logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा जागर; डि.जे.पी. कॅम्पस मध्ये जिल्हास्तरीय नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत स्पर्धा उत्साहात संपन्न युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत (MY Bharat), जालना आणि डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डि.जे.पी. कॅम्पस, रेवगाव रोड, जालना येथे ‘जिल्हास्तरीय नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धा उत्साहात पार पडली. जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांद्वारे व्यसनमुक्त भारताचा प्रभावी संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व धन्वंतरी प्रार्थनेने झाली. स्पर्धेचे उद्घाटन सहायक जिल्हाधिकारी डॉ. रंगमंजु यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सहायक आयुक्त (कौशल्य विभाग) गणेश चिमणकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मिनल ठोसर होत्या. स्पर्धेत चित्रकला, घोषवाक्य लेखन, भाषण, लोकनृत्य, लोकगीत, रिल निर्मिती, पथनाट्य आणि मौखिक कविता अशा आठ विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त भारताचा संदेश प्रभावीपणे सादर करत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी भागवत शिंदे (प्रशासकीय अधिकारी, डी.जे.पी.), डॉ. विठ्ठल कुचके (प्राचार्य, ओजस कॉलेज ऑफ फार्मसी), डॉ. कृष्ण कुमार सिंग (प्राचार्य, ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी), डॉ. के. जे. रमीता (प्राचार्या, ओजस कॉलेज ऑफ नर्सिंग), डॉ. संगीता गायकवाड (प्राचार्या, बी.एड. कॉलेज, डी.जे.पी.), डॉ. मुकुंद बंडले, पुरुषोत्तम राखुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. मिनल ठोसर यांनी नशामुक्त भारत अभियानाचे महत्त्व विशद केले. सहायक जिल्हाधिकारी डॉ. रंगमंजु यांनी व्यसनाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट करून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले. तर गणेश चिमणकर यांनी सर्व उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली. स्पर्धांचे परीक्षण डॉ. बी. जी. श्रीरामे, डॉ. शिवानंद मुंढे, डॉ. मोनिश शिंदे, श्रीमती कांचन वाघ, व्ही. आर. ठोंबरे, डॉ. अभिषेक शुक्ला, डॉ. रेणुका भावसार बडवणे, डॉ. सुजाता देवरे, शशिकांत वडले, मिलिंद सावंत, डॉ. दीपक बुक्तरे, डॉ. अस्मिता शिंदे, डॉ. निशिकांत लोखंडे, विनोद जैतमहल, डॉ. अभिजित जोशी, सतीश लिंगडे, लक्ष्मीकांत पोलास, डॉ. निधी शर्मा, परमेश्वर क्षिरसागर, गणेश नागवे, डॉ. गंगाधर धांडगे, बिस्मिल्ला सय्यद आणि प्रशंसा घोरपडे यांनी केले. स्पर्धेतील विजेते : मौखिक कविता : प्रथम – नम्रता पवार, द्वितीय – प्रांजल तस, तृतीय – ऋतुजा गरजे. लोकनृत्य : प्रथम – वैष्णवी ढाकीणकर व टीम, द्वितीय – तनुजा पवार व टीम, तृतीय – सारिका नागरे व टीम. भाषण : प्रथम – साक्षी सुरेश डांगे, द्वितीय – श्वेता नवनाथ देशमुख, तृतीय – भूमिका आढाव. घोषवाक्य : प्रथम – साक्षी राजेंद्र ठाकूर, द्वितीय – स्नेहा श्याम खरात, तृतीय – नेहा संजय जोगदंड. रिल निर्मिती : प्रथम – शिवराज टेकाळे, द्वितीय – जयदीप शिंदे, तृतीय – प्रगती बोरुडे. लोकगीत : प्रथम – पियुष पाटील व टीम, द्वितीय – साईनाथ पवार व अर्जुन उबाळे. चित्रकला : प्रथम – अनुश्री कदम, द्वितीय – स्वराली लाडे, तृतीय – कल्याणी पाटील. पथनाट्य : प्रथम – पल्लवी व टीम, द्वितीय – श्रावणी व टीम, तृतीय – कैफ खान. स्पर्धेतील विजेत्यांना अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत साळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे यांनी केला. सूत्रसंचालन धरतीधन ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सावंत आणि सहारा सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष बी. एस. सय्यद यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जयपाल राठोड तसेच अजित लाटे, अंकित कड, फैजान शेख, अफान हाश्मी, महेश देशमुख, प्रणव खेडकर आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

