logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुणे शहर पोलिसांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एका मोठ्या कारवाईत, रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या एका आरोपीसह त्याच्या साथीदाराला सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 'कोंबिंग ऑपरेशन' सुरू असताना, पोलीस अंमलदार अक्षय शिंदे, कादीर शेख आणि अमोल गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. दि. ३१/०५/२०२६ रोजी पहाटे, येरवडा पोलीस ठाण्यातील गु.र.क्र. १८५/२६, भा.न्या.सं. कलम ११८ (१), ११७ (२), ११५ (२), १८९ (२), १९०, १९१ (३), ३५२, ३५१ (२) सह आर्म ऍक्ट ४, २५ मधील पाहिजे असलेला मुख्य आरोपी साजिद ऊर्फ डिजे मोहम्मद शेख हा कामराजनगर येथील त्याच्या घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे, लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उमेश गित्ते आणि तपास पथकाचे सपोनि दत्तात्रय लिंगाडे, सपोनि रविकांत नंदनवार व पोलीस स्टाफने आरोपीच्या घराच्या परिसरात रेकी करून सापळा लावला. पोलीस खोलीत प्रवेश करताच, आतील दोन इसम पहिल्या मजल्याच्या खिडकीतून बाजूच्या खोलीवर उतरून पळून जाऊ लागले. त्यांनी आजूबाजूच्या घरांच्या पत्र्यावरून व स्लॅबवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी मोठ्या धाडसाने थरारक पाठलाग करून साजिद ऊर्फ डिजे मोहम्मद शेख (वय २० वर्षे, रा. अंचु चायनीज समोरील गल्ली, कामराजनगर रोड, कामराजनगर, येरवडा, पुणे) आणि शुभम राजेंद्र बोत (वय २६ वर्षे, रा. सर्वे नं.४७, ढवळे वस्ती, भारत फोर्ज रोड, गणपती मंदीर जवळ, घोरपडी गाव, पुणे) या दोघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर, पंचांसमक्ष मुख्य आरोपी साजिद ऊर्फ डिजे मोहम्मद शेख याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी हे अग्निशस्त्र जप्त केले असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. चिलुमुला रजनिकांत आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कामगिरी पार पडली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उमेश गित्ते, सपोनि दत्तात्रय लिंगाडे, सपोनि रविकांत नंदनवार यांच्यासह पोलीस अंमलदार अक्षय शिंदे, भिमराव कांबळे, अमोल वायाल, कादीर शेख, अमोल गायकवाड, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, अतुल जाधव, दत्तात्रय शिंदे, नितीन धायगुडे आणि सचिन कचेकर यांचा समावेश होता. पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलीस गुन्हेगारांवर कडक जरब बसवण्याची मोहीम तीव्र करत आहेत.

15 hrs ago
user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
15 hrs ago
51a7c00f-873a-49dd-b33a-4d8d0c39ae7e

