logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील कर्डे घाट परिसरात सोमवारी सायंकाळी भररस्त्यात झालेल्या थरारक गोळीबार आणि हल्ल्यात शिरूर येथील विशाल काळे (वय ३०) याचा मृत्यू झाला असून, केदार झाडगे जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिरूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदवाडी गावच्या हद्दीत न्हावरा फाटा-न्हावरा मार्गावरील राजस्थान ढाब्यासमोर सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. विशाल काळे, उमेश अनिल जगदाळे (वय २६) आणि केदार झाडगे हे तिघे जण टोयोटा टायझर (एमएच १२ एक्सक्यू ५१०४) या कारमधून न्हावऱ्याकडून शिरूरकडे जात होते. त्यावेळी न्हावरा फाटा बाजूकडून आलेल्या किया सोनेट (एमएच १४ एलए ११२८) या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर सोनेटमधून उतरलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी टोयोटा कारच्या पुढील काचेवर चार राउंड गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यानंतर तिघेही कारमधून उतरून जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांपैकी रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर पुन्हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी विशाल काळे हा मृतावस्थेत आढळून आला, त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मोठ्या दगडाने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा दिसून आल्या. मृतदेहाजवळ दोन रिकामी काडतुसे आणि काही मोठे दगड आढळले आहेत. केदार झाडगे याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शिरूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश जगदाळे हा घटनेच्या वेळी घटनास्थळावरून पळून गेला होता; मात्र तो नंतर पोलिसांसमोर हजर झाला. घटनेनंतर आरोपी किया सोनेट कार आणि मोटारसायकलवरून पसार झाले. शिरूर पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली असून फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. आरोपी सनी यादव आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विशाल काळे तसेच संशयित आरोपी सनी यादव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या घटनेमागील नेमके कारण आणि पूर्ववैमनस्याचा तपास सुरू आहे. या निर्घृण हत्येमुळे शिरूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या हल्ल्यामागील सूत्रधार आणि अन्य सहभागी आरोपींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

1 hr ago
user_Satish Dhumal
Satish Dhumal
Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
1 hr ago

शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील कर्डे घाट परिसरात सोमवारी सायंकाळी भररस्त्यात झालेल्या थरारक गोळीबार आणि हल्ल्यात शिरूर येथील विशाल काळे (वय ३०) याचा मृत्यू झाला असून, केदार झाडगे जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिरूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदवाडी गावच्या हद्दीत न्हावरा फाटा-न्हावरा मार्गावरील राजस्थान ढाब्यासमोर सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. विशाल काळे, उमेश अनिल जगदाळे (वय २६) आणि केदार झाडगे हे तिघे जण टोयोटा टायझर (एमएच १२ एक्सक्यू ५१०४) या कारमधून न्हावऱ्याकडून शिरूरकडे जात होते. त्यावेळी न्हावरा फाटा बाजूकडून आलेल्या किया सोनेट (एमएच १४ एलए ११२८) या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर सोनेटमधून उतरलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी टोयोटा कारच्या पुढील काचेवर चार राउंड गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यानंतर तिघेही कारमधून उतरून जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांपैकी रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर पुन्हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी

