षा चालकांवर कडक कारवाई करण्यात आली. काहींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.1
- जळगाव: आज ३० मार्च रोजी जळगाव जिल्ह्यासह प्रामुख्याने धरणगाव आणि जळगाव तालुक्याला वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने झोडपून काढले. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेकडो शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असून, काढणीला आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पिकांचे मोठे नुकसान आज झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत गहू, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांसह केळी आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत, तर गारपिटीमुळे पिकांचे दाणे गळून पडले आहेत. हातातोडाशी आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पालकमंत्र्यांची तत्परता शेतकऱ्यांचे हे मोठे नुकसान लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (गुघे साहेब) आणि स्थानिक पातळीवरील सर्व तहसीलदारांना फोनवरून संपर्क साधून, नुकसानग्रस्त भागांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापासून पंचनाम्यांना सुरुवात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार, उद्यापासूनच बाधित क्षेत्रातील पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे. "एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशा पद्धतीने प्रशासनाने काम करावे," अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवाहन जळगाव व धरणगाव तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे, त्यांनी तातडीने आपल्या भागातील संबंधित तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून पंचनाम्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होऊन शासनाकडून मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.2
- Post by गणेश मौर्य1
- औरळा नगरीत श्री लक्ष्मी देवीचा जन्मोत्सव: शिस्त आणि भक्तीचा आदर्श संगम!2
- धुळे शहरासह परिसरात आज सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील वलवाडी शिवार, कुसुंबे तसेच साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद आहे. सायंकाळी सुमारे 4:30 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही भागात हलकी ते मध्यम गारपीट झाल्याने हवामानात अचानक बदल जाणवला. या अवकाळी पावसामुळे शेतपिकांना नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.1
- आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.1
- सावळदबारा येथे अवकाळी पावसाचा थैमान; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सावळदबारा (प्रतिनिधी): परिसरात अचानक झालेल्या अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतात उभ्या पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी पिके आडवी पडली आहेत. वाऱ्याचा वेगही जास्त असल्यामुळे झाडांची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पिके घेतली असताना ऐन कापणीच्या तोंडावर आलेल्या या पावसामुळे चिंता वाढली आहे. याशिवाय काही भागात वीजपुरवठा खंडित झाला असून रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.1