logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अक्राणी व बिलगांव वन भागाच्या रेंज पथकाने सावऱ्या - निलदयपाडा रस्त्यावर धडक कारवाई करत अवैध सागवान लाकूड आणि वाहनासह २ लाख ८२ हजार ४८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या गुप्त बातमीनुसार वनक्षेत्रपाल आणि रेंज स्टाफने पहाटे ५:३० ते ६:०० वाजेच्या दरम्यान गस्त घालत असताना संशयास्पद बोलेरो पिकअप (एम.एच. ०५ आर ३९७२) चा पाठलाग करून तिला पकडले. मात्र, वाहन चालक गाडी सोडून जंगलात पसार झाला आणि शोध घेऊनही मिळून आला नाही. वाहनाची पाहणी केली असता ताडपत्रीच्या खाली २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या बोलेरो पिकअपमध्ये ३२ हजार ४८२ रुपये किंमतीचे १०७ नग (१.४६० घनमीटर) साग चौकट लाकूड मिळून आले. जप्त वाहन आणि मुद्देमाल ताबा पावतीने धडगाव टिंबर डेपोत जमा करून वनरक्षक धडगाव यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी वनरक्षक सावऱ्या यांनी वन गुन्हा नोंदवला असून भारतीय वन अधिनियम १९२७ च्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. वनपाल भरतसिंग परदेशी या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. धुळे वनवृत्त वनसंरक्षक निनु सोमराज, नंदुरबार उपवनसंरक्षक संतोष सस्ते, विभागीय दक्षता अधिकारी राजेंद्र सदगिर व सहाय्यक वनसंरक्षक संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत शेंडगे व रोहन पाटील यांच्या नेतृत्वाखालील वन पथकाने ही कारवाई पार पाडली.

5 hrs ago
user_ईश्वर मराठे (पत्रकार)
ईश्वर मराठे (पत्रकार)
Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
5 hrs ago

