दहावी सीबीएससी परीक्षेत राधिका कापगते तालुक्यात प्रथम राधिकाला बनणाच भारतीय प्रशासकीय अधिकारी साकोली:-राधिका कापगते हिने मिळवलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे. नुकताच 10 वी सी बी एस सी चा निकाल घोषित झालेला असून नवजीवन इंग्लिश स्कूल येथील दहावी सीबीएससीत शिकणारी राधिका नामदेव कापगते ही तालुक्यात प्रथम आलेली आहे राधिकाला 500 गुणांपैकी 479 गुण म्हणजेच 95.80 % टक्के प्राप्त करून यश संपादन केलेले आहे राधिका ही नर्सरी टू दहावीपर्यंत नवजीवन शाळेत शिकत होती आणि राधिका ही एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणे ही साकोली तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. वडील शेतकरी व आई घरकाम करणारी गृहिणी परंतु दोघेही उच्चशिक्षित असल्याने मुलींवर केलेले संस्कार व वेळोवेळी केलेली मार्गदर्शन आणि शाळेतील प्राचार्य भारती व्यास, सर्व शिक्षक व अजय बाळबुद्धे सर यांच्या अथक परिश्रमाने राधिकाला यश प्राप्त झाले. नवजीवन इंग्लिश स्कूल दहावी सीबीएससी परीक्षेला जवळपास 67 विद्यार्थी बसलेले असून त्यात पाच विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आहेत. राधिका ही तुळशीदास पाटील कापगते माजी पोलीस पाटील यांची नात आहे.राधिका लहानपणापासून अतिशय अभ्यासू व जिज्ञासू वृत्तीची असल्यामुळे लहान लहान गोष्टी समजून घेणे व अडचण आल्यास आई व वडिलांशी हितगुज साधून अडचण सोडविणे हा नित्य नियम असायचा. राधिका रोज जवळपास 10 ते 12 तास नियमित अभ्यास करायची आणि लहानपणापासूनच राधिकाने केवळ परीक्षेत यश मिळवले नाही, तर तिने आपले भविष्य देखील निश्चित केले आहे. तिला भारतीय प्रशासकीय अधिकारी (IAS) होऊन देशाची सेवा करायची आहे. दहावीच्या परीक्षेत मिळवलेले हे यश तिच्या या मोठ्या स्वप्नाकडे जाणारी पहिली यशस्वी पायरी आहे. "जिद्द आणि चिकाटी असेल तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे राधिकाने सिद्ध केले आहे." राधिकाला तिच्या पुढील वाटचालीस आणि आयएएस (IAS) होण्याच्या स्वप्नास तालुक्यातून सर्वांनी व साकोली तालुका पत्रकार संघाकडून मिळवलेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत

- Post by मनिषा विजय काशीवार1
- हिवरा येथे परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी दि. 19 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय हिवरा येथे भगवान परशुराम जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच सौ. मेघाताई बोरूळकर, उपसरपंच शरद पाटील, सदस्य राजुभाऊ धोतरकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या ‘कायका, दासोह, इष्टलिंग’ या तत्वांवर मार्गदर्शन करण्यात आले. अभय बोंपिलवार यांनी परशुरामांच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे आभार विशाल कदम यांनी मानले.2
- Post by Dinesh kambli3
- Post by कु सुषमा डबराल4
- Post by Krishna Waghade1
- आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. कोरची: तालुक्यातील प्रतापगड, नाडेकर व बेटकाठी टोला येथे आजही रस्ता, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा नाहीत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शासनाचे दुर्लक्ष स्पष्ट दिसून येत आहे. आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by मनिषा विजय काशीवार4