लातूर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा आरोपी जेरबंद, वाहनासह ८.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा आरोपी जेरबंद, वाहनासह ८.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026. लातूर शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ (गुटखा) विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी उल्लेखनीय व प्रभावी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH-09 CV-9124) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समोर सापळा रचून संशयित वाहन ताब्यात घेतले. चौकशीअंती चालकाने आपले नाव 1) नागनाथ हरीभाऊ मुंडे (वय ४५ वर्ष, रा. मजगे नगर, लातूर) असे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता गाडीतील सीट मागे व डिकीत पांढऱ्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यामध्ये विमल पान मसाला अंदाजे ₹1,24,800/-,V-1 तंबाखू , अंदाजे ₹31,200/-स्विफ्ट डिजायर कार अंदाजे ₹7,00,000/- असा एकूण ₹8,56,000/चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 223 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार अर्जुन रजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, आनंद हल्लाळे यांनी केली आहे.
लातूर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा आरोपी जेरबंद, वाहनासह ८.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा आरोपी जेरबंद, वाहनासह ८.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026. लातूर शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ (गुटखा) विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी उल्लेखनीय व प्रभावी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH-09 CV-9124) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली.
प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समोर सापळा रचून संशयित वाहन ताब्यात घेतले. चौकशीअंती चालकाने आपले नाव 1) नागनाथ हरीभाऊ मुंडे (वय ४५ वर्ष, रा. मजगे नगर, लातूर) असे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता गाडीतील सीट मागे व डिकीत पांढऱ्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यामध्ये विमल पान मसाला अंदाजे ₹1,24,800/-,V-1 तंबाखू , अंदाजे ₹31,200/-स्विफ्ट डिजायर कार अंदाजे ₹7,00,000/- असा एकूण ₹8,56,000/चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 223 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार अर्जुन रजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, आनंद हल्लाळे यांनी केली आहे.
- मुखेड शहरात सध्या अंमली पदार्थांचा, विशेषतः गांजाचा विळखा घट्ट होत चालला असून, शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. या गंभीर विषयावर स्थानिक माध्यमांनी वारंवार आवाज उठवून आणि बातम्या प्रसिद्ध करूनही, संबंधित प्रशासन आणि पोलीस विभाग अद्याप ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शहरातील काही निर्जन स्थळे, अर्धवट बांधलेली घरे आणि सार्वजनिक बागा,स्मारक परिसर आताव्यसनी टोळ्यांचे अड्डे बनत चालले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, १० ते १६ वयोगटातील मुले याव्यसनाच्या आहारी जात आहेत. शहरात गांजा येतो कुठून? आणि तो या लहान मुलांपर्यंत पोहोचवणारे मुख्य सूत्रधार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अंमली पदार्थ विक्रेते जाणीवपूर्वक शाळेतील आणि कॉलेजमधील मुलांना जाळ्यात ओढत आहेत. अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध होऊनही पोलिसांनी अद्याप एकही मोठी ठोस कारवाई केलेली नाही. आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल पालकांमध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षिततेची भावना आहे. प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वाट पाहिली जात आहे? ‘अंमली पदार्थ मुक्त मुखेड‘ च्या केवळ घोषणाच होणार की प्रत्यक्ष कारवाई? असे तिखट प्रश्न नागरिक विचारत आहेत2
- Post by Mohsin ahmed khan1
- परभणी (प्रतिनिधी) : परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर अनावश्यक ताण निर्माण करणारी पटपडताळणी प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी ढोल वाजवत निषेध नोंदवला.या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. परीक्षा सुरू असताना पटपडताळणी केल्यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शिक्षकांनाही दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने तणाव वाढत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. “परीक्षा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी प्रशासनाने पटपडताळणीसारखी प्रक्रिया राबवू नये. ती तातडीने थांबवून परीक्षा संपल्यानंतरच करावी,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्या शिक्षकांनी व्यक्त केली.शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला. श1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- "वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली.. बीड जिल्हा रुग्णालयात दाखल" पोटदुखीचा त्रास? #बीड बातम्या#वाल्मीककराड #संतोषदेशमुखहत्या #Beedcrime1
- Post by Today One Live1
- बालविवाह लावणाऱ्यांसह सहभागी सर्वांवरच गुन्हे दाखल करण्यात येणार - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक १७ एप्रिल नांदेड: शहरातील जलाराम मंदिर, दिलीप सिंग कॉलनी परिसरात अचानक विद्युत वाहक तार तुटल्याची घटना घडली. भरवस्तीत तार तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक तुलजाराम यादव यांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला आहे. दिलीप सिंग कॉलनी भागात विद्युत तार तुटल्याची तक्रार स्थानिकांनी नगरसेवक तुलजाराम यादव यांच्याकडे केली होती. तक्रारीचे गांभीर्य ओळखून यादव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले. नगरसेवक यादव स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेतले. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने आणि धोका टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून नगरसेवकांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे.1