अक्राणी व बिलगांव वन भागाच्या रेंज पथकाने सावऱ्या - निलदयपाडा रस्त्यावर धडक कारवाई करत अवैध सागवान लाकूड आणि वाहनासह २ लाख ८२ हजार ४८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या गुप्त बातमीनुसार वनक्षेत्रपाल आणि रेंज स्टाफने पहाटे ५:३० ते ६:०० वाजेच्या दरम्यान गस्त घालत असताना संशयास्पद बोलेरो पिकअप (एम.एच. ०५ आर ३९७२) चा पाठलाग करून तिला पकडले. मात्र, वाहन चालक गाडी सोडून जंगलात पसार झाला आणि शोध घेऊनही मिळून आला नाही. वाहनाची पाहणी केली असता ताडपत्रीच्या खाली २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या बोलेरो पिकअपमध्ये ३२ हजार ४८२ रुपये किंमतीचे १०७ नग (१.४६० घनमीटर) साग चौकट लाकूड मिळून आले. जप्त वाहन आणि मुद्देमाल ताबा पावतीने धडगाव टिंबर डेपोत जमा करून वनरक्षक धडगाव यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी वनरक्षक सावऱ्या यांनी वन गुन्हा नोंदवला असून भारतीय वन अधिनियम १९२७ च्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. वनपाल भरतसिंग परदेशी या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. धुळे वनवृत्त वनसंरक्षक निनु सोमराज, नंदुरबार उपवनसंरक्षक संतोष सस्ते, विभागीय दक्षता अधिकारी राजेंद्र सदगिर व सहाय्यक वनसंरक्षक संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत शेंडगे व रोहन पाटील यांच्या नेतृत्वाखालील वन पथकाने ही कारवाई पार पाडली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे येथील पेडकाई माता ताडी विक्री केंद्रावर अन्न व औषध विभागाने २२ जुलै २०२६ रोजी तपासणी करत कारवाई केली. बाजारपेठेतील गट क्रमांक ०२ मध्ये असलेल्या या ताडी केंद्रावरून ताडीचा नमुना विश्लेषणासाठी संकलित करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कारवाई करत, ₹४,००० किमतीचा उर्वरित ४० लिटर ताडीचा साठा कासारे ग्रामपंचायतच्या कचरा निर्मूलन केंद्रात नष्ट करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. गो. वी. माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
    2
    धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे येथील पेडकाई माता ताडी विक्री केंद्रावर अन्न व औषध विभागाने २२ जुलै २०२६ रोजी तपासणी करत कारवाई केली. बाजारपेठेतील गट क्रमांक ०२ मध्ये असलेल्या या ताडी केंद्रावरून ताडीचा नमुना विश्लेषणासाठी संकलित करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कारवाई करत, ₹४,००० किमतीचा उर्वरित ४० लिटर ताडीचा साठा कासारे ग्रामपंचायतच्या कचरा निर्मूलन केंद्रात नष्ट करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. गो. वी. माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील चिखली गावात जोरदार पावसामुळे हेमंत बागुल आणि हरिश्चंद्र बागुल यांच्या घरात पाणी घुसले आहे. गावात झालेल्या या मुसळधार पावसामुळे या दोन्ही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची घटना घडली आहे.
    2
    नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील चिखली गावात जोरदार पावसामुळे हेमंत बागुल आणि हरिश्चंद्र बागुल यांच्या घरात पाणी घुसले आहे. गावात झालेल्या या मुसळधार पावसामुळे या दोन्ही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची घटना घडली आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नाशिकच्या जयभवानी रोड परिसरात कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार विजय उर्फ छंगा बेहनवाल आणि त्याच्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून अटक केली आहे. २० जुलै रोजी रात्री जुन्या वादातून फिर्यादीच्या भावावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर घरावर कोयत्याने वार करून आणि सार्वजनिक रस्त्यावर शस्त्रांचे प्रदर्शन करत परिसरात दहशत निर्माण करण्यात आली होती. या प्रकरणी २१ जुलै रोजी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी शहरातून फरार झाले होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सिन्नर, संगमनेर मार्गे नारायणगावपर्यंत आरोपींचा पाठलाग केला. सिन्नरमधील दोन कला केंद्रांवर छापे टाकल्यानंतर अखेर नारायणगाव येथील एका कला केंद्रात आरोपी लपल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी वेढा घातला. तेथून विजय उर्फ छंगा सरजित बेहनवाल (२८), योगेश उर्फ काका प्रल्हाद आहेर (४३), प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे (२६) आणि सचिन उर्फ अन्नू राधेकिशन गवंडर (३२) या चौघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी सिन्नरहून पुण्याकडे जाताना संगमनेरमधील एका बारमध्ये "आम्ही नाशिकचे भाई आहोत, आम्हाला फुकट दारू द्या" अशी दमदाटी करून बारचालकाला शिवीगाळ केल्याचे निष्पन्न झाले, ज्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विजय उर्फ छंगा आणि त्याच्या साथीदारांवर नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यांत तोडफोड, मारामारी आणि दहशत माजविणे यांसारखे १० ते १२ गंभीर गुन्हे नोंद आहेत. ही टोळी फर्नाडीस वाडी परिसरातील बेरोजगार तरुणांना हाताशी धरून गुन्हेगारी करत होती. गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व त्यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे जयभवानी रोड, नाशिकरोड आणि उपनगर परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून अटक केलेल्या चौघांना पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
    1
    नाशिकच्या जयभवानी रोड परिसरात कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार विजय उर्फ छंगा बेहनवाल आणि त्याच्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून अटक केली आहे. २० जुलै रोजी रात्री जुन्या वादातून फिर्यादीच्या भावावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर घरावर कोयत्याने वार करून आणि सार्वजनिक रस्त्यावर शस्त्रांचे प्रदर्शन करत परिसरात दहशत निर्माण करण्यात आली होती. या प्रकरणी २१ जुलै रोजी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यानंतर आरोपी शहरातून फरार झाले होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सिन्नर, संगमनेर मार्गे नारायणगावपर्यंत आरोपींचा पाठलाग केला. सिन्नरमधील दोन कला केंद्रांवर छापे टाकल्यानंतर अखेर नारायणगाव येथील एका कला केंद्रात आरोपी लपल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी वेढा घातला. तेथून विजय उर्फ छंगा सरजित बेहनवाल (२८), योगेश उर्फ काका प्रल्हाद आहेर (४३), प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे (२६) आणि सचिन उर्फ अन्नू राधेकिशन गवंडर (३२) या चौघांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत आरोपींनी सिन्नरहून पुण्याकडे जाताना संगमनेरमधील एका बारमध्ये "आम्ही नाशिकचे भाई आहोत, आम्हाला फुकट दारू द्या" अशी दमदाटी करून बारचालकाला शिवीगाळ केल्याचे निष्पन्न झाले, ज्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विजय उर्फ छंगा आणि त्याच्या साथीदारांवर नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यांत तोडफोड, मारामारी आणि दहशत माजविणे यांसारखे १० ते १२ गंभीर गुन्हे नोंद आहेत. ही टोळी फर्नाडीस वाडी परिसरातील बेरोजगार तरुणांना हाताशी धरून गुन्हेगारी करत होती. गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व त्यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे जयभवानी रोड, नाशिकरोड आणि उपनगर परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून अटक केलेल्या चौघांना पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात आणि पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध भावली धरण १००% भरून ओव्हरफ्लो झाले आहे. पावसाची संततधार कायम राहिल्याने जलसाठा पूर्ण क्षमतेने भरला असून धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पावसामुळे परिसरातील निसर्गरम्य भाग जलमय झाला आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि शेतीची चिंता मिटल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, प्रशासनाकडून भावली व भाम नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिसरात निसर्गसौंदर्य खुलले असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यटकांनी पाण्यात उतरणे व हुल्लडबाजी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
    1
    नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात आणि पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध भावली धरण १००% भरून ओव्हरफ्लो झाले आहे. पावसाची संततधार कायम राहिल्याने जलसाठा पूर्ण क्षमतेने भरला असून धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पावसामुळे परिसरातील निसर्गरम्य भाग जलमय झाला आहे.

