अकोल्यात निसर्गाचा कोप! ४५ अंशांच्या दाहकतेनंतर वादळी पावसाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत अकोला: अकोला जिल्ह्यात रविवारी निसर्गाचे दोन टोकाचे रूप पाहायला मिळाले. दिवसभर जिल्हा ४५ अंश सेल्सिअस तापमानाने होरपळून निघालेला असतानाच, सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या संकटामुळे जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा तडाखा होता, मात्र सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि वादळाने जिल्ह्याला झोडपले. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. शहरातील मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागातही अनेक जुने वृक्ष मुळासकट उखडून पडले आहेत. यामुळे काही मार्गांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अंधाराचे साम्राज्य महावितरणच्या पायाभूत सुविधांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी तुटलेल्या वीज तारांपासून लांब राहावे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

- अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वारखेड परिसरात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा वाघ आता वारी येथील मानवी वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास वाघाने वारी गावाजवळील वस्तीत घुसून एका गाढवाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वारखेड शिवारात मागील काही दिवसांपासून वाघाने अनेक जनावरांवर हल्ले केले होते. शेतशिवारात फटाके फोडून आणि आवाज करून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा वाघ अधिकच आक्रमक बनत मानवी वस्तीच्या दिशेने सरकला असल्याचे दिसून येत आहे. वारी येथील रहिवाशांनी सांगितले की, पहाटे अचानक जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर परिसरात तपासणी केली असता एका गाढवाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी वाघाचे ठसेही स्पष्ट दिसून आले. त्यामुळे हा हल्ला वाघानेच केल्याची खात्री ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.1
- Post by Ahem Raza1
- खामगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका २६ वर्षीय जेसीबी ऑपरेटरला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना जळका भडंग फाट्यावर घडली आहे. या मारहाणीत ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून त्याच्या खिशातील २५ हजार रुपयेही गहाळ झाल्याची तक्रार त्याने पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शंकरनगर येथील रहिवासी पवन रामदास क्षीरसागर (वय २६) हे निपाणा येथील ज्ञानेश्वर बोचरे यांच्या जेसीबीवर ऑपरेटर म्हणून काम करतात. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास, जेसीबीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते दुरुस्तीसाठी खामगावकडे जात होते. जळका भडंग येथील वाकुड जाणाऱ्या रस्त्याच्या फाट्यावर एक चारचाकी गाडी उभी होती, जिचा दरवाजा उघडा होता. पवन यांनी गाडीतील व्यक्तीला दरवाजा लावून घेण्यास सांगितले. याच साध्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि गाडीतील व्यक्तींनी पवन यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पवन क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रवी सोळंके, महेंद्र दामोदर, अरविंद दामोदर आणि कपिल दामोदर (सर्व रा. जळका भडंग) यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत पवन यांच्या तोंडावर, छातीवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीदरम्यान त्यांचे शर्ट फाटले असून खिशातील २५,००० रुपये देखील गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. पवन यांना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, पवनला रक्ताची उलट्या झाल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तो सध्या आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. पिंपळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.1
- छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर हिवरखेड येथे संपन्न1
- Post by Sharad Dayedar1
- बुलढाणा जिल्ह्याच्या ऐतिहासिक भेंडवड घट मांडणीचे भाकीत जाहीर.... देशावर नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती आणि अर्थव्यवस्था ढासाळेल1
- Post by Santosh Dhakulkar1
- अकोला: अकोला जिल्ह्यात रविवारी निसर्गाचे दोन टोकाचे रूप पाहायला मिळाले. दिवसभर जिल्हा ४५ अंश सेल्सिअस तापमानाने होरपळून निघालेला असतानाच, सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या संकटामुळे जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा तडाखा होता, मात्र सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि वादळाने जिल्ह्याला झोडपले. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. शहरातील मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागातही अनेक जुने वृक्ष मुळासकट उखडून पडले आहेत. यामुळे काही मार्गांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अंधाराचे साम्राज्य महावितरणच्या पायाभूत सुविधांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी तुटलेल्या वीज तारांपासून लांब राहावे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.1