शिरूर नगरपरिषदेने शहरातील सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेला गती दिली असून, गुरुवारी हलदी मोहल्ल्यातील दशक्रिया घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या वेळी नगरपरिषदेने अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरूपी अतिक्रमणविरोधी पथक स्थापन केल्याची घोषणा केली. मुख्यधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली, ज्यात शंभरहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेबाबत माहिती देताना मुख्यधिकारी पाटील यांनी सांगितले की, शहरातील अतिक्रमणांवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी आठ सदस्यीय विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख नगर अभियंता असतील, तर बांधकाम अभियंता सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत. दशक्रिया घाटाकडे जाणारा हा रस्ता १५ मीटर रुंदीचा असून, त्याच्या हद्दीतील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नियंत्रणाखाली महिला व पुरुष पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, नगर अभियंता समाधान मुंगसे, रचना सहाय्यक पंकज काकड, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे आणि कर निरीक्षक माधव गाजरे हे देखील या मोहिमेत सहभागी होते. यापूर्वीही नगरपरिषदेने पाबळ फाटा ते बी. जे. कॉर्नर, बी. जे. कॉर्नर ते तहसील कार्यालय मार्ग, सी. टी. बोरा कॉलेज रोड, रेव्हेन्यू कॉलनी परिसर तसेच सेंटर दवाखाना परिसरातील प्रमुख रस्त्यांवर स्वतंत्र पथकांमार्फत एकाच वेळी अतिक्रमणविरोधी कारवाई केली होती. ही मोहीम जेसीबी, ट्रॅक्टर, अग्निशमन वाहन आणि आवश्यक मनुष्यबळाच्या सहाय्याने राबविण्यात आली होती. शहराचे सुशोभीकरण, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त राखणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांनी या अशा मोहिमा पुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे सांगितले आणि नागरिकांनी पुन्हा अतिक्रमण न करता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही केले.
शिरूर नगरपरिषदेने शहरातील सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेला गती दिली असून, गुरुवारी हलदी मोहल्ल्यातील दशक्रिया घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या वेळी नगरपरिषदेने अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरूपी अतिक्रमणविरोधी पथक स्थापन केल्याची घोषणा केली. मुख्यधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली, ज्यात शंभरहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेबाबत माहिती देताना मुख्यधिकारी पाटील यांनी सांगितले की, शहरातील अतिक्रमणांवर
सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी आठ सदस्यीय विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख नगर अभियंता असतील, तर बांधकाम अभियंता सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत. दशक्रिया घाटाकडे जाणारा हा रस्ता १५ मीटर रुंदीचा असून, त्याच्या हद्दीतील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नियंत्रणाखाली महिला व पुरुष पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात
आला होता. प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, नगर अभियंता समाधान मुंगसे, रचना सहाय्यक पंकज काकड, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे आणि कर निरीक्षक माधव गाजरे हे देखील या मोहिमेत सहभागी होते. यापूर्वीही नगरपरिषदेने पाबळ फाटा ते बी. जे. कॉर्नर, बी. जे. कॉर्नर ते तहसील कार्यालय मार्ग, सी. टी. बोरा कॉलेज रोड, रेव्हेन्यू कॉलनी परिसर तसेच सेंटर दवाखाना परिसरातील प्रमुख रस्त्यांवर स्वतंत्र
पथकांमार्फत एकाच वेळी अतिक्रमणविरोधी कारवाई केली होती. ही मोहीम जेसीबी, ट्रॅक्टर, अग्निशमन वाहन आणि आवश्यक मनुष्यबळाच्या सहाय्याने राबविण्यात आली होती. शहराचे सुशोभीकरण, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त राखणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांनी या अशा मोहिमा पुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे सांगितले आणि नागरिकांनी पुन्हा अतिक्रमण न करता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही केले.