428c786d-dd7b-4d7c-b531-4fb6eb77ced4

दिली. घटनास्थळी विशाल काळे हा मृतावस्थेत आढळून आला, त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मोठ्या दगडाने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा दिसून आल्या. मृतदेहाजवळ दोन रिकामी काडतुसे आणि काही मोठे दगड आढळले आहेत. केदार झाडगे याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शिरूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश जगदाळे हा घटनेच्या वेळी घटनास्थळावरून पळून गेला होता; मात्र तो नंतर पोलिसांसमोर हजर झाला. घटनेनंतर आरोपी किया सोनेट कार आणि मोटारसायकलवरून पसार झाले. शिरूर पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली असून फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. आरोपी सनी यादव आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विशाल काळे तसेच संशयित आरोपी सनी यादव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या घटनेमागील नेमके कारण आणि पूर्ववैमनस्याचा तपास सुरू आहे. या निर्घृण हत्येमुळे शिरूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या हल्ल्यामागील सूत्रधार आणि अन्य सहभागी आरोपींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील कर्डे घाट परिसरात सोमवारी सायंकाळी भररस्त्यात झालेल्या थरारक गोळीबार आणि हल्ल्यात शिरूर येथील विशाल काळे (वय ३०) याचा मृत्यू झाला असून, केदार झाडगे जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिरूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदवाडी गावच्या हद्दीत न्हावरा फाटा-न्हावरा मार्गावरील राजस्थान ढाब्यासमोर सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. विशाल काळे, उमेश अनिल जगदाळे (वय २६) आणि केदार झाडगे हे तिघे जण टोयोटा टायझर (एमएच १२ एक्सक्यू ५१०४) या कारमधून न्हावऱ्याकडून शिरूरकडे जात होते. त्यावेळी न्हावरा फाटा बाजूकडून आलेल्या किया सोनेट (एमएच १४ एलए ११२८) या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर सोनेटमधून उतरलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी टोयोटा कारच्या पुढील काचेवर चार राउंड गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यानंतर तिघेही कारमधून उतरून जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांपैकी रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर पुन्हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी विशाल काळे हा मृतावस्थेत आढळून आला, त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मोठ्या दगडाने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा दिसून आल्या. मृतदेहाजवळ दोन रिकामी काडतुसे आणि काही मोठे दगड आढळले आहेत. केदार झाडगे याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शिरूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश जगदाळे हा घटनेच्या वेळी घटनास्थळावरून पळून गेला होता; मात्र तो नंतर पोलिसांसमोर हजर झाला. घटनेनंतर आरोपी किया सोनेट कार आणि मोटारसायकलवरून पसार झाले. शिरूर पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली असून फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. आरोपी सनी यादव आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विशाल काळे तसेच संशयित आरोपी सनी यादव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या घटनेमागील नेमके कारण आणि पूर्ववैमनस्याचा तपास सुरू आहे. या निर्घृण हत्येमुळे शिरूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या हल्ल्यामागील सूत्रधार आणि अन्य सहभागी आरोपींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
    2
    शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील कर्डे घाट परिसरात सोमवारी सायंकाळी भररस्त्यात झालेल्या थरारक गोळीबार आणि हल्ल्यात शिरूर येथील विशाल काळे (वय ३०) याचा मृत्यू झाला असून, केदार झाडगे जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिरूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदवाडी गावच्या हद्दीत न्हावरा फाटा-न्हावरा मार्गावरील राजस्थान ढाब्यासमोर सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. विशाल काळे, उमेश अनिल जगदाळे (वय २६) आणि केदार झाडगे हे तिघे जण टोयोटा टायझर (एमएच १२ एक्सक्यू ५१०४) या कारमधून न्हावऱ्याकडून शिरूरकडे जात होते. त्यावेळी न्हावरा फाटा बाजूकडून आलेल्या किया सोनेट (एमएच १४ एलए ११२८) या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर सोनेटमधून उतरलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी टोयोटा कारच्या पुढील काचेवर चार राउंड गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यानंतर तिघेही कारमधून उतरून जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांपैकी रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर पुन्हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनास्थळी विशाल काळे हा मृतावस्थेत आढळून आला, त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मोठ्या दगडाने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा दिसून आल्या. मृतदेहाजवळ दोन रिकामी काडतुसे आणि काही मोठे दगड आढळले आहेत. केदार झाडगे याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शिरूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश जगदाळे हा घटनेच्या वेळी घटनास्थळावरून पळून गेला होता; मात्र तो नंतर पोलिसांसमोर हजर झाला. घटनेनंतर आरोपी किया सोनेट कार आणि मोटारसायकलवरून पसार झाले. शिरूर पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली असून फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. आरोपी सनी यादव आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विशाल काळे तसेच संशयित आरोपी सनी यादव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या घटनेमागील नेमके कारण आणि पूर्ववैमनस्याचा तपास सुरू आहे.

