logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खारफुटीची कत्तल करून दिवा, मुंब्य्रातील 200 एकर जमीन कोण लाटतंय? राष्ट्रीय हरित लवादानेही ठाणे पालिकेला फटकारले दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसरात सीआरझेड क्षेत्रातील खारफुटीची बेसुमार कत्तल करून सुमारे 200 एकर जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम प्रचंड वेगाने सुरू आहे. आजूबाजूच्या शहरातील इमारतीच्या बांधकामाचा रोज शेकडो ट्रक राडारोडा आणून खाडी बुजवत नवीन जमीन तयार करण्याचा गोरखधंदा सुरू असून महसूल खाते, पोलीस आणि प्रशासनाच्या डोळय़ासमोर खाडीवर दिवसाढवळय़ा हा दरोडा घातला जात आहे. ही 200 एकर जमीन लाटतंय तरी कोण, यामागे कोणते राजकीय कनेक्शन आहे काय, असा सवाल केला जात असून राष्ट्रीय हरित लवादानेही याची गंभीर दखल घेत ठाणे महापालिकेला फटकारले आहे. ठाणे आणि लगतच्या शहरातील जमिनीला आलेला सोन्याचा भाव पाहून मुंब्रा-दिव्यातील रेल्वे लाइनच्या शेजारी असलेल्या खाडीतील शेकडो एकर खारफुटीवर भूमाफियांचा वरवंटा सुरू आहे. या विस्तीर्ण जमिनीवर पसरलेली जैवविविधता आणि कांदळवनांची बेसुमार कत्तल केली जात आहे. इमारतींचा राडारोडा आणून ही खारफुटी कचऱ्याखाली गाडली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या भागातील खारफुटीवर सुरू असलेल्या बेकायदा भरावावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही दिवसांपूर्वी मोठा गदारोळ झाला होता. विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरत भराव टाकण्याला परवानगी नसतानाही तो रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. दरम्यान, यावर महसूल व वन विभागाने गुन्हा दाखल केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले, मात्र त्यानंतरही पुन्हा हा भराव वाढतच असल्याने या गोरखधंद्याला कोणाचा आशीर्वाद आहे? यामागे मोठे राजकीय कनेक्शन आहे काय, असा सवाल करत पर्यावरण अभ्यासकांनी ठाणे महापालिकेच्या भूमिकेवरच शंका व्यक्त केली आहे.

10 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
10 hrs ago
2715c369-47e7-4b12-b4d7-ecc863e7d710

खारफुटीची कत्तल करून दिवा, मुंब्य्रातील 200 एकर जमीन कोण लाटतंय? राष्ट्रीय हरित लवादानेही ठाणे पालिकेला फटकारले दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसरात सीआरझेड क्षेत्रातील खारफुटीची बेसुमार कत्तल करून सुमारे 200 एकर जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम प्रचंड वेगाने सुरू आहे. आजूबाजूच्या शहरातील इमारतीच्या बांधकामाचा रोज शेकडो ट्रक राडारोडा आणून खाडी बुजवत नवीन जमीन तयार करण्याचा गोरखधंदा सुरू असून महसूल खाते, पोलीस आणि प्रशासनाच्या डोळय़ासमोर खाडीवर दिवसाढवळय़ा हा दरोडा घातला जात आहे. ही 200 एकर जमीन लाटतंय तरी कोण, यामागे कोणते राजकीय कनेक्शन आहे काय, असा सवाल केला जात असून राष्ट्रीय हरित लवादानेही याची गंभीर दखल घेत ठाणे महापालिकेला फटकारले आहे. ठाणे आणि लगतच्या शहरातील जमिनीला आलेला सोन्याचा भाव पाहून मुंब्रा-दिव्यातील रेल्वे लाइनच्या शेजारी असलेल्या खाडीतील शेकडो एकर खारफुटीवर भूमाफियांचा वरवंटा सुरू आहे. या विस्तीर्ण जमिनीवर पसरलेली जैवविविधता आणि कांदळवनांची बेसुमार कत्तल केली जात आहे. इमारतींचा राडारोडा आणून ही खारफुटी कचऱ्याखाली गाडली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या भागातील खारफुटीवर सुरू असलेल्या बेकायदा भरावावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही दिवसांपूर्वी मोठा गदारोळ झाला होता. विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरत भराव टाकण्याला परवानगी नसतानाही तो रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. दरम्यान, यावर महसूल व वन विभागाने गुन्हा दाखल केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले, मात्र त्यानंतरही पुन्हा हा भराव वाढतच असल्याने या गोरखधंद्याला कोणाचा आशीर्वाद आहे? यामागे मोठे राजकीय कनेक्शन आहे काय, असा सवाल करत पर्यावरण अभ्यासकांनी ठाणे महापालिकेच्या भूमिकेवरच शंका व्यक्त केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • रक्षाबंधनाच्या दिवशी कुडूस नाक्यावर वाहतूक कोंडी; लाडक्या बहिणींचा सवाल, “लाडका भाऊ कधी येणार?” कुडूस | प्रतिनिधी वाडा तालुक्यातील कुडूस नाका येथे शुक्रवारी, दि. २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सणानिमित्त कुडूस परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. कुडूस