logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात पार पडलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करावी, या प्रमुख मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत जोरदार घोषणाबाजी केली. शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याची भूमिका मांडत आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहीमही राबवली.

7 hrs ago
user_DHULE CRIME NEWS
DHULE CRIME NEWS
धुळे, धुळे, महाराष्ट्र•
7 hrs ago

दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात पार पडलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करावी, या प्रमुख मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत जोरदार घोषणाबाजी केली. शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याची भूमिका मांडत आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहीमही राबवली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 'सेवा सप्ताह' निमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल येवला प्रखंड यांच्या वतीने अंगणगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरवासीयांना पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) गणेशमूर्ती स्थापन करण्याचे आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आग्रही आवाहन या प्रसंगी करण्यात आले. या उपक्रमाला येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मांडलिक, माजी नगरसेवक महेश काबरा, तसेच विहिंप पश्चिम महाराष्ट्र प्रांत विधी आयाम कृषी प्रमुख ॲड. शैलेश भावसार यांची प्रमुख उपस्थिती व सहकार्य लाभले. यावेळी प्रखंड सेवा विभाग प्रमुख साहिल बाबर, प्रखंड संयोजक गणेश काबरा यांच्यासह विहिंप व बजरंग दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षणाचा संकल्प करावा, असा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्यात आला.
    1
    'सेवा सप्ताह' निमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल येवला प्रखंड यांच्या वतीने अंगणगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरवासीयांना पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) गणेशमूर्ती स्थापन करण्याचे आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आग्रही आवाहन या प्रसंगी करण्यात आले.

या उपक्रमाला येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मांडलिक, माजी नगरसेवक महेश काबरा, तसेच विहिंप पश्चिम महाराष्ट्र प्रांत विधी आयाम कृषी प्रमुख ॲड. शैलेश भावसार यांची प्रमुख उपस्थिती व सहकार्य लाभले. यावेळी प्रखंड सेवा विभाग प्रमुख साहिल बाबर, प्रखंड संयोजक गणेश काबरा यांच्यासह विहिंप व बजरंग दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षणाचा संकल्प करावा, असा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्यात आला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील केळगाव मुर्डेश्वर डोंगरात अमरकंद या फळाची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भातील माहिती डॉक्टर संतोष पाटील यांनी वन विभागाला दिली होती. माहिती मिळताच वन विभागाने कारवाई करत तीन तरुणांना अटक केली आणि त्यांच्याकडून अमरकंद जप्त केले. यानंतर सिल्लोड वनविभागाच्या वतीने जप्त करण्यात आलेल्या या अमरकंद फळाचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
    1
    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील केळगाव मुर्डेश्वर डोंगरात अमरकंद या फळाची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भातील माहिती डॉक्टर संतोष पाटील यांनी वन विभागाला दिली होती.

माहिती मिळताच वन विभागाने कारवाई करत तीन तरुणांना अटक केली आणि त्यांच्याकडून अमरकंद जप्त केले. यानंतर सिल्लोड वनविभागाच्या वतीने जप्त करण्यात आलेल्या या अमरकंद फळाचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील डोंगर गाव शिव येथील महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते.
    1
    औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील डोंगर गाव शिव येथील महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते.
    user_Amol patil press reporter phul
    Amol patil press reporter phul
    फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • महाराष्ट्रातील शिरपूर येथे युवकांनी शिक्षण मंत्री आणि भ्रष्ट सरकारविरोधात अनोखा निषेध व्यक्त केला आहे. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या दडपशाहीचा तीव्र विरोध करत न्यायाची मागणी केली आहे. भ्रष्ट सरकार आणि शिक्षण मंत्र्यांच्या कारभाराविरोधात युवकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे.
    1
    महाराष्ट्रातील शिरपूर येथे युवकांनी शिक्षण मंत्री आणि भ्रष्ट सरकारविरोधात अनोखा निषेध व्यक्त केला आहे. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या दडपशाहीचा तीव्र विरोध करत न्यायाची मागणी केली आहे. भ्रष्ट सरकार आणि शिक्षण मंत्र्यांच्या कारभाराविरोधात युवकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे.
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • स्लिप डिस्कचा गंभीर त्रास असतानाही रविराज साबळे यांना पोलिसांनी मान दाबून आणि जबरदस्तीने उचलून ताब्यात घेतल्याची संतापजनक घटना समोर आली असून, या कारवाईनंतर प्रशासन आणि सरकारचा जाहीर निषेध केला जात आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततामय मार्गाने आपला आवाज मांडण्याचा अधिकार असताना अशा प्रकारे केलेल्या कारवाईमुळे लोकशाही मूल्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची तीव्र भावना व्यक्त केली जात आहे. या घटनेच्या विरोधात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन संविधानाच्या चौकटीत राहून शांततामय मार्गाने आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज जर नागरिकांचा आवाज दाबला गेला, तर उद्या हक्कांसाठी उभे राहणारे कोणीच उरणार नाही, असा इशारा देत या पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.
    1
    स्लिप डिस्कचा गंभीर त्रास असतानाही रविराज साबळे यांना पोलिसांनी मान दाबून आणि जबरदस्तीने उचलून ताब्यात घेतल्याची संतापजनक घटना समोर आली असून, या कारवाईनंतर प्रशासन आणि सरकारचा जाहीर निषेध केला जात आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततामय मार्गाने आपला आवाज मांडण्याचा अधिकार असताना अशा प्रकारे केलेल्या कारवाईमुळे लोकशाही मूल्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची तीव्र भावना व्यक्त केली जात आहे.

या घटनेच्या विरोधात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन संविधानाच्या चौकटीत राहून शांततामय मार्गाने आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज जर नागरिकांचा आवाज दाबला गेला, तर उद्या हक्कांसाठी उभे राहणारे कोणीच उरणार नाही, असा इशारा देत या पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ संभाजीनगर येथे काँग्रेसच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सुमारे १५ ते १६ काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती कारवाई केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.
    1
    राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ संभाजीनगर येथे काँग्रेसच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सुमारे १५ ते १६ काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती कारवाई केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.