या निर्घृण हत्येमुळे शिरूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या हल्ल्यामागील सूत्रधार आणि अन्य सहभागी आरोपींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अहमदनगरमध्ये महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता), स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १ जून २०२६ पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले मानधन तात्काळ मिळावे, ही त्यांची मुख्य मागणी आहे. जिल्हा परिषद अहमदनगर येथील कर्मचाऱ्यांनी या मागणीसाठी हे पाऊल उचलले आहे. आंदोलनस्थळी लावण्यात आलेल्या बॅनरवर "६ महिन्यांच्या प्रलंबित मानधनासाठी दिनांक ०१ जून २०२६ पासून बेमुदत काम बंद आंदोलन" असे स्पष्ट नमूद केले आहे. 'एकच घोषणा - हक्क आमच्या हक्काचा' आणि 'अन्याय करणाऱ्यांचा ... धिक्कार असो!' अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे. या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत. जोपर्यंत थकीत मानधन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील जल जीवन मिशन आणि स्वच्छतेच्या कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    1
    अहमदनगरमध्ये महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता), स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १ जून २०२६ पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले मानधन तात्काळ मिळावे, ही त्यांची मुख्य मागणी आहे. जिल्हा परिषद अहमदनगर येथील कर्मचाऱ्यांनी या मागणीसाठी हे पाऊल उचलले आहे. आंदोलनस्थळी लावण्यात आलेल्या बॅनरवर "६ महिन्यांच्या प्रलंबित मानधनासाठी दिनांक ०१ जून २०२६ पासून बेमुदत काम बंद आंदोलन" असे स्पष्ट नमूद केले आहे. 'एकच घोषणा - हक्क आमच्या हक्काचा' आणि 'अन्याय करणाऱ्यांचा ... धिक्कार असो!' अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे.

या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत. जोपर्यंत थकीत मानधन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील जल जीवन मिशन आणि स्वच्छतेच्या कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Photographer नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पुण्यातील कानिफनाथ हिल परिसरातून ‘फ्लॅश’ नावाचा एक पाळीव श्वान गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक आणि भावुक घटना समोर आली आहे. आपल्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग असलेला हा श्वान ३१ मार्चपासून अचानक गायब झाल्यामुळे त्याचे मालक आणि संपूर्ण कुटुंब अत्यंत चिंतेत आणि व्याकुळ झाले आहे. 'फ्लॅश' घरच्यांचा प्रचंड लाडका असून, मोकळ्या मैदानात फिरण्याची त्याला आवड आहे; मात्र तो दिसेनासा झाल्याने कुटुंब त्याच्या विरहात प्रत्येक दिवस काढत आहे. या श्वानाची ओळख ‘फ्लॅश’ (Flash) या नावाने असून, तो ‘इंडी’ (Indie Breed) जातीचा आहे. त्याचा रंग काळा आणि पांढरा असून, त्याच्या गळ्यात निळ्या रंगाचा पट्टा (Blue Collar) आहे. त्याला शेवटचे कानिफनाथ हिल, पुणे येथेच पाहिले गेले होते. ‘फ्लॅश’चा शोध घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. जो कोणी सुजाण नागरिक या श्वानाचा शोध घेईल किंवा त्याच्या ठावठिकाण्याबद्दल अचूक माहिती देईल, त्याला १०,००० रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. नागरिकांना नम्र आवाहन करण्यात आले आहे की, जर तुम्हाला ‘फ्लॅश’ कुठेही भटकताना किंवा कोणाकडे आढळून आला, तर कृपया त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण कोणीतरी त्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे. कोणतीही माहिती मिळाल्यास +91 84468 68336 किंवा +91 90394 14893 या क्रमांकांवर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘फ्लॅश’ला पुन्हा त्याच्या कुटुंबाशी मिळवून देण्यासाठी ही बातमी जास्तीत जास्त शेअर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
    1
    पुण्यातील कानिफनाथ हिल परिसरातून ‘फ्लॅश’ नावाचा एक पाळीव श्वान गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक आणि भावुक घटना समोर आली आहे. आपल्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग असलेला हा श्वान ३१ मार्चपासून अचानक गायब झाल्यामुळे त्याचे मालक आणि संपूर्ण कुटुंब अत्यंत चिंतेत आणि व्याकुळ झाले आहे. 'फ्लॅश' घरच्यांचा प्रचंड लाडका असून, मोकळ्या मैदानात फिरण्याची त्याला आवड आहे; मात्र तो दिसेनासा झाल्याने कुटुंब त्याच्या विरहात प्रत्येक दिवस काढत आहे.