पुणे शहर पोलिसांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एका मोठ्या कारवाईत, रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या एका आरोपीसह त्याच्या साथीदाराला सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 'कोंबिंग ऑपरेशन' सुरू असताना, पोलीस अंमलदार अक्षय शिंदे, कादीर शेख आणि अमोल गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. दि. ३१/०५/२०२६ रोजी पहाटे, येरवडा पोलीस ठाण्यातील गु.र.क्र. १८५/२६, भा.न्या.सं. कलम ११८ (१), ११७ (२), ११५ (२), १८९ (२), १९०, १९१ (३), ३५२, ३५१ (२) सह आर्म ऍक्ट ४, २५ मधील पाहिजे असलेला मुख्य आरोपी साजिद ऊर्फ डिजे मोहम्मद शेख हा कामराजनगर येथील त्याच्या घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे, लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उमेश गित्ते आणि तपास पथकाचे सपोनि दत्तात्रय लिंगाडे, सपोनि रविकांत नंदनवार व पोलीस स्टाफने आरोपीच्या घराच्या परिसरात रेकी करून सापळा लावला. पोलीस खोलीत प्रवेश करताच, आतील दोन इसम पहिल्या मजल्याच्या खिडकीतून बाजूच्या खोलीवर उतरून पळून जाऊ लागले. त्यांनी आजूबाजूच्या घरांच्या पत्र्यावरून व स्लॅबवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी मोठ्या धाडसाने थरारक पाठलाग करून साजिद ऊर्फ डिजे मोहम्मद शेख (वय २० वर्षे, रा. अंचु चायनीज समोरील गल्ली, कामराजनगर रोड, कामराजनगर, येरवडा, पुणे) आणि शुभम राजेंद्र बोत (वय २६ वर्षे, रा. सर्वे नं.४७, ढवळे वस्ती, भारत फोर्ज रोड, गणपती मंदीर जवळ, घोरपडी गाव, पुणे) या दोघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर, पंचांसमक्ष मुख्य आरोपी साजिद ऊर्फ डिजे मोहम्मद शेख याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी हे अग्निशस्त्र जप्त केले असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. चिलुमुला रजनिकांत आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कामगिरी पार पडली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उमेश गित्ते, सपोनि दत्तात्रय लिंगाडे, सपोनि रविकांत नंदनवार यांच्यासह पोलीस अंमलदार अक्षय शिंदे, भिमराव कांबळे, अमोल वायाल, कादीर शेख, अमोल गायकवाड, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, अतुल जाधव, दत्तात्रय शिंदे, नितीन धायगुडे आणि सचिन कचेकर यांचा समावेश होता. पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलीस गुन्हेगारांवर कडक जरब बसवण्याची मोहीम तीव्र करत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पिंपरी चिंचवडमधील म्हाळुंगे सावरदरी येथील 'टाईने रिबेल' या नव्याने स्थापन होत असलेल्या बीअर कंपनीतून ३६ लाख रुपये किमतीच्या १० बीअर स्टोअरेज टँकची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिसांनी यशस्वीरित्या छडा लावला असून, या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, कंपनीच्या एका विश्वासू माजी कामगारानेच या चोरीचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. फिर्यादी विवेक खैरे यांना सुमारे ४० दिवसांनंतर या चोरीची माहिती मिळाल्याने पोलिसांना तपासासाठी कोणताही थेट दुवा उपलब्ध नव्हता. मात्र, पोलीस पथकाने परिसरातील जवळपास ३० ते ३५ कंपन्यांचे ६०० GB पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे संशयित क्रेन आणि ट्रकची ओळख पटवण्यात आली. तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी कंपनीचा माजी कामगार प्रसाद विनोद राजळे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात मुख्य सूत्रधार प्रसाद राजळे याच्यासह चोरीला मदत करणारे आणि मुद्देमाल खरेदी करणारे चंदन अर्जुन सिंग, अली अहमद चौधरी, फिरोज असगर अली खान, किसनकुमार सुभाषचंद्र गुप्ता आणि नियाज मोहम्मद इसराईल यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून कुदळवाडी, चिखली आणि मुंब्रा येथून चोरीला गेलेल्या ३६ लाख रुपये किमतीच्या सर्व १० स्टील टाक्या यशस्वीरित्या जप्त केल्या आहेत.
    1
    पिंपरी चिंचवडमधील म्हाळुंगे सावरदरी येथील 'टाईने रिबेल' या नव्याने स्थापन होत असलेल्या बीअर कंपनीतून ३६ लाख रुपये किमतीच्या १० बीअर स्टोअरेज टँकची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिसांनी यशस्वीरित्या छडा लावला असून, या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, कंपनीच्या एका विश्वासू माजी कामगारानेच या चोरीचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.