10 hrs ago
user_Santram Jadhav
Santram Jadhav
Jalna, Maharashtra•
10 hrs ago
b75afe5c-cab8-48dc-9529-67793990110e

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा जागर; डि.जे.पी. कॅम्पस मध्ये जिल्हास्तरीय नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत स्पर्धा उत्साहात संपन्न युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत (MY Bharat), जालना आणि डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डि.जे.पी. कॅम्पस, रेवगाव रोड, जालना येथे ‘जिल्हास्तरीय नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धा उत्साहात पार पडली. जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांद्वारे व्यसनमुक्त भारताचा प्रभावी संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व धन्वंतरी प्रार्थनेने झाली. स्पर्धेचे उद्घाटन सहायक जिल्हाधिकारी डॉ. रंगमंजु यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सहायक आयुक्त (कौशल्य विभाग) गणेश चिमणकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मिनल

72c2db40-bc35-46c4-b6af-8134404a7bf9

ठोसर होत्या. स्पर्धेत चित्रकला, घोषवाक्य लेखन, भाषण, लोकनृत्य, लोकगीत, रिल निर्मिती, पथनाट्य आणि मौखिक कविता अशा आठ विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त भारताचा संदेश प्रभावीपणे सादर करत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी भागवत शिंदे (प्रशासकीय अधिकारी, डी.जे.पी.), डॉ. विठ्ठल कुचके (प्राचार्य, ओजस कॉलेज ऑफ फार्मसी), डॉ. कृष्ण कुमार सिंग (प्राचार्य, ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी), डॉ. के. जे. रमीता (प्राचार्या, ओजस कॉलेज ऑफ नर्सिंग), डॉ. संगीता गायकवाड (प्राचार्या, बी.एड. कॉलेज, डी.जे.पी.), डॉ. मुकुंद बंडले, पुरुषोत्तम राखुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. मिनल ठोसर यांनी नशामुक्त भारत अभियानाचे महत्त्व विशद केले. सहायक जिल्हाधिकारी डॉ. रंगमंजु यांनी व्यसनाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट करून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले. तर गणेश चिमणकर यांनी सर्व उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली. स्पर्धांचे परीक्षण डॉ. बी. जी. श्रीरामे, डॉ. शिवानंद मुंढे, डॉ.

e3a2ab58-1ca0-44d6-9399-a68b69b2d432

मोनिश शिंदे, श्रीमती कांचन वाघ, व्ही. आर. ठोंबरे, डॉ. अभिषेक शुक्ला, डॉ. रेणुका भावसार बडवणे, डॉ. सुजाता देवरे, शशिकांत वडले, मिलिंद सावंत, डॉ. दीपक बुक्तरे, डॉ. अस्मिता शिंदे, डॉ. निशिकांत लोखंडे, विनोद जैतमहल, डॉ. अभिजित जोशी, सतीश लिंगडे, लक्ष्मीकांत पोलास, डॉ. निधी शर्मा, परमेश्वर क्षिरसागर, गणेश नागवे, डॉ. गंगाधर धांडगे, बिस्मिल्ला सय्यद आणि प्रशंसा घोरपडे यांनी केले. स्पर्धेतील विजेते : मौखिक कविता : प्रथम – नम्रता पवार, द्वितीय – प्रांजल तस, तृतीय – ऋतुजा गरजे. लोकनृत्य : प्रथम – वैष्णवी ढाकीणकर व टीम, द्वितीय – तनुजा पवार व टीम, तृतीय – सारिका नागरे व टीम. भाषण : प्रथम – साक्षी सुरेश डांगे, द्वितीय – श्वेता नवनाथ देशमुख, तृतीय – भूमिका आढाव. घोषवाक्य : प्रथम – साक्षी राजेंद्र ठाकूर, द्वितीय – स्नेहा श्याम खरात, तृतीय – नेहा संजय जोगदंड. रिल निर्मिती : प्रथम