या श्वानाची ओळख ‘फ्लॅश’ (Flash) या नावाने असून, तो ‘इंडी’ (Indie Breed) जातीचा आहे. त्याचा रंग काळा आणि पांढरा असून, त्याच्या गळ्यात निळ्या रंगाचा पट्टा (Blue Collar) आहे. त्याला शेवटचे कानिफनाथ हिल, पुणे येथेच पाहिले गेले होते.

‘फ्लॅश’चा शोध घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. जो कोणी सुजाण नागरिक या श्वानाचा शोध घेईल किंवा त्याच्या ठावठिकाण्याबद्दल अचूक माहिती देईल, त्याला १०,००० रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.

नागरिकांना नम्र आवाहन करण्यात आले आहे की, जर तुम्हाला ‘फ्लॅश’ कुठेही भटकताना किंवा कोणाकडे आढळून आला, तर कृपया त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण कोणीतरी त्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे. कोणतीही माहिती मिळाल्यास +91 84468 68336 किंवा +91 90394 14893 या क्रमांकांवर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘फ्लॅश’ला पुन्हा त्याच्या कुटुंबाशी मिळवून देण्यासाठी ही बातमी जास्तीत जास्त शेअर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    17 min ago
  • विलास लांडे यांनी आपले मत व्यक्त करत म्हटले आहे की, जर अजितदादा असते तर एका प्रामाणिक कार्यकर्त्याला निश्चितपणे उमेदवारी दिली गेली असती.
    1
    विलास लांडे यांनी आपले मत व्यक्त करत म्हटले आहे की, जर अजितदादा असते तर एका प्रामाणिक कार्यकर्त्याला निश्चितपणे उमेदवारी दिली गेली असती.
    user_लोकमान्य टाइम्स
    लोकमान्य टाइम्स
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • केशव सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. या वीज समस्येमुळे शेतकरी सध्या त्रस्त आहेत.
    1
    केशव सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. या वीज समस्येमुळे शेतकरी सध्या त्रस्त आहेत.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पिंपरी-चिंचवड येथील भोसरी परिसरातून तृतीयपंथी समाजसेविका सोनी बाबू वाघमारे यांनी काही व्यक्तींविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी खंडणीची मागणी, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, बदनामी आणि मानसिक छळ अशा गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींकडून वाघमारे यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करण्यात येत असून, ती पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या जात आहेत. याशिवाय, तक्रारदार, त्यांच्या कुटुंबीयांना आणि शिष्यांना त्रास देणे, त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण करणे आणि त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाघमारे यांनी काही व्यक्तींची नावे नमूद करत त्यांच्याकडून संघटित पद्धतीने छळ केला जात असल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे सांगत, सोनी बाबू वाघमारे यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांची पोलीस प्रशासनाकडून पडताळणी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच यातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.
    1
    पिंपरी-चिंचवड येथील भोसरी परिसरातून तृतीयपंथी समाजसेविका सोनी बाबू वाघमारे यांनी काही व्यक्तींविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी खंडणीची मागणी, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, बदनामी आणि मानसिक छळ अशा गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींकडून वाघमारे यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करण्यात येत असून, ती पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या जात आहेत. याशिवाय, तक्रारदार, त्यांच्या कुटुंबीयांना आणि शिष्यांना त्रास देणे, त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण करणे आणि त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाघमारे यांनी काही व्यक्तींची नावे नमूद करत त्यांच्याकडून संघटित पद्धतीने छळ केला जात असल्याचा दावा केला आहे.

या प्रकारामुळे स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे सांगत, सोनी बाबू वाघमारे यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांची पोलीस प्रशासनाकडून पडताळणी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच यातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.
    user_वरद महाराष्ट्र वार्ता
    वरद महाराष्ट्र वार्ता
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पिंपरी चिंचवडमध्ये पुणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तीव्र नाराजी उफाळून आली आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पक्षावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, विक्रम काकडे यांना ‘आर्थिक निकष पाहून’ उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी डावलल्यानंतर, लांडेंनी पक्ष नेतृत्वावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. त्यांनी खंत व्यक्त केली की, “आज अजित दादा असते तर प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाली असती.” विशेष म्हणजे, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी उमेदवारीचे ‘बर्थडे गिफ्ट’ मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरल्याने त्यांची नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे.
    1
    पिंपरी चिंचवडमध्ये पुणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तीव्र नाराजी उफाळून आली आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पक्षावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, विक्रम काकडे यांना ‘आर्थिक निकष पाहून’ उमेदवारी देण्यात आली आहे.

