घरफोडी करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळीवर कारवाई – BNS कलम 112 अंतर्गत कठोर कारवाई घरफोडी करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळीवर कारवाई – BNS कलम 112 अंतर्गत कठोर कारवाई सतीश भालेराव नागपूर :- नागपूर शहरात घरफोडी व चोरीच्या घटनांवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस ठाणे बेलतरोडी यांनी संघटित गुन्हेगारीविरुद्ध कठोर कारवाई करत चार आरोपींना अटक करून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत संघटित गुन्हेगारीचे कलम लावण्यात आले आहे. पोलीस ठाणे बेलतरोडी येथे अपराध क्र. 57/2026 कलम 331(3), 331(4), 305(अ), 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याची थोडक्यात हकिकत अशी की, नमूद फिर्यादी यांनी दिनांक 04/02/2026 रोजी सायं. 18.00 वा. आपल्या घराला कुलूप लावून मुलाकडे पुणे येथे गेले होते. त्यानंतर दिनांक 08/02/2026 रोजी सकाळी 10.00 वा. सुमारास फिर्यादीचे चुलत भाऊ अभिजीत प्रकाश देशपांडे हे घराजवळील झाडांना पाणी घालण्यासाठी गेले असता त्यांना फिर्यादीच्या घराचे मुख्य दार उघडे दिसले व कोंडा तुटलेला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ फिर्यादी यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. त्यानुसार फिर्यादी हे पुणे येथून नागपूर येथे येऊन घराची पाहणी केली असता बेडरूममधील लोखंडी व लाकडी कपाट फोडून त्यामधून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू चोरीस गेल्याचे आढळून आले. चोरी गेलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट (किंमत अंदाजे 50,000/- रुपये), 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके व वेल (किंमत अंदाजे 25,000/- रुपये), 10 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू (किंमत अंदाजे 10,000/- रुपये), पॅनासोनिक कंपनीचा साऊंड सिस्टम (किंमत अंदाजे 11,000/- रुपये) तसेच रोख रक्कम 25,000/- रुपये असा एकूण अंदाजे 1,21,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. यावरून अज्ञात आरोपींनी घराचे मुख्य दाराचा कोंडा तोडून घरात प्रवेश करून सदर मुद्देमाल चोरी केल्याबाबत फिर्यादी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना तपास पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता ते संघटित पद्धतीने घरफोडीचे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वरिष्ठ अधिकारी यांच्या मान्यतेने दिनांक 07/03/2026 रोजी सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम 112 (संघटित गुन्हेगारी) प्रमाणे कलम वाढ करण्यात आले. सदर गुन्ह्यात खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे : मोहम्मद जाकीर मोहम्मद शहीद, वय 23 वर्ष, रा. मोठा ताजबाग, नागपूर गोविंद काशीराम साखरे, वय 23 वर्ष, रा. प्लॉट नं. 27, स्वामी नगर, नारी रोड, नागपूर शेख सज्जाद उर्फ साहिल शेख आबिद, वय 21 वर्ष, रा. झळगाव नगर, नागपूर आशुतोष उर्फ नाककाट्या लकीशंकर रवारे, वय 22 वर्ष, रा. अमरनगर, पोलीस ठाणे एमआयडीसी, नागपूर सदर आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू असा एकूण अंदाजे 9,51,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यांना मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर माळोकर यांनी प्रभावीपणे करून संघटित गुन्हेगारीचे स्वरूप उघडकीस आणले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. 04 रश्मिता राव, सहाय्यक पोलीस आयुक्त अजनी विभाग श्री नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे बेलतरोडी मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक किशोर माळोकर, पोलीस हवालदार सुरेंद्र बोपचे, सचिन लाचारवार, सुवास शिंगणे तसेच एएसआय अनिल बाबळे यांनी केली आहे. नागरिकांना आवाहन नागपूर शहर पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध असून चोरी, घरफोडी व संघटित गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येत आहे. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचे कलम लावून कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा Dial 112 वर संपर्क साधावा. नागपूर शहर पोलीस संघटित गुन्हेगारीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी कटिबद्ध आहेत.

- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.1
- Post by Ammar haider (ezaan)1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।1
- sourav plumber Roy 83486438921
- ಹಾನಗಲ್. ಸತತ 6 ವರ್ಷಗಳ ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಪಯಣ. ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಪ್ರಕಾಶಗೌಡ ಹಾಗೂ ಅವರ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ಸಾಯಿಬಾಬಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತೆರಳಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿವುದರೊಂದಿಗೆ ಡಿಸಿಎಂ.ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು.1
- पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.1