फिर्यादी विवेक खैरे यांना सुमारे ४० दिवसांनंतर या चोरीची माहिती मिळाल्याने पोलिसांना तपासासाठी कोणताही थेट दुवा उपलब्ध नव्हता. मात्र, पोलीस पथकाने परिसरातील जवळपास ३० ते ३५ कंपन्यांचे ६०० GB पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे संशयित क्रेन आणि ट्रकची ओळख पटवण्यात आली. तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी कंपनीचा माजी कामगार प्रसाद विनोद राजळे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात मुख्य सूत्रधार प्रसाद राजळे याच्यासह चोरीला मदत करणारे आणि मुद्देमाल खरेदी करणारे चंदन अर्जुन सिंग, अली अहमद चौधरी, फिरोज असगर अली खान, किसनकुमार सुभाषचंद्र गुप्ता आणि नियाज मोहम्मद इसराईल यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून कुदळवाडी, चिखली आणि मुंब्रा येथून चोरीला गेलेल्या ३६ लाख रुपये किमतीच्या सर्व १० स्टील टाक्या यशस्वीरित्या जप्त केल्या आहेत.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ८९ टक्के दिव्यांग असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला घराघरांत जाऊन जनगणनेचे काम करण्याचे आदेश देण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आणि सामाजिक संघटनांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणी सामाजिक संघटनांनी प्रशासनाला जाब विचारला असून त्यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
    1
    ८९ टक्के दिव्यांग असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला घराघरांत जाऊन जनगणनेचे काम करण्याचे आदेश देण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आणि सामाजिक संघटनांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणी सामाजिक संघटनांनी प्रशासनाला जाब विचारला असून त्यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पुणे विधान परिषद निवडणुकीत होणारी लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी नसेल. या निवडणुकीत मुख्य सामना महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच पाहायला मिळेल.
    1
    पुणे विधान परिषद निवडणुकीत होणारी लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी नसेल. या निवडणुकीत मुख्य सामना महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच पाहायला मिळेल.
    user_लोकमान्य टाइम्स
    लोकमान्य टाइम्स
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • केशव सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. या वीज समस्येमुळे शेतकरी सध्या त्रस्त आहेत.
    1
    केशव सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. या वीज समस्येमुळे शेतकरी सध्या त्रस्त आहेत.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • पिंपरी-चिंचवड येथील भोसरी परिसरातून तृतीयपंथी समाजसेविका सोनी बाबू वाघमारे यांनी काही व्यक्तींविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी खंडणीची मागणी, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, बदनामी आणि मानसिक छळ अशा गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींकडून वाघमारे यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करण्यात येत असून, ती पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या जात आहेत. याशिवाय, तक्रारदार, त्यांच्या कुटुंबीयांना आणि शिष्यांना त्रास देणे, त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण करणे आणि त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाघमारे यांनी काही व्यक्तींची नावे नमूद करत त्यांच्याकडून संघटित पद्धतीने छळ केला जात असल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे सांगत, सोनी बाबू वाघमारे यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांची पोलीस प्रशासनाकडून पडताळणी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच यातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.
    1
    पिंपरी-चिंचवड येथील भोसरी परिसरातून तृतीयपंथी समाजसेविका सोनी बाबू वाघमारे यांनी काही व्यक्तींविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी खंडणीची मागणी, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, बदनामी आणि मानसिक छळ अशा गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींकडून वाघमारे यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करण्यात येत असून, ती पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या जात आहेत. याशिवाय, तक्रारदार, त्यांच्या कुटुंबीयांना आणि शिष्यांना त्रास देणे, त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण करणे आणि त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाघमारे यांनी काही व्यक्तींची नावे नमूद करत त्यांच्याकडून संघटित पद्धतीने छळ केला जात असल्याचा दावा केला आहे.

या प्रकारामुळे स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे सांगत, सोनी बाबू वाघमारे यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांची पोलीस प्रशासनाकडून पडताळणी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच यातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.
    user_वरद महाराष्ट्र वार्ता
    वरद महाराष्ट्र वार्ता
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील सारोळा परिसरात एका भीषण अपघातात दोन महाविद्यालयीन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. कॉलेजमध्ये प्रवेशाची स्वप्ने उराशी बाळगून घराबाहेर पडलेले हे तरुण घरी परतलेच नाहीत. अवघ्या तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या नव्या दुचाकीवरून कॉलेजचे ॲडमिशन करून परत येत असताना, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या दोन मित्रांना आपला जीव गमवावा लागला. सारोळा येथील या भीषण अपघातामुळे नायगाव आणि शिरवळ परिसरात शोककळा पसरली आहे.
    1
    पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील सारोळा परिसरात एका भीषण अपघातात दोन महाविद्यालयीन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. कॉलेजमध्ये प्रवेशाची स्वप्ने उराशी बाळगून घराबाहेर पडलेले हे तरुण घरी परतलेच नाहीत. अवघ्या तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या नव्या दुचाकीवरून कॉलेजचे ॲडमिशन करून परत येत असताना, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या दोन मित्रांना आपला जीव गमवावा लागला.