नाका हा वाडा तालुक्यातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून या ठिकाणी नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच सध्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदारामार्फत रस्त्याचे काम सुरू असून एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूचा रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय कुडूस नाका परिसरातील बेशिस्त वाहतूक हीदेखील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. काही वाहनचालक तसेच रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन न करता विरुद्ध दिशेने वाहने चालविली जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, कुडूस नाक्यावरील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या बांधकामांमुळे रस्त्याची उपलब्ध जागा कमी होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. कुडूस नाक्यावर उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र अद्याप या मागणीवर ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींची गैरसोय रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावाला राखी बांधण्यासाठी निघालेल्या अनेक बहिणींना कुडूस नाक्यावरील वाहतूक कोंडीचा फटका बसला. तासन्‌तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागल्याने काही महिलांनी संताप व्यक्त केला. “लाडक्या बहिणींच्या अडचणी सोडविण्याची चर्चा केली जाते; मात्र कुडूस नाक्यावर आम्हाला तासन्‌तास ट्रॅफिकमध्ये अडकावे लागत आहे. लाडक्या बहिणींना या ट्रॅफिकमधून बाहेर काढण्यासाठी लाडका भाऊ कधी येणार?” असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. कुडूस नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न केवळ सणासुदीपुरता मर्यादित नसून दररोज नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सुरू असलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे, बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण आणणे, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावणे आणि भविष्यातील वाहतुकीचा विचार करून उड्डाणपुलाबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग आणि संबंधित प्रशासन कुडूस नाक्यावरील या गंभीर वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    1
    रक्षाबंधनाच्या दिवशी कुडूस नाक्यावर वाहतूक कोंडी; लाडक्या बहिणींचा सवाल, “लाडका भाऊ कधी येणार?”
कुडूस | प्रतिनिधी
वाडा तालुक्यातील कुडूस नाका येथे शुक्रवारी, दि. २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सणानिमित्त कुडूस परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.
कुडूस नाका हा वाडा तालुक्यातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून या ठिकाणी नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच सध्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदारामार्फत रस्त्याचे काम सुरू असून एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूचा रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याशिवाय कुडूस नाका परिसरातील बेशिस्त वाहतूक हीदेखील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. काही वाहनचालक तसेच रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन न करता विरुद्ध दिशेने वाहने चालविली जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा वाढत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, कुडूस नाक्यावरील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या बांधकामांमुळे रस्त्याची उपलब्ध जागा कमी होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
कुडूस नाक्यावर उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र अद्याप या मागणीवर ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींची गैरसोय
रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावाला राखी बांधण्यासाठी निघालेल्या अनेक बहिणींना कुडूस नाक्यावरील वाहतूक कोंडीचा फटका बसला. तासन्‌तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागल्याने काही महिलांनी संताप व्यक्त केला.
“लाडक्या बहिणींच्या अडचणी सोडविण्याची चर्चा केली जाते; मात्र कुडूस नाक्यावर आम्हाला तासन्‌तास ट्रॅफिकमध्ये अडकावे लागत आहे. लाडक्या बहिणींना या ट्रॅफिकमधून बाहेर काढण्यासाठी लाडका भाऊ कधी येणार?” असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला.