dbda8924-ceba-497d-8ea9-150f29301d93

– शिवराज टेकाळे, द्वितीय – जयदीप शिंदे, तृतीय – प्रगती बोरुडे. लोकगीत : प्रथम – पियुष पाटील व टीम, द्वितीय – साईनाथ पवार व अर्जुन उबाळे. चित्रकला : प्रथम – अनुश्री कदम, द्वितीय – स्वराली लाडे, तृतीय – कल्याणी पाटील. पथनाट्य : प्रथम – पल्लवी व टीम, द्वितीय – श्रावणी व टीम, तृतीय – कैफ खान. स्पर्धेतील विजेत्यांना अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत साळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे यांनी केला. सूत्रसंचालन धरतीधन ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सावंत आणि सहारा सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष बी. एस. सय्यद यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जयपाल राठोड तसेच अजित लाटे, अंकित कड, फैजान शेख, अफान हाश्मी, महेश देशमुख, प्रणव खेडकर आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    1
    जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जालना महानगरपालिकेचा निष्काळजीपणा पौसाचा घाण पाणी रस्त्यावर शिरले नाळ्या तुबले
    1
    जालना महानगरपालिकेचा निष्काळजीपणा पौसाचा घाण पाणी रस्त्यावर शिरले नाळ्या तुबले
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही महापालिका आयुक्त व महापौर तलेन्च कलेक्टर यसा निवेदन देवून ही वस्तीतील कामे मात्र आश्वासनावर काल झालेल्या पावसामुळे अत्यत वाईट अ ईट अशी अवस्था येथील रहिवाशाची झाली असुन नागरिक त्रसा आहे. म्हणून यावेळेस नागरिकाना प्रश्न पडला आहे कि आमच्या समस्या कोळा सोडू शकतो
    2
    भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही 
भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही महापालिका आयुक्त व महापौर तलेन्च कलेक्टर यसा निवेदन देवून ही वस्तीतील कामे मात्र आश्वासनावर काल झालेल्या पावसामुळे अत्यत वाईट अ ईट अशी अवस्था येथील रहिवाशाची झाली असुन नागरिक त्रसा आहे. म्हणून यावेळेस नागरिकाना प्रश्न पडला आहे कि आमच्या समस्या कोळा सोडू शकतो
    user_Eshwar Panchal
    Eshwar Panchal
    Painter जालना, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • बदनापूरमध्ये भरपावसात उपवर्गीकरणाच्या विरोधात संघर्ष मोर्चा बदनापूर जिल्हा जालना बदनापूर येथे ३० जूलै रोजी भरपावसात अनुसुचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात आला. पाऊस चालू असल्यामुळे काही समाज बांधवा त आले नाही पण जे कट्टर आंबेडकरवादी होते ते मोर्चात पावसाची परवा न करता उपवर्गीकरणाच्या मोर्चात उपस्थित होते आदरणीय अमन साहेब आंबेडकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली पाच हजार भीम सैनिकासह बदनापूर तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मोर्चामध्ये शाहू फुले बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी उपस्थित डॉक्टर सुशील सूर्यवंशी सर दिनकर दादा विनोद काळे परमेश्वर गरबडे दिनेश आदमाने साहेब मिलिंद रगडे ज्ञानेश्वर गरबडे यावेळी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लखन भाऊ नरवडे राहुल चाबुकस्वार यांचा अमन राज साहेबांनी सत्कार करण्यात आला मोर्चा निवेदन सादर करण्यात आले तहसीलदार यांना बदनापूर तालुक्याची सर्व संयोजक समिती आंबेडकर चळवळीतले सर्व अनेक कार्यकर्ते महिला भगिनी सौ उपस्थिती होती यात भीमसैनिक अनेक उपस्थित होते आणि पावसाची पर्वा न करता उपवर्गीकरणाच्या मोर्चाचे हजर होते मोर्चा संदर्भात पोलीस बांधव यांनी चांगले बंदोबस्त दिले त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे ॲम्बुलन्स सुद्धा उपलब्ध होतील तसेच बदनापूर नागरिकांनी सर्व मोर्चा यांना भोजनदान दिले आरक्षण उप वर्गीकरण विरोधी मोर्चामार्फत सर्व भीमसैनिकांना जेवण व भोजनदान देण्यात आले
    1
    बदनापूरमध्ये भरपावसात उपवर्गीकरणाच्या विरोधात संघर्ष मोर्चा
बदनापूर जिल्हा जालना 