सारोळा येथील या भीषण अपघातामुळे नायगाव आणि शिरवळ परिसरात शोककळा पसरली आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील कर्डे घाट परिसरात सोमवारी सायंकाळी भररस्त्यात झालेल्या थरारक गोळीबार आणि हल्ल्यात शिरूर येथील विशाल काळे (वय ३०) याचा मृत्यू झाला असून, केदार झाडगे जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिरूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदवाडी गावच्या हद्दीत न्हावरा फाटा-न्हावरा मार्गावरील राजस्थान ढाब्यासमोर सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. विशाल काळे, उमेश अनिल जगदाळे (वय २६) आणि केदार झाडगे हे तिघे जण टोयोटा टायझर (एमएच १२ एक्सक्यू ५१०४) या कारमधून न्हावऱ्याकडून शिरूरकडे जात होते. त्यावेळी न्हावरा फाटा बाजूकडून आलेल्या किया सोनेट (एमएच १४ एलए ११२८) या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर सोनेटमधून उतरलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी टोयोटा कारच्या पुढील काचेवर चार राउंड गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यानंतर तिघेही कारमधून उतरून जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांपैकी रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर पुन्हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी विशाल काळे हा मृतावस्थेत आढळून आला, त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मोठ्या दगडाने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा दिसून आल्या. मृतदेहाजवळ दोन रिकामी काडतुसे आणि काही मोठे दगड आढळले आहेत. केदार झाडगे याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शिरूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश जगदाळे हा घटनेच्या वेळी घटनास्थळावरून पळून गेला होता; मात्र तो नंतर पोलिसांसमोर हजर झाला. घटनेनंतर आरोपी किया सोनेट कार आणि मोटारसायकलवरून पसार झाले. शिरूर पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली असून फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. आरोपी सनी यादव आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विशाल काळे तसेच संशयित आरोपी सनी यादव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या घटनेमागील नेमके कारण आणि पूर्ववैमनस्याचा तपास सुरू आहे. या निर्घृण हत्येमुळे शिरूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या हल्ल्यामागील सूत्रधार आणि अन्य सहभागी आरोपींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
    2
    शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील कर्डे घाट परिसरात सोमवारी सायंकाळी भररस्त्यात झालेल्या थरारक गोळीबार आणि हल्ल्यात शिरूर येथील विशाल काळे (वय ३०) याचा मृत्यू झाला असून, केदार झाडगे जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिरूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदवाडी गावच्या हद्दीत न्हावरा फाटा-न्हावरा मार्गावरील राजस्थान ढाब्यासमोर सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. विशाल काळे, उमेश अनिल जगदाळे (वय २६) आणि केदार झाडगे हे तिघे जण टोयोटा टायझर (एमएच १२ एक्सक्यू ५१०४) या कारमधून न्हावऱ्याकडून शिरूरकडे जात होते. त्यावेळी न्हावरा फाटा बाजूकडून आलेल्या किया सोनेट (एमएच १४ एलए ११२८) या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर सोनेटमधून उतरलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी टोयोटा कारच्या पुढील काचेवर चार राउंड गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यानंतर तिघेही कारमधून उतरून जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांपैकी रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर पुन्हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनास्थळी विशाल काळे हा मृतावस्थेत आढळून आला, त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मोठ्या दगडाने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा दिसून आल्या. मृतदेहाजवळ दोन रिकामी काडतुसे आणि काही मोठे दगड आढळले आहेत. केदार झाडगे याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शिरूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश जगदाळे हा घटनेच्या वेळी घटनास्थळावरून पळून गेला होता; मात्र तो नंतर पोलिसांसमोर हजर झाला. घटनेनंतर आरोपी किया सोनेट कार आणि मोटारसायकलवरून पसार झाले. शिरूर पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली असून फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. आरोपी सनी यादव आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विशाल काळे तसेच संशयित आरोपी सनी यादव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या घटनेमागील नेमके कारण आणि पूर्ववैमनस्याचा तपास सुरू आहे.

या निर्घृण हत्येमुळे शिरूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या हल्ल्यामागील सूत्रधार आणि अन्य सहभागी आरोपींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • पिंपरी-चिंचवड शहरात विषारी गावठी दारूमुळे १४ जणांचा मृत्यू होऊनही अवैध दारूचा सुळसुळाट थांबलेला नाही. शहराच्या विविध झोपडपट्ट्यांमध्ये तब्बल ५८ हातभट्ट्या आणि ६ ताडीचे अड्डे अजूनही राजरोसपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. निगडी, पिंपरी, भाटनगरसह अनेक भागांत खुलेआम दारू विक्री सुरू असल्याने कामगार आणि तरुण वर्ग व्यसनाच्या विळख्यात अडकत असून अनेक कुटुंबे यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. दरम्यान, नागरिकांच्या वारंवार तक्रारी करूनही पोलीस प्रशासनाकडून केवळ दिखाऊ कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अवैध दारूच्या या जाळ्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अवैध दारूचे हे जाळे मुळासकट नष्ट करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. येत्या काही दिवसांत प्रभावी कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे.
    2
    पिंपरी-चिंचवड शहरात विषारी गावठी दारूमुळे १४ जणांचा मृत्यू होऊनही अवैध दारूचा सुळसुळाट थांबलेला नाही. शहराच्या विविध झोपडपट्ट्यांमध्ये तब्बल ५८ हातभट्ट्या आणि ६ ताडीचे अड्डे अजूनही राजरोसपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. निगडी, पिंपरी, भाटनगरसह अनेक भागांत खुलेआम दारू विक्री सुरू असल्याने कामगार आणि तरुण वर्ग व्यसनाच्या विळख्यात अडकत असून अनेक कुटुंबे यामुळे उद्ध्वस्त होत आहेत.

दरम्यान, नागरिकांच्या वारंवार तक्रारी करूनही पोलीस प्रशासनाकडून केवळ दिखाऊ कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अवैध दारूच्या या जाळ्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अवैध दारूचे हे जाळे मुळासकट नष्ट करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

येत्या काही दिवसांत प्रभावी कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.