कुडूस नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न केवळ सणासुदीपुरता मर्यादित नसून दररोज नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सुरू असलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे, बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण आणणे, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावणे आणि भविष्यातील वाहतुकीचा विचार करून उड्डाणपुलाबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग आणि संबंधित प्रशासन कुडूस नाक्यावरील या गंभीर वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    user_Sanvad Maharashtra News
    Sanvad Maharashtra News
    वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • रक्षाबंधन के मौके पर वरिष्ठ नगरसेवक राजन किने का सुंदर संदेश रक्षाबंधन के मौके पर वरिष्ठ नगरसेवक राजन किने का सुंदर संदेश
    1
    रक्षाबंधन के मौके पर वरिष्ठ नगरसेवक राजन किने का सुंदर संदेश
रक्षाबंधन के मौके पर वरिष्ठ नगरसेवक राजन किने का सुंदर संदेश
    user_Prime mumbai 24 News
    Prime mumbai 24 News
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मुंब्रा पुलिस स्टेशन में मनाया गया रक्षाबंधन, महिलाओं ने पुलिसकर्मियों को बांधी राखी मुंब्रा पुलिस स्टेशन में मनाया गया रक्षाबंधन, महिलाओं ने पुलिसकर्मियों को बांधी राखी
    1
    मुंब्रा पुलिस स्टेशन में मनाया गया रक्षाबंधन, महिलाओं ने पुलिसकर्मियों को बांधी राखी
मुंब्रा पुलिस स्टेशन में मनाया गया रक्षाबंधन, महिलाओं ने पुलिसकर्मियों को बांधी राखी
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ब्रेकिंग न्यूज़: हिस्ट्रीशीटर ओंकार भोसले ठाणे क्राइम ब्रांच की एंटी-एक्सटॉर्शन सेल में लाया गया!...
    1
    ब्रेकिंग न्यूज़: हिस्ट्रीशीटर ओंकार भोसले ठाणे क्राइम ब्रांच की एंटी-एक्सटॉर्शन सेल में लाया गया!...
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मराठी सीखने के लिए 1 साल का समय दिया कोई कार्रवाई नहीं होगी BNN NEWS मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मराठी सीखने के लिए 1 साल का समय दिया कोई कार्रवाई नहीं होगी BNN NEWS
    1
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मराठी सीखने के लिए 1 साल का समय दिया कोई कार्रवाई नहीं होगी BNN NEWS 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मराठी सीखने के लिए 1 साल का समय दिया कोई कार्रवाई नहीं होगी BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मुंब्रा में बड़े उत्साह और धूमधाम से मनाया गया जशने ईद मीलादुन्नबी, पूरा शहर उतरा सड़कों पर।
    1
    मुंब्रा में बड़े उत्साह और धूमधाम से मनाया गया जशने ईद मीलादुन्नबी, पूरा शहर उतरा सड़कों पर।
    user_मुंब्रा टाइम्स
    मुंब्रा टाइम्स
    Local News Reporter अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ब्राइट लाइन एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट'च्या "१९० स्वप्ने... 'ब्राइट लाइन एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट'च्या "१९० स्वप्ने... एक मिशन" या प्रवासाचे साक्षीदार बना. प्रत्येक मुलाचे एक स्वप्न असते, पण प्रत्येक मुलाला ते पूर्ण करण्याची संधी मिळत नाही. ज्या मुलांना याची सर्वाधिक गरज आहे, त्यांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी, शालेय शुल्कासाठी मदत करण्यासाठी आणि त्यांना पुस्तके पुरवण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत. शिक्षणाला पाठिंबा द्या, उज्ज्वल भविष्याला साथ द्या!
    1
    ब्राइट लाइन एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट'च्या "१९० स्वप्ने... 
'ब्राइट लाइन एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट'च्या "१९० स्वप्ने... एक मिशन" या प्रवासाचे साक्षीदार बना. प्रत्येक मुलाचे एक स्वप्न असते, पण प्रत्येक मुलाला ते पूर्ण करण्याची संधी मिळत नाही. ज्या मुलांना याची सर्वाधिक गरज आहे, त्यांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी, शालेय शुल्कासाठी मदत करण्यासाठी आणि त्यांना पुस्तके पुरवण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत. शिक्षणाला पाठिंबा द्या, उज्ज्वल भविष्याला साथ द्या!
    user_Bright Line Educational & Welfare Trust
    Bright Line Educational & Welfare Trust
    Education Centre ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • जश्ने ईद ए मिलादुन्नबी 2026 मुंब्रा Mumbai Bulletin News जश्ने ईद ए मिलादुन्नबी 2026 मुंब्रा Mumbai Bulletin News
    1
    जश्ने ईद ए मिलादुन्नबी 2026 मुंब्रा
Mumbai Bulletin News 
जश्ने ईद ए मिलादुन्नबी 2026 मुंब्रा
Mumbai Bulletin News
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.