बदनापूर येथे ३० जूलै रोजी भरपावसात अनुसुचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य संघर्ष  मोर्चा काढण्यात आला. पाऊस चालू असल्यामुळे काही समाज बांधवा त आले नाही पण जे कट्टर आंबेडकरवादी होते ते मोर्चात पावसाची परवा न करता उपवर्गीकरणाच्या मोर्चात उपस्थित होते आदरणीय अमन साहेब आंबेडकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली पाच हजार भीम सैनिकासह बदनापूर तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मोर्चामध्ये शाहू फुले बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी उपस्थित डॉक्टर सुशील सूर्यवंशी सर दिनकर दादा विनोद काळे परमेश्वर गरबडे  दिनेश आदमाने साहेब  मिलिंद रगडे ज्ञानेश्वर गरबडे  यावेळी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लखन भाऊ नरवडे राहुल चाबुकस्वार यांचा अमन राज साहेबांनी सत्कार करण्यात आला  मोर्चा निवेदन सादर करण्यात आले तहसीलदार यांना  बदनापूर तालुक्याची सर्व संयोजक समिती  आंबेडकर चळवळीतले सर्व अनेक कार्यकर्ते महिला भगिनी सौ उपस्थिती होती यात भीमसैनिक अनेक उपस्थित होते आणि पावसाची पर्वा न करता उपवर्गीकरणाच्या मोर्चाचे हजर होते मोर्चा संदर्भात पोलीस बांधव यांनी चांगले बंदोबस्त दिले त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे ॲम्बुलन्स सुद्धा उपलब्ध होतील तसेच बदनापूर नागरिकांनी सर्व मोर्चा यांना भोजनदान दिले आरक्षण उप वर्गीकरण विरोधी मोर्चामार्फत सर्व भीमसैनिकांना जेवण व भोजनदान देण्यात आले
    user_सय्यद नजाकत
    सय्यद नजाकत
    बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त
    1
    वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त 
वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त
    user_Samadhn kalam
    Samadhn kalam
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • भोकरदन स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
    1
    भोकरदन स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 35 ते 40 वर्षे जीर्ण इमारतीला पावसामुळे धोका; दुर्घटना घडण्यापूर्वी मनपाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 35 ते 40 वर्षे जीर्ण इमारतीला पावसामुळे धोका; दुर्घटना घडण्यापूर्वी मनपाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आज दिनांक 31 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जुना जालना भागातील माळीपुरा परिसरात असलेल्या एकता भवनच्या जीर्ण इमारतीचे छताचे प्लास्टर सततच्या पावसामुळे वेळोवेळी कोसळत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इमारतीच्या पाठीमागील भागात तसेच आजूबाजूच्या परिसरात नागरिकांची वस्ती असल्याने प्लास्टर कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    1
    जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

35 ते 40 वर्षे जीर्ण इमारतीला पावसामुळे धोका; दुर्घटना घडण्यापूर्वी मनपाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी


जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
35 ते 40 वर्षे जीर्ण इमारतीला पावसामुळे धोका; दुर्घटना घडण्यापूर्वी मनपाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
आज दिनांक 31 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जुना जालना भागातील माळीपुरा परिसरात असलेल्या एकता भवनच्या जीर्ण इमारतीचे छताचे प्लास्टर सततच्या पावसामुळे वेळोवेळी कोसळत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इमारतीच्या पाठीमागील भागात तसेच आजूबाजूच्या परिसरात नागरिकांची वस्ती असल्याने प्लास्टर कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास! भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास! भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील धामणा धरणाच्या नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून या वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात ही समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने पुलाची उंची वाढवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
    1
    भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास!



भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास!
भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील धामणा धरणाच्या नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून या वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.
पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात ही समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने पुलाची उंची वाढवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.