logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मानोरा पोलिसांचा आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांवर मोठा प्रहार; पुण्यातील दोन मोटारसायकली जप्त मानोरा :--तालुक्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मानोरा पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पुणे येथून चोरी गेलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्या संबंधित पुणे पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. दि. २९ जानेवारी २०२६ रोजी पुणे येथील पोलीस स्टेशनमध्ये मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल झाली होती. दरम्यान, १६ एप्रिल रोजी मानोरा तालुक्यातील एका गावात एक अल्पवयीन युवक ‘एनएस २०० पल्सर’ ही महागडी मोटारसायकल अवघ्या साडेपाच हजार रुपयांत विकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली. संबंधित व्यवहारात विकत घेणाऱ्या युवकाला कागदपत्रे नसल्यामुळे संशय आल्याने त्याने तातडीने पोलिसांना कळवले. माहिती मिळताच मानोरा पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत संबंधितांकडून दोन मोटारसायकली जप्त केल्या. तपासादरम्यान या गाड्या पुणे येथून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त मुद्देमाल पुणे पोलीस पथकाकडे सुपूर्द करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार नैना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रमेश पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल राधेश्याम महल्ले तसेच रोहन तायडे आणि राम राठोड यांनी यशस्वीपणे पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, यामागे मोठे आंतरजिल्हा रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

1 hr ago
user_कु.मोनाली अनिल राठोड
कु.मोनाली अनिल राठोड
पत्रकार मानोरा, वाशिम, महाराष्ट्र•
1 hr ago
cc210b69-58da-46f6-8c23-b9c1554eaf73

मानोरा पोलिसांचा आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांवर मोठा प्रहार; पुण्यातील दोन मोटारसायकली जप्त मानोरा :--तालुक्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मानोरा पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पुणे येथून चोरी गेलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्या संबंधित पुणे पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. दि. २९ जानेवारी २०२६ रोजी पुणे येथील पोलीस स्टेशनमध्ये मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल झाली होती. दरम्यान, १६ एप्रिल रोजी मानोरा तालुक्यातील एका गावात एक अल्पवयीन युवक ‘एनएस २०० पल्सर’ ही महागडी मोटारसायकल अवघ्या साडेपाच हजार रुपयांत विकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली. संबंधित व्यवहारात विकत घेणाऱ्या युवकाला कागदपत्रे नसल्यामुळे संशय आल्याने त्याने तातडीने पोलिसांना कळवले. माहिती मिळताच मानोरा पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत संबंधितांकडून दोन मोटारसायकली जप्त केल्या. तपासादरम्यान या गाड्या पुणे येथून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त मुद्देमाल पुणे पोलीस पथकाकडे सुपूर्द करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार नैना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रमेश पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल राधेश्याम महल्ले तसेच रोहन तायडे आणि राम राठोड यांनी यशस्वीपणे पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, यामागे मोठे आंतरजिल्हा रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Santosh Dhakulkar
    1
    Post by Santosh Dhakulkar
    user_Santosh Dhakulkar
    Santosh Dhakulkar
    कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Ahem Raza
    1
    Post by Ahem Raza
    user_Ahem Raza
    Ahem Raza
    मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by M B B
    1
    Post by M B B
    user_M B B
    M B B
    Kalamnuri, Hingoli•
    11 hrs ago
  • हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    1
    हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.”
यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Shaikh irfan Shaikh isa
    1
    Post by Shaikh irfan Shaikh isa
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वारखेड परिसरात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा वाघ आता वारी येथील मानवी वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास वाघाने वारी गावाजवळील वस्तीत घुसून एका गाढवाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वारखेड शिवारात मागील काही दिवसांपासून वाघाने अनेक जनावरांवर हल्ले केले होते. शेतशिवारात फटाके फोडून आणि आवाज करून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा वाघ अधिकच आक्रमक बनत मानवी वस्तीच्या दिशेने सरकला असल्याचे दिसून येत आहे. वारी येथील रहिवाशांनी सांगितले की, पहाटे अचानक जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर परिसरात तपासणी केली असता एका गाढवाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी वाघाचे ठसेही स्पष्ट दिसून आले. त्यामुळे हा हल्ला वाघानेच केल्याची खात्री ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
    1
    अकोला:
जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वारखेड परिसरात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा वाघ आता वारी येथील मानवी वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी  पहाटेच्या सुमारास वाघाने वारी गावाजवळील वस्तीत घुसून एका गाढवाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वारखेड शिवारात मागील काही दिवसांपासून वाघाने अनेक जनावरांवर हल्ले केले होते. शेतशिवारात फटाके फोडून आणि आवाज करून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा वाघ अधिकच आक्रमक बनत मानवी वस्तीच्या दिशेने सरकला असल्याचे दिसून येत आहे.
वारी येथील रहिवाशांनी सांगितले की, पहाटे अचानक जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर परिसरात तपासणी केली असता एका गाढवाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी वाघाचे ठसेही स्पष्ट दिसून आले. त्यामुळे हा हल्ला वाघानेच केल्याची खात्री ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • अकोला: अकोला जिल्ह्यात रविवारी निसर्गाचे दोन टोकाचे रूप पाहायला मिळाले. दिवसभर जिल्हा ४५ अंश सेल्सिअस तापमानाने होरपळून निघालेला असतानाच, सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या संकटामुळे जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा तडाखा होता, मात्र सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि वादळाने जिल्ह्याला झोडपले. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. शहरातील मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागातही अनेक जुने वृक्ष मुळासकट उखडून पडले आहेत. यामुळे काही मार्गांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अंधाराचे साम्राज्य महावितरणच्या पायाभूत सुविधांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी तुटलेल्या वीज तारांपासून लांब राहावे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
    1
    अकोला:
अकोला जिल्ह्यात रविवारी निसर्गाचे दोन टोकाचे रूप पाहायला मिळाले. दिवसभर जिल्हा ४५ अंश सेल्सिअस तापमानाने होरपळून निघालेला असतानाच, सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या संकटामुळे जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा तडाखा होता, मात्र सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि वादळाने जिल्ह्याला झोडपले. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
शहरातील मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागातही अनेक जुने वृक्ष मुळासकट उखडून पडले आहेत. यामुळे काही मार्गांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
अंधाराचे साम्राज्य
महावितरणच्या पायाभूत सुविधांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्यामुळे  जिल्ह्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी तुटलेल्या वीज तारांपासून लांब राहावे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.