धरण पूर्ण भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि शेतीची चिंता मिटल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, प्रशासनाकडून भावली व भाम नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिसरात निसर्गसौंदर्य खुलले असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यटकांनी पाण्यात उतरणे व हुल्लडबाजी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Mill Owner नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नाशिक येथील नवीन नाशिक सेंटर पार्क येथे स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. दिनांक 22 जुलै 2026 रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांची विशेष उपस्थिती होती. नवीन नाशिक परिसरातील सेंटर पार्कमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा जयंती सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
    1
    नाशिक येथील नवीन नाशिक सेंटर पार्क येथे स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. दिनांक 22 जुलै 2026 रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांची विशेष उपस्थिती होती. नवीन नाशिक परिसरातील सेंटर पार्कमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा जयंती सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
    user_निलेश  शेकोकार NPS न्यूज
    निलेश शेकोकार NPS न्यूज
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतरपासून ते बिहारपर्यंत NEET पेपर लीक आणि परीक्षा व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांचे आंदोलन अत्यंत तीव्र झाले आहे. या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचे विरोध प्रदर्शन सातत्याने सुरूच आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे विधान समोर आले आहे. या घडामोडींनंतर आता सरकार याप्रकरणी काही मोठी कारवाई करण्यास जात आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतरपासून ते बिहारपर्यंत NEET पेपर लीक आणि परीक्षा व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांचे आंदोलन अत्यंत तीव्र झाले आहे. या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचे विरोध प्रदर्शन सातत्याने सुरूच आहे.

या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे विधान समोर आले आहे. या घडामोडींनंतर आता सरकार याप्रकरणी काही मोठी कारवाई करण्यास जात आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात पार पडलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करावी, या प्रमुख मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत जोरदार घोषणाबाजी केली. शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याची भूमिका मांडत आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहीमही राबवली.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात पार पडलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करावी, या प्रमुख मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत जोरदार घोषणाबाजी केली. शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याची भूमिका मांडत आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहीमही राबवली.
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • नंदुरबारहून धुळ्याकडे येणाऱ्या धावत्या शिवशाही बसला धुळे शहराजवळील नगाव बारी परिसरात अचानक भीषण आग लागली. बसमधून अचानक धुराचे लोट निघू लागल्यानंतर काही क्षणांतच बसने पेट घेतला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत. प्राथमिक माहितीनुसार आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज चालकाने व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत शिवशाही बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
    1
    नंदुरबारहून धुळ्याकडे येणाऱ्या धावत्या शिवशाही बसला धुळे शहराजवळील नगाव बारी परिसरात अचानक भीषण आग लागली. बसमधून अचानक धुराचे लोट निघू लागल्यानंतर काही क्षणांतच बसने पेट घेतला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

प्राथमिक माहितीनुसार आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज चालकाने व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत शिवशाही बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.