उमेदवारी डावलल्यानंतर, लांडेंनी पक्ष नेतृत्वावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. त्यांनी खंत व्यक्त केली की, “आज अजित दादा असते तर प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाली असती.” विशेष म्हणजे, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी उमेदवारीचे ‘बर्थडे गिफ्ट’ मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरल्याने त्यांची नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • शिरूर नगरपरिषदेने शहरातील सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेला गती दिली असून, गुरुवारी हलदी मोहल्ल्यातील दशक्रिया घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या वेळी नगरपरिषदेने अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरूपी अतिक्रमणविरोधी पथक स्थापन केल्याची घोषणा केली. मुख्यधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली, ज्यात शंभरहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेबाबत माहिती देताना मुख्यधिकारी पाटील यांनी सांगितले की, शहरातील अतिक्रमणांवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी आठ सदस्यीय विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख नगर अभियंता असतील, तर बांधकाम अभियंता सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत. दशक्रिया घाटाकडे जाणारा हा रस्ता १५ मीटर रुंदीचा असून, त्याच्या हद्दीतील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नियंत्रणाखाली महिला व पुरुष पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, नगर अभियंता समाधान मुंगसे, रचना सहाय्यक पंकज काकड, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे आणि कर निरीक्षक माधव गाजरे हे देखील या मोहिमेत सहभागी होते. यापूर्वीही नगरपरिषदेने पाबळ फाटा ते बी. जे. कॉर्नर, बी. जे. कॉर्नर ते तहसील कार्यालय मार्ग, सी. टी. बोरा कॉलेज रोड, रेव्हेन्यू कॉलनी परिसर तसेच सेंटर दवाखाना परिसरातील प्रमुख रस्त्यांवर स्वतंत्र पथकांमार्फत एकाच वेळी अतिक्रमणविरोधी कारवाई केली होती. ही मोहीम जेसीबी, ट्रॅक्टर, अग्निशमन वाहन आणि आवश्यक मनुष्यबळाच्या सहाय्याने राबविण्यात आली होती. शहराचे सुशोभीकरण, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त राखणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांनी या अशा मोहिमा पुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे सांगितले आणि नागरिकांनी पुन्हा अतिक्रमण न करता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही केले.
    4
    शिरूर नगरपरिषदेने शहरातील सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेला गती दिली असून, गुरुवारी हलदी मोहल्ल्यातील दशक्रिया घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या वेळी नगरपरिषदेने अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरूपी अतिक्रमणविरोधी पथक स्थापन केल्याची घोषणा केली. मुख्यधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली, ज्यात शंभरहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.

या मोहिमेबाबत माहिती देताना मुख्यधिकारी पाटील यांनी सांगितले की, शहरातील अतिक्रमणांवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी आठ सदस्यीय विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख नगर अभियंता असतील, तर बांधकाम अभियंता सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत. दशक्रिया घाटाकडे जाणारा हा रस्ता १५ मीटर रुंदीचा असून, त्याच्या हद्दीतील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नियंत्रणाखाली महिला व पुरुष पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, नगर अभियंता समाधान मुंगसे, रचना सहाय्यक पंकज काकड, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे आणि कर निरीक्षक माधव गाजरे हे देखील या मोहिमेत सहभागी होते.

यापूर्वीही नगरपरिषदेने पाबळ फाटा ते बी. जे. कॉर्नर, बी. जे. कॉर्नर ते तहसील कार्यालय मार्ग, सी. टी. बोरा कॉलेज रोड, रेव्हेन्यू कॉलनी परिसर तसेच सेंटर दवाखाना परिसरातील प्रमुख रस्त्यांवर स्वतंत्र पथकांमार्फत एकाच वेळी अतिक्रमणविरोधी कारवाई केली होती. ही मोहीम जेसीबी, ट्रॅक्टर, अग्निशमन वाहन आणि आवश्यक मनुष्यबळाच्या सहाय्याने राबविण्यात आली होती.

शहराचे सुशोभीकरण, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त राखणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांनी या अशा मोहिमा पुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे सांगितले आणि नागरिकांनी पुन्हा अतिक्रमण न करता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही केले.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.