- अहमदनगरमध्ये महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता), स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १ जून २०२६ पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले मानधन तात्काळ मिळावे, ही त्यांची मुख्य मागणी आहे. जिल्हा परिषद अहमदनगर येथील कर्मचाऱ्यांनी या मागणीसाठी हे पाऊल उचलले आहे. आंदोलनस्थळी लावण्यात आलेल्या बॅनरवर "६ महिन्यांच्या प्रलंबित मानधनासाठी दिनांक ०१ जून २०२६ पासून बेमुदत काम बंद आंदोलन" असे स्पष्ट नमूद केले आहे. 'एकच घोषणा - हक्क आमच्या हक्काचा' आणि 'अन्याय करणाऱ्यांचा ... धिक्कार असो!' अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे. या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत. जोपर्यंत थकीत मानधन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील जल जीवन मिशन आणि स्वच्छतेच्या कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.1
- मंत्री नितेश राणे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांच्या गटामध्ये फूट पडण्याचा कोणताही प्रश्न नाही. त्यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले की, त्यांना त्यांचे ५५ सदस्य सांभाळतानाच घाम फुटेल, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.1
- पिंपरी चिंचवडमध्ये पुणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तीव्र नाराजी उफाळून आली आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पक्षावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, विक्रम काकडे यांना ‘आर्थिक निकष पाहून’ उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी डावलल्यानंतर, लांडेंनी पक्ष नेतृत्वावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. त्यांनी खंत व्यक्त केली की, “आज अजित दादा असते तर प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाली असती.” विशेष म्हणजे, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी उमेदवारीचे ‘बर्थडे गिफ्ट’ मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरल्याने त्यांची नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे.1
- पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या 'ट्रायबेका हायस्ट्रीट' मॉलबाहेर लावण्यात आलेले 'नो-पार्किंग'चे फलक केवळ नावापुरतेच उरले आहेत. वाहनचालकांकडून या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असून, बेबंद पार्किंगमुळे वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. या परिस्थितीमुळे सामान्य जनतेचा जीव टांगणीला लागला असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांकडून केली जाणारी कारवाई फक्त 'दाखवण्यापुरती' असून, त्याचा कोणताही ठोस परिणाम दिसत नसल्याचा आरोप होत आहे, जणू 'डोळे असून आंधळे' अशी ही परिस्थिती असल्याची टीका करण्यात येत आहे.1
- आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी चौंडी येथे जात असताना, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा कु. संध्या सोनवणे यांच्या वतीने या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात स्थानिक महिला कार्यकर्त्या आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. महिलांनी सुनेत्रावहिनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. उपस्थितांनी सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.1
- शिरूर नगरपरिषदेने शहरातील सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेला गती दिली असून, गुरुवारी हलदी मोहल्ल्यातील दशक्रिया घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या वेळी नगरपरिषदेने अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरूपी अतिक्रमणविरोधी पथक स्थापन केल्याची घोषणा केली. मुख्यधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली, ज्यात शंभरहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेबाबत माहिती देताना मुख्यधिकारी पाटील यांनी सांगितले की, शहरातील अतिक्रमणांवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी आठ सदस्यीय विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख नगर अभियंता असतील, तर बांधकाम अभियंता सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत. दशक्रिया घाटाकडे जाणारा हा रस्ता १५ मीटर रुंदीचा असून, त्याच्या हद्दीतील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नियंत्रणाखाली महिला व पुरुष पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, नगर अभियंता समाधान मुंगसे, रचना सहाय्यक पंकज काकड, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे आणि कर निरीक्षक माधव गाजरे हे देखील या मोहिमेत सहभागी होते. यापूर्वीही नगरपरिषदेने पाबळ फाटा ते बी. जे. कॉर्नर, बी. जे. कॉर्नर ते तहसील कार्यालय मार्ग, सी. टी. बोरा कॉलेज रोड, रेव्हेन्यू कॉलनी परिसर तसेच सेंटर दवाखाना परिसरातील प्रमुख रस्त्यांवर स्वतंत्र पथकांमार्फत एकाच वेळी अतिक्रमणविरोधी कारवाई केली होती. ही मोहीम जेसीबी, ट्रॅक्टर, अग्निशमन वाहन आणि आवश्यक मनुष्यबळाच्या सहाय्याने राबविण्यात आली होती. शहराचे सुशोभीकरण, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त राखणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांनी या अशा मोहिमा पुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे सांगितले आणि नागरिकांनी पुन्हा अतिक्रमण न करता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही केले.4