जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’व ‘यलो अलर्ट’ नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन अहिल्यानगर, दि. २-: भारतीय हवामान विभाग यांनी निर्गमित केलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात दि. २ व ३ एप्रिल २०२६ या कालावधीत तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळे, सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’जारी करण्यात आला आहे. तसेच दि. ४ एप्रिल २०२६ रोजी वीजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस व जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मेघगर्जना, वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली थांबू नये; सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळादरम्यान कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये; विद्युतवाहक वस्तूंना स्पर्श टाळावा.मोकळी मैदाने, टॉवर्स, विद्युत खांब, धातूची कुंपणे, ट्रान्सफॉर्मर यांपासून दूर राहावे.जाहिरात फलक (होर्डिंग्ज) जवळ थांबू नये; कोसळण्याचा धोका संभवतो.मोकळ्या जागेत अडकले असल्यास गुडघ्यावर बसून डोके खाली झाकून घ्यावे व जमिनीशी कमी संपर्क ठेवावा.धरण, नदी, कालवे येथे पर्यटनासाठी जाताना विशेष काळजी घ्यावी; पाण्यात उतरू नये व धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नये.शेतकऱ्यांनी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान टाळण्यासाठी शेतीमालाचे योग्य नियोजन करावे.बाजारात आणलेला किंवा साठवलेला शेतीमाल सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे टोल फ्री क्रमांक १०७७ तसेच ०२४१-२३२३८४४/ २३५६९४० वर संपर्क साधावा. वादळ, वीज, पाऊस व गारपीट यापासून स्वतःचे व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. #AhilyanagarWeather #OrangeAlert #YellowAlert #MaharashtraRain #HailstormWarning #WeatherUpdate #StaySafe #DisasterManagement #LightningSafety #FarmerAlert #PankajAshiya #RainAlert #MonsoonUpdate #MaharashtraSafety

- Post by कर्जत लाईव्ह1
- नेकनूर येथे कासार समाजाचा महाकुंभ..! कालिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी..1
- वैजापूर.महावितरण कार्यालयांचे दुर्लक्ष विज ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम महावितरण कंपनी शिवराई सबस्टेशन येथून दोन दिवसांपासून लाईट गुल एक ही महावितरण कंपनीचे अधिकारी फिरकले नाही गोळवाडी दहेगाव करंजगाव राहेगव्हाण विजग्रहकांना सेवा देण्यासाठी अ कार्यक्षम.2
- दुर्गम भागात बायफ टाकळी सेंटरचा हातभार: पशुपालकांना प्रशिक्षण व साहित्य वितरण1
- तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे काढणीला आलेला कांदा,मका, गहू, हरभरा,टरबूज,टोमॅटो इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर पुरणगाव येथील समाधान झांबरे यांच्या रोपवाटिकेचे देखील मोठे नुकसान झाले आहे अचानकपणे काल झालेल्या या बे मोसमी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी मोठा अडचणीत आला आहे आधीच कुठल्याही पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटांना तोंड देत होता त्यात आता या अवकाळी पावसाचं मोठं संकट त्याच्यासमोर उभे राहिले आहे काल झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठी नुकसान झाले आहे पुरणगाव येथील समाधान झांबरे यांच्या रोपवाटिकेचे जवळपास आठ ते दहा लाख रुपये नुकसान झाल्याचे समोर आले आहे घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणे केली तिथूनच शिक्षक आमदार किशोर दराडे यांना शेतकऱ्याची व्यथा सांगितली तात्काळ आमदार दराडे यांनी स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन पाहणी दौरा केला या दौऱ्यामध्ये तहसीलदार आबा महाजन,तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांच्यासह प्रशासनातील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते आमदार दराडे यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे असा अहवाल तात्काळ तयार करून वरिष्ठांना द्यावा अशा सूचना आमदार दराडे यांनी केल्या तालुक्यातील ज्या ज्या भागात मुस्कान झाले आहे त्या ठिकाणी आमदार किशोर दराडे व शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी स्वतः शेतीचा बांधावर जात पाहणी करत शेतकऱ्यांना धीर देत सांत्वन केले आहे प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून घेत शेतकऱ्यांच्या हाताला मदत कशी मिळेल यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील तालुक्याचा सविस्तर आढावा देणार असल्याचे श्री दराडे यांनी सांगितले. प्रतिक्रिया अवकाळी पावसामुळे तालुक्यात शेती क्षेत्राची मोठी नुकसान झाले आहे शेतकरी आधीच अडचणीत असल्यामुळे त्याला या अस्मानी संकटाला देखील तोंड द्यावे लागत आहे ही अतिशय कदाचित गोष्ट असून शेतकऱ्यांनी कुठे खचून जाऊ नये आम्ही तात्काळ पंचनामेचे आदेश केले आहे लवकरात लवकर आपल्याला मदत मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवरती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आम्ही न्याय मागून. आमदार किशोर दराडे प्रतिक्रिया. तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट होती त्यात या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची पूर्णपणे वाट लागली आहे आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या सोबत आहोत शेतकऱ्यांना पंचनामे किंवा प्रशासकीय यंत्रणेत कुठलीही अडचण आल्यास तात्काळ आमच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांची संपर्क साधावा असे आव्हान आम्ही या निमित्ताने करत आहोत. तालुक्यातील संपूर्ण पंचनामे होत नाही तो पर्यंत आम्ही प्रशासनाचा पाठपुरावा करत राहू. पांडुरंग शेळके पाटील शिवसेना तालुकाप्रमुख येवला.2
- आज शुक्रवार तीन मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर शहरातील बाळापूर शिवारामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे, सदरची माहिती अग्निशामक विभागाला मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन विहिरीतून मृतदेह शोधून चिखलठाणा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात येत आहे.1
- Exclusive Interview Bk Dr Donika Meditation | Gallinews Bharat1
- Post by कर्जत लाईव्ह1